Acne

चेहऱ्यासाठी कसा करावा दूधाचा वापर (How To Use Milk For Skin In Marathi)

Aaditi Datar  |  Apr 27, 2020
चेहऱ्यासाठी कसा करावा दूधाचा वापर (How To Use Milk For Skin In Marathi)

तुम्हालाही कदाचित कल्पना नसेल पण कच्च्या दूधाचे अनेक आरोग्यादायी फायदे आहेत. आपल्या शरीरातील हाडांना मजबूत बनवणं, शारीरिकदृष्ट्या पोषण आणि मानसिक आरोग्यासाठीही दूध उपयुक्त आहे. पण तुम्हाला माहीत आहे का की, दूध हे तुमच्या चेहऱ्यासाठीही गुणकारी आहे. हो… हे सत्य आहे जे एका सौंदर्य रहस्यांपैकी एक आहे. आजच्या POPxoMarathi च्या या लेखात आम्ही तुम्हाला दूधाबाबतच्या अशाच काही त्वचेला असणाऱ्या फायद्यांबाबत सांगणार आहोत. जे वाचून तुम्ही नक्कीच आश्चर्यचकित व्हाल.

उकळून घेतलेलं दूध हे शरीरासाठी उत्तम मानलं जातं. पण उकळल्यामुळे दूधातील अनेक जीवनसत्त्वं ही नाहीशी होतात. त्यामुळे उकळलेल्या दूधापेक्षा कच्च्या दूधात जास्त गुणकारी सत्त्वं आढळतात. त्यामुळे चेहऱ्यासाठी वापरताना नैसर्गिक घटक असलेल्या कच्च्या दूधाचा वापर केला जातो.

टोनर म्हणून दूधाचा वापर (Milk As Toner)

Canva

कच्चं दूध हा एक उत्तम मॉईश्चराईजिंग घटक आहे. तुम्ही इंटरनेटवर बरचसे लेख वाचले असतील ज्यात म्हटलं असेल की, जर तुमची त्वचा तेलकट असेल तर दूधाचा टोनर म्हणून वापर करू नका. पण ते कच्च्या दूधाला लागू होत नाही. कच्चं दूध हे कोणत्याही प्रकारच्या त्वचेवर टोनर म्हणून उत्तम परिणाम देत. हे तुमच्या चेहऱ्याला उत्तम पोषणं देतं. यामुळे त्वचा लवचिक होते. 

तुम्ही दूधाचा वापर टोनिंग फेसमास्क म्हणून चेहऱ्यावर करू शकता. 

साहित्य – लिंबाचा रस एक ते दोन चमचे, गुलाबपाणी एक ते दोन चमचे आणि दूध एक ते दोन चमचे.

कसा कराल वापर?

हा उपाय केल्यास तुमच्या चेहऱ्याला चांगलं टोनिंग मिळेल. तेव्हा हा फेसमास्क नक्की ट्राय करून पाहा. या उपायाने तुमचा चेहरा अगदी सुंदर दिसेल.

मॉईश्चरायजिंगसाठी दूध (Milk For Moisturizing)

कच्च्या दूधाचा सर्वात प्रभावी परिणाम म्हणजे मॉईश्चरायजेशन. कच्चं दूध त्वचेत खोलवर जाऊन तुमच्या त्वचेच्या प्रत्येक थराला पोषण देतं ज्यामुळे तुम्हाला हिवाळ्याच्या दिवसात कोरडेपणमा अजिबात जाणवणार नाही. 

मॉईश्चरायजिंगसाठी असा तयार करा फेसमास्क 

साहित्य – दोन ते तीन चमचे बेसन, दोन ते तीन चमचे मध आणि गुलाबपाणी 

कसा कराल वापर?

हा फेसमास्क लावल्याने तुमच्या चेहऱ्यावर छान तजेला येईल.

