Mental Health

मानसिक स्वास्थ राखण्यासाठी दररोज करा हे उपाय

Trupti Paradkar  |  Jan 21, 2020
मानसिक स्वास्थ राखण्यासाठी दररोज करा हे उपाय

निरोगी जीवनशैलीसाठी शारीरिक आणि मानसिक स्वास्थ चांगलं असणं गरजेचं आहे. एखादी शारीरिक समस्या अथवा आजारपणात आपण स्वतःची काळजी घेतो, डॉक्टरांचा  सल्ला घेतो, औषधोपचार करतो आणि लवकर त्यातून बरं होण्याचा प्रयत्न करतो. मात्र मानसिक आजार, नैराश्य , उदासीनता याबाबत तितकं सावध असतोच असं नाही. जेवढी काळजी आपण आपल्या शरीराची घेतो तितकी मनाची नक्कीच घेत नाही. खरंतर आपल्या शारीरिक अवस्थेचा मनावर आणि मानसिक स्वास्थाचा शरीरावर नकळत परिणाम होत असतो. या दोन्ही गोष्टी एकमेकांवर अवलंबून  आहेत. मानसशास्त्र असं सांगतं की शारीरिक आजारपणाची मुळं माणसाच्या मानसिक स्थितीत दडलेली असतात. यासाठी वेळीच तुमच्या मनाची काळजी घ्या. मानसिक स्वास्थ राखण्याची या टिप्स तुम्हाला फायदेशीर ठरू शकतात.

मानसिक स्वास्थ राखण्यासाठी करा हे सोपे उपाय –

जर तुम्ही सतत निराश, उदास राहत असाल. तुम्हाला काहिही करावंसं वाटत नसेल तर हे उपाय करून तुम्ही तुमच्या मनाची काळजी घेऊ शकता.

तुमच्या मनातील भावना मोकळ्या करा –

अनेक मानसिक समस्या या फक्त भावनांची गुंतागुंत झाल्यामुळे होत असतात. अशा वेळी जर अव्यक्त भावनांचा उद्रेक झाला तर त्या व्यक्तीला मानसिक आजार होण्याची शक्यता अधिक असते. अशा अवस्थेत डिप्रेशन येण्याची दाट शक्यता असते. पण जर तुम्हाला तुमचं मानसिक स्वास्थ राखायचं असेल तर अशा भावनांचा उद्रेक होण्याआधीच त्या मोकळ्या करा. यासाठी तुमचे मित्रमंडळी, कुटुंबिय, जोडीदार, समूपदेशक अशा एखाद्या जवळच्या व्यक्तीसोबत याबाबत मोकळेपणाने बोला. ज्यामुळे तुम्हाला बरं वाटू लागेल. मनातील अव्यक्त भावनांचा वेळीच निचरा होणं गरजेचं आहे.

anand quotes in marathi

shutterstock

मेडिटेशनचा सराव करा –

जर तुम्हाला तुमच्या शरीराचा आणि मनाचा उत्तम समतोल राखायचा असेल तर मेडिटेशन हा चांगला पर्याय आहे.  यासाठी तुम्ही कितीही बिझी असला तरी दिवसभरात कमीतकमी दहा मिनीटे मेडिटेशनसाठी काढा. ज्यामुळे तुमचे मन स्वस्थ आणि शांत राहील. मेडिटेशन करताना तुमच्या श्वासावर लक्ष केंद्रित करा ज्यामुळे तुमचे शारीरिक स्वास्थही चांगले राहील.

Shutterstock

नियमित व्यायाम करा –

मनाचा आणि शरीराचा जवळचा संबंध असतो. म्हणूनच यापैकी एकाचेही आरोग्य बिघडले तर दुसऱ्यावर त्याचा परिणाम दिसून येतो. उत्तम शारिरिक स्वास्थासाठी नियमित व्यायाम करण्यावर भर द्या. ज्यामुळे तुमचे मनही शांत आणि निरोगी राहील.  व्यायामासाठी प्रत्येकवेळी जीममध्येच जाण्याची गरज नाही. चालणे, योगासने, प्राणायम, झुंबा, धावणे, सायकल चालवणे, स्विमिंग अशी कोणतीही शारीरिक क्रिया केली तरी शरीराला पुरेसा व्यायाम नक्कीच मिळेल.

