आरोग्य

घरात राहून कसं व्हाल कोरोनातून पूर्ण बरं,असे करा उपचार

Trupti Paradkar  |  May 24, 2021
घरात राहून कसं व्हाल कोरोनातून पूर्ण बरं,असे  करा उपचार

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे कोरोना संक्रमितांची संख्या सध्या वाढताना दिसत आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी यासाठीच योग्य ती काळजी घेणं गरजेचं आहे. मात्र सर्व काळजी घेऊनही जर तुम्हाला कोरोनाची लागण झालीच तर घाबरू नका. कारण अशा परिस्थितीत कोणालाही कोरोना होऊ शकतो. कोरोनाची भीती न बाळगता त्यावर मात करणं सध्या गरजेचं आहे. शिवाय जर तुमची लक्षणं सौम्य असतील तर तुम्ही घरीदेखील आयसोलेशनमध्ये कोरोनातून पूर्ण बरे होऊ शकता. मात्र लक्षात ठेवा कोरोनाची लक्षणं दिसताच कुटुंबापासून लगेच वेगळे व्हा आणि स्वतःला आयसोलेट करा. कारण तुमच्या कोरोना टेस्टचा रिझल्ट यायला दोन दिवस लागू शकतात. या दरम्यान जर तुम्ही कोरोना संक्रमित असाल तर तुमच्यामुळे तुमच्या घरच्यांना कोरोना होण्याची शक्यता वाढू शकते. आयसोलेट झाल्यापासून स्वतःला कोरोना झाला आहे असं समजून योग्य ती काळजी घ्या आणि या काळात सरकारने दिलेल्या गाईडलाईन्स नीट फॉलो करा.

म्युकरमायकोसिस म्हणजे काय (What is Mucormycosis)

घरात राहून कसं व्हाल कोरोनामुक्त (How to Treat Coronavirus at Home )

आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या गाईडलाईन्सनुसार ज्यांना कोरोनाची लक्षणे आढळून येत आहेत. जसं की ताप येणे, घसा खवखवणे, खोकला, डोकेदुखी, श्वास घेण्यास त्रास होणे असे त्रास आढळल्यास तुम्ही स्वतःला कोरोना झाला आहे असं समजून स्वतःला आयसोलेट करायला हवं. अशी लक्षणं आढळल्यास कोरोनाची टेस्ट करावी आणि योग्य ते उपचार घेण्यास सुरुवात करावी. दोन दिवसांमध्ये तुमच्या कोरोना टेस्टचा रिझल्ट मिळतो. जर या काळात तुमची ऑक्सिजनची  पातळी खूप कमी झाली असेल तर तुम्हाला त्वरीत वैद्यकीय उपचारांची गरज आहे. मात्र असं नसेल तर तु्म्ही घरी राहूनही कोरोनातून बरे होऊ शकता.

कोरोना झाल्यावर घरात राहून अशी घ्या स्वतःची काळजी –

कोरोना संक्रमित झाल्यास होम आयसोलशनच्या काळात अशी घ्या काळजी

अधिक वाचा –

कोरोना झाल्यावर किती दिवस असतात शरीरात अॅंटि बॉडीज

कोरोनामधून बरं होताना गळत असतील केस तर करा हे उपाय

कोरोनातून बरं झाल्यावर का बदलावा टूथब्रश आणि टंग क्लिनर

Read More From आरोग्य