क्लिंजरसाठी दूध (Milk As Cleanser)

Shutterstock

तुम्हालाही आश्चर्य वाटत असेल ना की, थोडेफार बदल केल्यावर किती चांगले ब्युटी मास्क बनत आहेत. जे तुमच्या क्लिजिंग, टोनिंग आणि मॉईश्चराईजिंगसाठी उपयुक्त आहेत. कच्चं दूध हे चेहऱ्याला क्लिजिंगही करतं. हे त्वचेत खोलवर जाऊन त्वचेवरील अतिरिक्त तेल, सीबम, धूळ आणि ब्लॅकहेड्स दूर करतं. 

चेहऱ्यासाठी कच्च्या दूधाचा क्लिजिंग मास्क 

साहित्य – पाव लिंबाचा रस, 100 ग्रॅम कच्चं दूध 

कसा कराल वापर?

याच्या वापराने तुमच्या चेहऱ्यावरील अतिरिकत् दूध कमी होईल आणि तुम्हाला मिळेल तजेलदार त्वचा.

टॅन होईल दूर दूधाने (Milk For Tan Removal)

कच्च्या दूधाला अँटी-टॅन एजंट म्हणून ओळखलं जातं. कच्च्या दूधाचा वापर टॅन काढण्यासाठी तुम्ही टोमॅटो ज्यूससोबतही करू शकता. जे उत्तम अँटी-टॅन फेसपॅक म्हणून काम करतं. हे नैसर्गिक घटक तुम्हाला शरीरावरील टॅन दूर करण्यास खूप उपयोगी ठरतात. 

तसंच तुम्ही दुसऱ्या प्रकारात कच्च्या दूधासोबत बदाम आणि खजुराचा वापरही करू शकता. 

कसा कराल वापर?

पिंपल्सवरही गुणकारी दूध (Milk For Acne In Marathi)

Shutterstock

कच्चं दूध तुमच्या चेहऱ्यावरील एक्नेशी लढणारा एक एजंट आहे. हे त्वचेवरील अतिरिक्त तेल काढतं आणि त्वचा कोरडी करतं. हे तुमच्या चेहऱ्यावरील पिंपल्सवर नियंत्रण ठेवतं. याच्या वापरानेन ना त्वचा जास्त तेलकट होते ना जास्त कोरडी होते. 

साहित्य – 2-3 चमचे मुलतानी मिट्टी आणि काही थेंब कच्चं दूध. 

कसा कराल वापर?

या उपायाने तुम्हाला दीर्घकाळासाठी पिंपल्सपासून मुक्तता मिळेल.

चेहऱ्याला ठेवलं तारूण्यपूर्ण दूध (Anti Aging Milk)

कच्चं दूध हे एक उत्तम टोनर आहे जे तुमच्या वाढत्या वयाला रोखू शकतं. 

साहित्य – एक कच्चं केळ आणि काही थेंब कच्चं दूध 

कसा कराल वापर?

हा फेसमास्क तुम्हाला सन स्पॉट्स, फाईन लाईन्स आणि सुरकुत्यांपासून सुटका मिळवून देईल.

कोरड्या त्वचेसाठी दूध (Milk For Dry Skin)

Shutterstock

कोरड्या त्वचेला मॉईश्चराईज करायचं असेल तर करा कच्च्या दूधाचा वापर. 

साहित्य – दोन मोठे चमचे कच्चं दूध. एक मोठा चमचा मध

कसा कराल वापर?

जर तुमची त्वचा खूपच कोरडी असेल तर या मिश्रणात तुम्ही एक केळंही मिक्स करू शकता.

आरामदायी स्नानासाठी दूध (Milk For Comforting Bath)

जुन्या काळी राजवाड्यांमध्ये शाही स्नानांसाठी खास कच्च्या दूधाचा आणि केशराचा वापर केला जात असे. केशराच माहीत नाही पण तुम्ही शक्य असल्यास आंघोळीसाठी कच्च्या दूधाचा वापर करू शकता. 

कसा कराल वापर?

हे शाही स्नान तुम्हाला एक आरामदायी अनुभव नक्कीच देईल. या स्नानाने तुमची त्वचाही मॉईश्चराईज होईल.

