DIY लाईफ हॅक्स

जाणून घ्या पँटीज धुण्याची योग्य पद्धत How to wash panties

Aaditi Datar  |  Jul 25, 2019
जाणून घ्या पँटीज धुण्याची योग्य पद्धत How to wash panties

इनरवेअर आपण शक्यतो सगळ्याजणी हातानेच धुवून टाकतात. पण अनेकींना अंडरगार्मेंट्स धुण्याची योग्य पद्धत माहीत नसते. ज्यामुळे अनेक इन्फेक्शन्सना आपण आमंत्रण देत असतो. असं आम्ही नाही अनेक डॉक्टर्सचं म्हणणं आहे. साधारणतः पावसाळ्यात अंडरगार्मेंट्स व्यवस्थित सुकत नाहीत आणि ते ओलसर राहतं. त्यावेळी बॅक्टेरिया आणि इन्फेक्शन्सची शक्यता वाढते. बरेचदा आपण आंघोळ करतेवेळी इनरवेअर धुऊन टाकतो. पण लक्षात घ्या जर पॅंटीज थंड पाण्याने धुतल्यास त्यातील बॅक्टेरिया नष्ट होत नाहीत. ज्यामुळे तुमची पँटी इन्फेक्टेड राहू शकते. जी घातल्यास परिणामी तुमच्या प्रायव्हेट पार्ट्सना संसर्ग होऊ शकतो.

तुमच्या प्रायव्हेट पा्र्ट्सच्या आसपासच्या भागात खाज, रॅशेस आणि काळेपणा यासारख्या समस्या नेहमी जाणवतात का?, मग यामागील कारण इन्फेक्टेड इनरवेअर किंवा पँटी असू शकतं.  विशेषतः पँटीवरील पिवळे डाग किंवा इतर डागांकडे दुर्लक्ष करू नका. हे डाग साबणाने, वॉशिंग पावडर आणि गरम पाण्याने काढण्याचा पूर्ण प्रयत्न करा. जर हे डाग निघत नसतील तर अशी पँटी वापरू नका. पण लक्षात ठेवा असे डाग काढण्यासाठी एसिड ब्लीचचा वापर अजिबात करू नका. 

*तुमची पँटी किंवा शॉर्ट्स नेहमी कोमट पाण्याने धुवा. जर तसं शक्य नसल्यास लॉन्ड्री सॅनिटायजरचा वापर करा.

Shutterstock

अंडरगार्मेंट्स किंवा पँटी धुण्यासाठी काही खास टिप्स

Shutterstock

त्यामुळे पुढच्या वेळी अंडरगार्मेंट्स धुताना ही काळजी नक्की घ्या. 

हेही वाचा –

*परफेक्ट इनरवेअरची निवड* करणे अजूनही जाते कठीण, मग वाचाच

तुमचे इनरवेअर्स ‘एक्सपायर्ड’ झाले आहेत का? जाणून घेण्यासाठी वाचा

तुमच्याकडे असायलाच हव्यात ‘या’ 8 पँटीज!

Read More From DIY लाईफ हॅक्स