तुम्हाला Hyaluronic Acid हे नाव परिचित वाटत असेल कारण हा घटक सौंदर्य आणि स्किन केअर उत्पादनांमध्ये आढळतो. हायलुरोनिक ऍसिड हे ते त्वचेला हायड्रेट करण्यासाठी आणि तात्पुरते प्लम्पिंग करण्यासाठी म्हणून अतिसूक्ष्म रेषांचे स्वरूप कमी करते परंतु तुम्हाला माहित आहे का की ते तुमच्या केसांसाठी देखील फायदेशीर ठरू शकते? Hyaluronic acid ची लोकप्रियता काही प्रमाणात, त्याच्या humectant गुणधर्मांशी संबंधित आहे. ह्युमेक्टंट्स ओलावा टिकवून ठेवतात, त्यामुळे ते कोरड्या त्वचेसाठी बनवलेल्या उत्पादनांमध्ये वापरली जातात. तुमची त्वचा आणि डोळ्यांसह तुमच्या शरीराच्या वेगवेगळ्या भागांमध्ये नैसर्गिकरित्या हायलुरोनिक ऍसिड असते.
Hyaluronic Acid चा तुमच्या केसांना कसा फायदा होऊ शकतो?
Hyaluronic Acid त्याचे वजन पाण्यात शोषून घेऊ शकते, ज्यामुळे केसांमध्ये आर्द्रता वाढते. यामुळे केस मऊ आणि चमकदार राहण्यास मदत होते. जर तुमच्या केसांमध्ये हायलुरोनिक ऍसिड नसेल तर तुमचे केस कोरडे व पातळ होऊ शकतात. Hyaluronic Acid केसांचे पुनरुज्जीवन करण्यास मदत करते. तसेच केसांची आर्द्रता टिकवून ठेवण्याची क्षमता वाढवते. हे केसांचा एकूण लूक आणि पोत सुधारते.
प्रत्येकाने Hyaluronic Acid वापरावे का?
तुमच्या केसांचा प्रकार कुठलाही असला तरी तुम्ही hyaluronic acid वापरू शकता. हे तुमच्या केसांमध्ये ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करेल, कोरडेपणा दूर करेल आणि तुमच्या केसांचा व्हॉल्यूम वाढण्यास मदत करेल. जर तुमचा स्कॅल्प कोरडा पडत असेल तर, हायलुरोनिक ऍसिड कोणत्याही फ्लेकी, कोरड्या भागांना मॉइश्चरायझ करण्यात मदत करू शकते. अति-कोरडे, खराब झालेले केस, जसे की वारंवार ब्लीच केलेले केस, निरोगी केसांपेक्षा जास्त सच्छिद्र असतात. सच्छिद्र केसांना पाणी टिकवून ठेवण्यास त्रास होतो, त्यामुळे तुमच्या स्ट्रँडमध्ये येणारा कोणताही ओलावा लगेच बाहेर पडतो. Hyaluronic ऍसिड ओलावा कमी करण्यासाठी जबाबदार असलेली porosity कमी करण्यास मदत करते.जरी तुमचे केस नैसर्गिकरित्या चांगले असतील तरी तुमच्या दिनचर्येत hyaluronic acid समाविष्ट केल्याने तुमच्या केसांचे आरोग्य राखण्यास मदत होऊ शकते.
Hyaluronic Acid चा वापर कसा करावा
आजकाल hyaluronic acid केसांची काळजी घेण्यासाठी खूप लोकप्रिय आहे. केसांची काळजी घेण्यासाठी अनेक स्त्रिया अल्ट्रा हायड्रेटिंग आणि सीलिंग हायलुरोनिक ऍसिड वापरत आहेत. पण तुम्हाला केसांमध्ये hyaluronic वापरण्याची योग्य पद्धत आणि ते वापरण्याचे फायदे आणि तोटे माहित असायला हवेत. केसांची निगा राखण्यासाठी hyaluronic acid वापरण्याची योग्य पद्धत जाणून घ्या.
सौंदर्यतज्ज्ञांच्या मते, hyaluronic acid वापरल्याने केस मुलायम आणि रेशमी बनतात.आपण आठवड्यातून दोनदा hyaluronic ऍसिड वापरू शकता. तुमच्या केसांना दररोज hyaluronic लावल्याने तुमचे केस खराब होऊ शकतात. जर तुम्हाला कोरड्या आणि कुरळ्या केसांचा त्रास होत असेल तरच केसांमध्ये hyaluronic acid वापरा. खराब झालेले केस दुरुस्त करण्यासाठी, हायलुरोनिक ऍसिडचे काही थेंब घ्या आणि हलक्या ओलसर केसांना लावा ते 10 मिनिटे ठेवा, त्यानंतर केस धुवा. आपण रात्री देखील हे वापरू शकता. किंवा शॅम्पू करण्यापूर्वी, हायलुरोनिक ऍसिड तुमच्या संपूर्ण टाळूवर उदारपणे लावा आणि गोलाकार हालचालींमध्ये तुमच्या बोटांनी मालिश करा. तसेच जेव्हा तुमचे केस ओले असतात. जेव्हा केसांची शोषून घेण्याची क्षमता जास्त असते. त्यामुळे केस ओले असताना तुम्ही ते केसांना लावू शकता. तुम्हाला ते थेट तुमच्या केसांना लावायचे नसेल तर तुम्ही hyaluronic ऍसिडसह तयार केलेली उत्पादने वापरू शकता. हायलुरोनिक ऍसिड हेअर सीरम ओलसर केसांवर स्टाइलिंग ट्रीटमेंट म्हणून किंवा हेअर मास्कचा भाग म्हणून उपयुक्त ठरू शकते. ते केसांच्या मुळापासून टोकापर्यंत लावा, समान वितरणासाठी नंतर केस विंचरा.
अशा प्रकारे तुम्ही केसांसाठी Hyaluronic Acid चा वापर करू शकता.
Photo Credit – istockphoto
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक