आई झाल्यानंतर बाळाच्या संगोपनाची जबाबदारी सगळ्यात जास्त आईला पार पाडावी लागते. बाळ काही वर्षांचे होईपर्यंत बाळासोबत प्रवास करणे हे आईसाठी तसे टास्क असते. पण अशाने प्रवास कशाला थांबवायचा. बाळासोबत प्रवास करणे म्हणजे खूप जणांना टास्क वाटते. पण असे काही नाही.बाळासोबत प्रवास करायची तुम्ही इच्छा असेल तर तुम्ही तयारी करायला हवी. मुलांना लागणारे सगळे सामान आणि योग्य तयारी केली तर तुम्हाला प्रवास करणे फारच सोपे जाईल. मुलांसोबत प्रवास करताना थोडा कलेने प्रवास केला तर त्यांना देखील प्रवासाची सवय लागते.
बाळांची अशी करा मानसिक तयारी
बाळांना अगदी लहान असल्यापासून प्रवास करायला तयार करायचे असेल तर तुम्ही त्यांची मानसिक तयारी करायला हवी. सुरुवातीलाच खूप मोठा असा प्रवास करु नका. छोट्या छोट्या प्रवासापासून मुलांना बाहेर न्यायला सुरुवात करा. बाहेर पडल्यानंतर तुम्हाला त्यांना काय काय लागते याची जाणीव होईल. जवळच्या ठिकाणी जाताना बाळांना लागणारा आहार हा योग्य असावा लागतो. त्याची वेळ पाळणे देखील गरजेचे असते. प्रवासात तुम्हाला कोणाचीही मदत मिळणारी नाही. हे ध्यनात ठेवून मगच तुम्ही बाळाला घेऊन प्रवास करणार की नाही ठरवा.
अशी सेट करा बॅग
बाळांना घेऊन प्रवास करायचा म्हणजे बाळांना लागणारे सामान तुम्ही घेणे फार गरजेचे असते. या बॅगमध्ये सगळ्या गोष्टी अगदी नीट लावणे गरजेचे आहे. त्यात भारंभार सामान न भरता योग्य असे सामान भरणे खूप जास्त गरजेचे आहे. नेमकी कशापद्धतीने तुम्ही बॅग सेट करायला हवी चला घेऊया जाणून
- सगळ्यात आधी प्रवासात लागणारी गोष्ट म्हणजे मुलांची औषध. लहान बाळांना सर्दी, पडसं, ताप येणे, जुलाब होणे असे त्रास होऊ शकतात. साधारणपणे बाळांसाठी काही औषध ही डॉक्टर देत असतात. ती औषधे बॅगमध्ये कॅरी करायला हवी. ( बाळासाठी जो डॉक्टर तुम्ही निवडला आहे. त्याचा फोन नंबर तुमच्याकडे असायला हवा. आताच्या टेक्नॉलॉजीच्या काळात काही गरज भासल्यास योग्य सल्ला घेता येतो. ) या शिवाय कानात घालण्यासाठी कापूस घ्या.
- बाळाच्या जेवणाची सोय. एका दिवसाचा प्रवास असेल तर तुम्हाला जेवण बनवून घेऊन जाता येईल. पण प्रवास मोठा असेल तर बाळासाठी स्वच्छ दुधाची बाटली. गरम पाण्याची बाटली आणि पावडरने बनवता येईल असा आहार हवा.
उदा. नाचणीचे सत्व, घुटी इ. - बाळाला प्रवासात नेताना त्याच्यासाठी योग्य कपडे न्यायला अजिबात विसरु नका. बाळासाठी कपडे घेताना त्यात लंगोट, झबली, कानटोपी, स्वेटर, अंगावर घ्यायला चादर असे घ्यायला विसरु नका. त्यामुळे ते कुठेही वापरता येतात.
- मुलांना कधी कधी आंघोळ घालता येत नाही. अशावेळी मुलांचे वाईप्स सोबत ठेवा. त्यामुळे मुलांना स्वच्छ करताना फार सोपे जाते.
- लहान बाळांना योग्य झोपेची गरज असते. अशावेळी त्यांना झोप येण्यासाठी एखादे खेळणे सोबत घ्या. त्यामुळे मुलांची चीडचीड होणार नाही ते खेळून आपला वेळ घालवू शकेल.
अशाप्रकारे तुम्ही तुमच्या बाळाची बॅग भरायला विसरु नका.
अधिक वाचा: लग्न झालेल्या मुलींना कधीही करु नयेत या चुका