आहाराबाबत सावध राहा –

आहाराचा तुमच्या संपूर्ण आरोग्यावर परिणाम होत असतो. तुम्ही जे अन्नपदार्थ खाता तशीच तुमची जीवनशैली होत असते. जर तुम्हाला निरोगी आणि सुदृढ राहायचं असेल तर सात्विक आणि पोषक आहार घेण्याचा प्रयत्न करा.

ताण कमी करण्यासाठी वर्षातून एकदा वेकेशनवर जा –

दररोजच्या जीवनात आपण अनेक ताणतणावांना सामोरे जात असतो. ऑफिस, कामाचा ताण, घरातील जबाबदाऱ्या, नातेसंबंध, आर्थिक समस्या अशा अनेक गोष्टींमुळे  तुम्हाला टेन्शन येऊ शकतं. यासाठी एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा ताणतणाव, चिंता काळजी सर्वांनाच असते तुम्ही या ताणाला कसं हाताळता हा महत्त्वाचा प्रश्न आहे. कधी कधी दररोजच्या या  समस्यांपासून घेतलेला एखादा छोटासा ब्रेक तुम्हाला लगेच फ्रेश करू शकतो. यासाठी कामातून वेळ काढून एखादा छोट्या वेकेशनचं प्लॅनिंग करा.

shutterstock

कृतज्ञता व्यक्त करण्याची सवय लावा –

जीवनात कठीण काळ प्रत्येकावर येतो. मात्र तो किती वेळ टिकवायचा हे मात्र तुमच्यावर अवलंबून आहे. दिवसभर स्वतःला सकारात्मक ठेवण्यासाठी कृतज्ञता व्यक्त करणं हा एक उत्तम मार्ग आहे. जितकं तुम्ही तुम्हाला मदत करणाऱ्या लोकांबद्दल, वस्तूंबद्दल कृतज्ञ राहाल तितकं तुम्ही आतून आनंदित व्हाल. यासाठी रात्री झोपण्यापूर्वी आणि सकाळी उठल्यावर आई-वडील, निसर्ग, परमेश्वर, तुमचं घर, कुटुंब, मुलं,जोडीदार, ऑफिस , जॉब, व्यवसाय याबद्दल कृतज्ञ राहा. कृतज्ञता ही एक अशी गोष्ट आहे ज्यामुळे तुमची  मानसिक स्थिती नक्कीच सुधारू शकते.

shutterstock

तुम्हाला आनंद मिळेल असं काहीतरी करा –

प्रत्येकाजवळ काही ना काहीतरी कौशल्य असतात. ज्यातून तुमचे  छंद, आवडीनिवडी निर्माण होत असतात. कधी कधी लहानपणीचे छंद आणि आवडी काळाच्या ओघात मागे पडू लागतात. यासाठी दिवसभरात अशी एक तरी गोष्ट करा ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल.

या छोट्या छोट्या गोष्टी आयुष्यात तुम्हाला उत्तम मानसिक आणि शारीरिक स्वास्थ देण्यासाठी  नक्कीच बेस्ट आहेत.

फोटोसौजन्य – शटरस्टॉक

हे ही वाचा –

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा –

लहान मुलांमध्ये राष्ट्रभक्ती निर्माण करण्यासाठी वापरा या सोप्या टिप्स

जीवन जगताना मानसिक समाधान देतील हे ‘50′ आध्यात्मिक सुविचार

मानसिक आजार म्हणजे काय आणि त्याचे काय आहेत प्रकार

Read More From Mental Health