नखं

चुकूनही कापू नका क्युटिकल्स, नखांचे होईल नुकसान

Trupti Paradkar  |  Aug 2, 2021
चुकूनही कापू नका क्युटिकल्स, नखांचे होईल नुकसान

क्युटिकल्स म्हणजे नखाच्या कडेला असणारी त्वचा. थंड वातावरण अथवा योग्य निगा न राखल्यास नखांजवळील ही त्वचा म्हणजेच क्युटिकल्स जाड होतात. कोरडे आणि जाड झाल्यामुळे क्युटिकल्स सतत लागतात. अर्धवट तुटलेले क्युटिकल्स मग तुम्ही नेलकटरने कापून टाकता. मात्र असं करणं फार चुकीचं आहे. कारण क्युटिकल्स कापतानाच तुमच्या बोटांमधून तीव्र संवेदना जाणवतात. म्हणूनच क्युटिकल्स कापण्यापूर्वी दहा वेळा विचार करा. कारण क्युटिकल्स कापण्यामुळे तुम्हाला त्रास तर होतोच शिवाय तुमच्या नखांचे जास्त नुकसान होते. क्युटिकल्स म्हणजे तुमच्या नखांवरील टिश्यू अथवा जाड त्वचा. ज्यामुळे तुमच्या नखांच्या मुळांचे संरक्षण होते. मात्र असे मुळासकट क्युटिकल्स कापण्यामुळे तुमच्या नखांच्या आतील त्वचा उघडी पडते. अशा त्वचेमध्ये कोणतेही इनफेक्शन अथवा जीवजंतू सहज जावू शकतात. हाताने सतत काम करताना  जीवजंतूचा  संपर्क हाताला होत असतो. सहाजिकच त्यातून तुमच्या नखांचे इनफेक्शन होण्याची शक्यता वाढते. 

क्युटिकल्स कापल्यानंतर वाढतो नखांना संक्रमणाचा धोका –

जेव्हा तुम्ही तुमच्या नखांवरील क्युटिकल्स कापता तेव्हा तिथली त्वचा जास्त कोरडी आणि कठीण होते. अशी त्वचा फाटण्याची अथवा सोसली जाण्याची शक्यता अधिक असते. असं केल्यामुळे नखांना संक्रमण होण्याचा  धोका असतोच शिवाय नखे मध्येच तुटण्याची शक्यता वाढते. सतत क्युटिकल्स कापण्यामुळे तुमच्या नखांची वाढ थांबते अथवा  नखे वाकडी येण्याची शक्यता वाढते. शिवाय असं झाल्यास नखांमधून तीव्र संवेदना होतात त्या वेगळ्याच. यासाठी क्युटिकल्स कधीच कापू नयेत. जर तुमचे क्युटिकल्स कोरडे आणि कडक झाले असतील तर तुम्ही काही  घरगुती उपाय करून ते मऊ करू शकता. फार फार तर क्युटिकल्स थोडे ट्रिम करा मात्र मुळासकट कधीच काढू नका. क्युटिकल्स तुमच्या नखांच्या पेशी आणि मुळांच्या संरक्षणाचे काम करत असतात. यासाठी जितकं  शक्य आहे तितकं क्युटिकल्सची काळजी घ्या ज्यामुळे तुमच्या नखांमध्ये संक्रमण होण्याचा धोका कमी होईल आणि नखांची वाढ चांगली होईल. 

क्युटिकल्स न काढता कशी घ्यावी नखांची काळजी –

क्युटिकल्स मऊ रााहावे यासाठी दिवसभरात एक ते दोन वेळा हाताला मॉईस्चराईझर लावाव. जर तुम्ही जास्तवेळ उन्हात राहत असाल तर सनस्क्रिन वापरणं टाळू नका. क्युटिकल्स काढण्यासाठी क्युटिकल रिमूव्हर वापरा अथवा ते ट्रिम करा. मात्र नेलकटरने कापून टाकू नका. नारळाचे तेल, पोटॅशियम फॉस्फेट, पोटॅशिअम हायड्रॉक्साईड, ट्रायथेॉनलमाईन आणि पाणी यांच्या मिश्रणाचा वापर केल्यामुळे क्युटिकल्स मऊ होतात आणि त्वचेला चिकटून राहतात. खूप खरखरीत झाले असतील तर तुम्ही व्हॅसलिन अथवा पेट्रोलिअम जेलीने हाताला मालिश करू शकता.

खं सुंदर दिसण्यासाठी मेनिक्युअरपेक्षा फायदेशीर आहे हे डाएट

नखं कापताना कधीच करू नका या चुका

असिटोन की नॉन-अॅसिटोन नेलपॉलिश रिमूव्हर, नखांसाठी काय चांगलं

Read More From नखं