नैसर्गिक सनस्क्रीन दूध (Milk For Natural Sunscreen)

Shutterstock

उन्हाळ्याच्या दिवसात तुम्ही कच्च्या दूधाचा वापर सनस्क्रीन म्हणूनही करू शकता. हे तुमच्या त्वचेवरील टॅनही दूर करतं. तसंच सूर्याच्या तीव्र किरणांपासून तुमच्या त्वचेची रक्षा करतं. 

कसा कराल वापर?

हे मिश्रण तुमच्या त्वचेवर जणू सुरक्षा कवचाप्रमाणे काम करतं आणि किमान चार तास तुम्हाला टॅन होण्यापासून वाचवतं.

तजेलदार त्वचेसाठी दूध (Milk For Glowing Skin)

कच्चं दूध हे साखरेसोबत चेहऱ्यावर लावल्यास त्वचेला उजळपणा मिळतो. अशा प्रकारे तुमची त्वचा फेस फर्मिंग एजंटच्या नियमित वापराने चमकदार दिसते. 

कसा कराल वापर?

तुम्हाला मिळेल उजळलेला चेहरा.

दूधाबाबत विचारले जाणारे प्रश्न आणि त्यांची उत्तरे FAQs

Canva

1. चेहऱ्यासाठी दूधाचा वापर रोज करता येईल का?
नक्कीच करू शकता. कारण कच्च्या दूधातील पोषक तत्त्वांचा तुमच्या चेहऱ्यावरील समस्या दूर करण्यात नक्कीच उपयोग होईल. तुम्ही रोज चेहऱ्याला दूध लावून ते 15 मिनिटं ठेवू शखता. नंतर थंड पाण्याने धुवून टाका. तुम्हाला नक्कीच फरक जाणवेल. 

2. दूधाच्या चेहऱ्यावरील वापराने त्वचा उजळते का?
दूधामधील लॅक्टीक एसिड तुमच्या चेहऱ्यावरी पिगमेंटेशन हळूहळू कमी करते. ज्यामुळे तुमची त्वचा उजळते. त्यामुळे तुम्हाला त्वचा उजळवण्यासाठी दूधाचा वापर नक्कीच करता येईल. 

3. चेहऱ्यावरील वापरासाठी कोणतं दूध चांगलं आहे?
फुल फॅट किंवा कच्चं दूध हे तुमच्या चेहऱ्यासाठी उत्तम असतं. तर बकरीच्या दूधाचा वापर हा आंघोळीसाठी केला जातो. गाईच्या दूधापेक्षा बकरीच्या दूधात लोणी घटक जास्त असल्याने आंघोळ करताना तुमच्या त्वचेला मॉईश्चर मिळते. तर ताकातही लॅक्टीक एसिड असतं जे त्वचेवर एक्सफॉलिएशनचं काम करतं. 

4. चेहऱ्यावर लावलेलं दूध न धुता झोपू शकतो का?
हो..असं करू शकता. जर तुम्ही चेहऱ्यावर रात्रभर दूधाचा थर राहू दिल्यास तुमचा चेहरा सकाळी एकदम तुकतुकीत दिसेल. दूधातील फॅट्समुळे तुमचा चेहरा चांगलाच मॉईश्चराईज होईल.

मग आता उशीर कशाला? कच्च्या दूधाचे त्वचेसाठी आणि सौंदर्यासाठी असलेले फायदे तुम्हाला कळले आहेतच. आत्तापर्यंत तेलकट त्वचेसाठी तुम्ही कच्चं दूध वापरलं नसल्यास आता नक्की वापरून पाहा. तुम्हाला कच्च्या दूधाच्या वापराने नक्कीच डागविरहीत आणि तजेलदार त्वचा मिळेल. तुम्हाला हा लेख कसा वाटला आम्हाला नक्की कळवा.

हेही वाचा – 

वापरा मुलतानी माती फेसपॅक आणि मिळवा 2 दिवसात चेहऱ्यावर चमक

चंदन फेसपॅक आणि त्याचे त्वचेसाठी विविध फायदे

जाणून घ्या केस आणि त्वचेवर होणारे ‘व्हिटॅमिन ई’ चे फायदे

घरच्या घरी बनवा असे फेस सीरम जे देतील तुमच्या त्वचेला ग्लो

Read More From Acne