Fitness

मेथी दाण्याच्या पाण्याने मधुमेह येतो आटोक्यात, कसा कराल वापर

Dipali Naphade  |  Apr 2, 2020
मेथी दाण्याच्या पाण्याने मधुमेह येतो आटोक्यात, कसा कराल वापर

आपल्याला जर माहीत नसेल तर मधुमेहाने वर्षाला जगभरात साधारण 16 लाख लोकांचा मृत्यू होतो. WHO ने सांगितल्याप्रमाणे 2030 पर्यंत मधुमेह हा जगातली 7 वा असा सर्वात मोठा आजार सिद्ध होईल. मधुमेह असा आजार आहे ज्याकडे तुम्ही दुर्लक्ष केलंत तर तुम्हाला तुमचा जीव गमवावा लागतो. त्याशिवाय तुमचे  डोळे, हृदय आणि किडनी यावर सर्वात जास्त परिणाम हा आजार करतो. हे अवयव मधुमेहामुळे निकामी होण्याचीही शक्यता असते. मधुमेह एकदा झाल्यानंतर हा तुम्हाला नियंत्रणात ठेवणं अत्यंत गरजेचे आहे. मधुमेह असणाऱ्या व्यक्तींना त्यांच्या जेवण्याखाण्याकडे आणि व्यायामाकडे अगदी आवर्जून लक्ष द्यावे लागते. गोड पदार्थ, सॉफ्ट ड्रिंक्स या पदार्थापासून दूर राहून, कार्ब्स, प्रोटीन आणि हायफायबर पदार्थ यांचाही व्यवस्थित समतोल साधावा लागतो. अन्यथा मधुमेह शरीरामध्ये जास्त वाढण्याची शक्यता असते. पण मधुमेह आटोक्यात आणायचा असेल तर तुमच्याकडे एक रामबाण इलाज आहे आणि तो म्हणजे मेथीच्या दाण्याचे पाणी.  यामुळे तुमचा मधुमेह आटोक्यात येऊन नियंत्रणात राहातो. 

मधुमेहावर करा घरगुती उपचार आणि करा मधुमेहाला दूर (Home Remedies for Diabetes In Marathi)

अभ्यासानुसार झाले सिद्ध

Shutterstock

International Journal for Vitamin and Nutrition Research मध्ये करण्यात आलेल्या एका अभ्यासानुसार रोज 10 ग्रॅम मेथीचे दाणे गरम पाण्यातून प्यायल्यास, टाईप 2 डायबिटीस (Diabetes) नियंत्रणात आणला जाऊ शकतो. मेथीचे दाणे फार आरोग्यदायक असतात. मेथी दाण्याच्या पाण्यामध्ये इतकी क्षमता असते की, रक्तातील साखरेची पातळी कमी करता येते. मेथी दाण्यामध्ये जास्त प्रमाणात फायबर असते जे तुमची पचनक्रिया अधिक वाढवते आणि त्याचप्रमाणे शरीरात असणारी साखरेची पातळीही कमी करण्यास मदत करते.

DIY: हिवाळ्यात केसगळतीची असेल समस्या तर घरीच बनवा मेथी दाण्याचं तेल

कसे बनवता येईल मेथी दाण्याचे पाणी

Shutterstock

मेथी दाण्याचे पाणी बनवण्यासाठी तुम्हाला जास्त कष्ट घेण्याची गरज नाही. हे अतिशय सोपे आहे. तुम्ही दोन पद्धतीने याचा वापर करू शकता. जाणून घ्या दोन्ही पद्धती 

1. रात्री एका ग्लासमध्ये  तुम्ही पाणी घ्या. त्यामध्ये एक लहान चमचा मेथी दाणे घाला. सकाळी हे पाणी रिकाम्या पोटी तुम्ही प्या. याचा परिणाम जास्त चांगला होतो

2. गरम पाण्यात मेथी दाणे भिजवा आणि ते गरम पाणी थोड्या वेळाने प्या. यामुळेदेखील तुमच्या शरीरातील साखरेची पातळी नियंत्रणात राहण्यास मदत  मिळते. 

मेथी दाण्याने होतं वजन कमी आणि केस होतात सुंदर, जाणून घ्या फायदे (Benefit of Fenugreek Seeds For Hair, Skin & Health in Marathi)

मेथी दाण्याचे पाणी पिण्याचा फायदा

मेथी दाण्याचे पाणी पिण्याने रक्तातील साखरेची पातळी नियंत्रणात राहाते हा महत्त्वाचा फायदा असून मेथीमध्ये आढळणारे गॅलेक्टोमॅनन नावाचे फायबर हे रक्तातील साखर शोषून घ्यायचे काम करते. त्यामुळे मधुमेहाचे मूळ असणारी साखर साहजिकच रक्तातून कमी होते आणि त्याचा शरीराला अधिक फायदा होतो. त्याशिवाय तुम्हाला अधिक औषधोपचार करण्याची गरजही भासत नाही. मात्र याचा अतिरेक करू नये. हे पाणी तुम्ही दिवसातून ग्लासभरच प्यावे. अति प्रमाणात साखरेची पातळी कमी झाल्यास, तुम्हाला त्याचा त्रासही होऊ शकतो हे लक्षात घ्या. 

विशेष सूचना – आहारामध्ये  कोणताही बदल करण्यापूर्वी अथवा मेथीचे पाणी नेहमी पिण्यापूर्वी एकदा तुम्ही तुमच्या डॉक्टरांकडून एकदा विचारून घ्या. त्यांचा सल्ला घेतल्यानंतरच तुम्ही याचा वापर करा. 

 

Read More From Fitness