Care

मऊ आणि मुलायम केसांसाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा असा करा वापर

Trupti Paradkar  |  Oct 14, 2019
मऊ आणि मुलायम केसांसाठी गुलाबाच्या पाकळ्यांचा असा करा वापर

गुलाबाच्या पाकळ्या, गुलाब पावडर अथवा गुलाबपाण्याचा वापर तुम्ही तुमच्या त्वचेचं सौंदर्य वाढवण्यासाठी अथवा डोळ्यांना थंडावा देण्यासाठी नक्कीच केला असेल. मात्र तुम्हाला गुलाबाच्या पाकळ्या केसांसाठीदेखील तितक्याच उपयुक्त आहे हे माहीत आहे का. केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी, केस चमकदार आणि मऊ करण्यासाठी, तेलकट केसांचा चिकटपणा कमी करण्यासाठी असं तुम्ही अनेक गोष्टींसाठी गुलाबपाणी, गुलाबाच्या पाकळ्या अथवा गुलाब पावडर वापरू शकता. गुलाबपाण्यामध्ये नैसर्गिक पोषक घटक असतात ज्यामुळे तुमच्या केसांचे सौंदर्य वाढू शकते. गुलाबपाण्यात व्हिटॅमिन ए, बी 3, सी आणि ई मुबलक असते. ज्याचा परिणाम तुमच्या केसांच्या मुळांवर होतो. केसांच्या मुळांचे योग्य पोषण झाल्यामुळे तुमच्या केसांची योग्य वाढ होते. जर तुम्हाला लांबसडक आणि निरोगी केस हवे असतील तर केसांच्या मुळांना तेलासोबत दररोज गुलाबपाणी जरूर लावा.  शिवाय सणासुदीला सुंदर केस हवे असतील तर गुलाब पाकळ्यांचा वापर करून असं वाढवा तुमच्या केसांचं सौंदर्य

shatter stock

गुलाब पाकळ्यांचा वापर करून तयार करा हेअरमास्क आणि हेअरऑईल

केसांचा निस्तेजपणा कमी करण्यासाठी

गुलाब पाकळ्यांमधील पोषक तत्त्व तुमच्या केसांच्या आरोग्यासाठी अतिशय पोषक असतात. ज्यामुळे तुमच्या केसांचा निस्तेजपणा कमी होऊ शकतो. 

कसं तयार कराल हेअर ऑईल

जोजोबा ऑईलमध्ये गुलाबाच्या पाकळ्या मिसळा. तेल थोडं कोमट करा आणि या तेलाने केसांच्या मुळांना दहा मिनीटं मस्त मसाज करा. वीस मिनीटांनी केस स्वच्छ धुवून टाका. दोन ते तीन दिवसांनी हा मसाज केला  तर एका महिन्यात तुमच्या केसांचा निस्तेजपणा कमी होईल.

केसांमधील कोंडा कमी करण्यासाठी

हवामानात झालेला बदल अथवा कोरड्या त्वचेमुळे केसांमध्ये कोंडा निर्माण होतो. अशा वेळी सतत  अॅंटि डॅन्ड्रफ शॅम्पूचा मारा झाल्यास केसांचे नुकसान होऊ शकते. कोंड्यावर नैसर्गिक उपाय केल्यास नक्कीच चांगला फायदा होऊ शकतो.

कसा तयार कराल हेअरपॅक-

अर्धा कप मेथीचे दाणे, चार पाच गुलाबाच्या पाकळ्या दोन ते तीन कप गुलाबपाण्यामध्ये चार तास भिजत ठेवा. त्यानंतर त्याची एक जाडसर पेस्ट करून ती केसांना एखाद्या हेअरपॅकप्रमाणे केसांवर लावा. अर्धा तासाने केस स्वच्छ करा. हा उपाय महिन्यातून एकदा  केल्यास तुमच्या केसांमधील कोंडा कमी होईल आणि केसांचे आरोग्य वाढेल

shatter stock

नैसर्गिक ग्लो येण्यासाठी

तुमचे  केस फ्रिझी अथवा कोरडे असतील त्यांना मॅनेज करण्यासाठी तुम्ही गुलाबपाणी वापरू शकता.गुलाबपाण्यामुळे तुमचे केस मऊ आणि मुलायम होतात. शिवाय त्यांच्यावर एक नैसर्गिक चमक दिसू लागते. 

कसा तयार कराल हेअरपॅक –

एका कोरफडीचा गर घ्या त्यामध्ये गुलाबाच्या पाकळ्या अथवा गुलाब पावडर मिसळून एक हेअरपॅक तयार करा. या मिश्रणाची पेस्ट तुम्ही मिक्सरचा वापर करून तयार करू शकता. हा हेअर पॅक केसांना लावून तुम्ही अर्धा तासाने तुमचे केस धुवू शकता.  आठवड्यातून एकदा हा उपाय केल्यास तुमचे केस मऊ आणि चमकदार दिसू लागतील.

केसांचा तेलकटपणा कमी करण्यासाठी

जर तुमच्या केसांमधील त्वचा तेलकट असेल तर तुमचे केस तेलकट आणि चिकट होतात. अशा केसांवर धुळ आणि माती पटकन चिकटते. ज्यामुळे मग केस लवकर खराब होऊ शकतात. केसांच्या मुळांमधील हे अतिरिक्त तेल कमी करण्यासाठी तुम्ही गुलाबपाण्याने केसांना मसाज करू शकता.

कसं तयार कराल हेअर ऑईल-

यासाठी गुलाबपाण्यात थोडंसं ऑलिव्ह ऑईल मिसळून त्याने केसांना हळूवार हाताने मसाज करा. नियमित केलेल्या या उपायाने तुमचे केस मऊ आणि मुलायम दिसू लागतील. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

हे ही वाचा –

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

अधिक वाचा –

Stretch Marks : प्रेगन्सीनंतर स्ट्रेच मार्क्स घालविण्यासाठी करा हे ‘5’ घरगुती उपाय

घरी केस कर्ल करण्याआधी या ‘8’ टीप्स अवश्य वाचा

टॉमेटो ठरतो केसांसाठी फायदेशीर, कसा ते माहीत आहे का

 

Read More From Care