वातावरणात इतका कमालीचा बदल झाला आहे की, त्यामुळे अनेक आजारांनी डोकं वर काढायला सुरुवात केली आहे. खूप जणांना पावासाचा जोर वाढल्यापासून सर्दी खोकल्याचा त्रास अधिक होऊ लागला आहे. तुम्हालाही असाच काहीसा त्रास जाणवत असेल आणि उगाचच कोरोना असेल या भीतीने तुम्ही जर उगाचच विचार करत बसला असाल तर तुम्ही काही गोष्टींची कारण नसताना तुम्हाला चिंता सतावत असेल तर तुम्ही आताच काही खबरदारी घ्या. सर्दी खोकल्याला एकदम घाबरुन जाऊ नका. त्याऐवजी काही योग्य उपाय वेळीच केले तर हा त्रास नक्कीच कमी होण्यास मदत मिळेल.
तुम्हालाही झाली आहे सर्दी, हे घरगुती उपाय आहेत फायदेशीर
काढा
पावसाच्या सीझनमध्ये सर्दी, खोकला होण्याची शक्यता जास्त असते. अशावेळी घरगुती काढे हे यावर फारच फायद्याचे ठरतात. खूप जण वेगवेगळे खडे मसाले घालून काढे तयार करतात. आलं-हळद, लवंग, मिरी आणि गूळ असे घालून तुम्ही काढा करुन घ्या. हा काढा चवीला फारच चविष्ट लागतो. पण काढा गरम प्यायलात तर तुम्हाला त्यामुळे आराम मिळू शकेल. त्यामुळे सर्दी खोकला असा तुम्हाला जाणवत असेल तर तुम्ही लगेचच काढा करुन प्या.
भाजलेला बटाटा
आजारी आजारी वाटू लागले की, काहीही खाण्याची इच्छा होत नाही. अशावेळी खूप जण बटाटा आचेवर भाजतात. असा भाजलेला बटाटा त्याच्या सालासकट खाल्ला तर असा बटाटा नक्कीच तुमच्या पोटाची आग शमवतो आणि तोंडाची चव वाढवतो. त्यामुळे शक्य असेल तर गॅसवर बटाटा भाजा आणि असा बटाटा तुम्ही जमेल तेवढा खा तुम्हाला त्यामुळे नक्कीच बरे वाटेल.
गरोदर महिलांसाठी सर्दी-खोकल्यावर घरगुती उपाय (Pregnancy Madhe Sardi Khokla Var Upay)
मीठ
रोजच्या जेवणाची चव वाढवणारा मीठ हा घटक सुद्धा तुम्हाला या दिवसात फारच फायदेशीर ठरु शकतो. जीभेवर मीठ ठेवून ते हळुहळू आत घ्या. लाळेसोबत घशात जाणाऱ्या मिठामुळे घशाची खवखव कमी होण्यास मदत मिळते. जर तुम्हाला सर्दीमुळे घशात खवखव जाणवत असेल तर तुम्ही लगेचच एक छोटा चमचा मीठ घेऊन ते जीभेवर ठेवा. तुम्हाला नक्कीच लगेच आराम मिळेल.
कोबीची वाफ
सर्दी झाल्यानंतर वाफ घेणे हा अगदी साधासोपा आणि असा उपाय आहे. पण तुम्ही कधी कोबीची काही पानं घालू त्याची वाफ घेतली आहे का? ज्याप्रमाणे विक्स किंवा एखादा बाम घातल्यानंतर जसे पाणी काम करते. अगदी त्याचप्रमाणे कोबी घातल्यानंतर सर्दी मोकळी होण्यास मदत मिळते. त्यामुळे तुम्ही कोबीची पान घालून त्याची वाफ घ्यावी त्यामुळे नक्कीच तुम्हाला आराम मिळेल.
सर्दी, खोकला ही व्हायरल आजारांची लक्षण आहे. वातावरण बदलले की, ताप येण्याची शक्यताही असते. व्हायरल फिव्हर किंवा काही त्रास असेल तर तुम्ही असे घरगुती उपाय करु शकता. पण सध्या कोरोनाच्या लाटेमुळे हा त्रासही या लक्षणांपैकी एक आहे. त्यामुळे त्याकडे दुर्लक्ष करु नका. जर तुम्हाला 48 तासांपेक्षा जास्त वेळेसाठी जर असा त्रास असेल तर तुम्ही आताच त्याची योग्य तपासणी करा.