त्वचा स्वच्छ आणि नितळ दिसावी असं प्रत्येकाला वाटत असतं. यासाठी अनेक जणी नियमित फेशिअल करण्यावर भर देतात. वास्तविक त्वचा निरोगी आणि नितळ राहण्यासाठी योग्य आहार आणि त्वचेची निगा दोन्ही गोष्टी गरजेच्या आहेत. आजकाल त्वचा चमकदार दिसावी यासाठी आइस फेशिअल Ice Facial करण्यावर भर दिला जातो. विशेष म्हणजे आइस फेशिअल तुम्ही घरच्या घरी करू शकता. चेहऱ्यावर बर्फ फिरवल्यामुळे तुमची त्वचा खेचली जाते, एजिंग मार्क्स कमी होतात आणि त्वचेवर ग्लो येतो. मात्र असं असलं तरी जर तुमची त्वचा अति संवेदनशील असेल तर मात्र तुम्ही हे फेशिअल करू नये. जाणून घ्या आइस फेशियलचे फायदे आणि संवेदनशील त्वचेवर काय होतात दुष्परिणाम
आइस फेशिअलचे फायदे
आइस फेशिअल उन्हाळ्यात केल्यामुळे त्वचेला थंडावा मिळतोच शिवाय त्वचेवर चांगले परिणामदेखील होतात.
टॅनिंग कमी होतं
आइस फेशिअल करण्याचा सर्वात मोठा फायदा म्हणजे टॅनिंग कमी होतं. उन्हाळ्यात तुम्ही जास्त घराबाहेर गेला नाही तरी देखील तुमची त्वचा टॅन होण्याची शक्यता असते. अशा वेळी आइस फेशिअल करणं तुमच्या फायद्याचं ठरतं. कारण यामुळे त्वचेला थंडावा मिळतो, त्वचा हायड्रेट राहते आणि मुळापासून स्वच्छ होत तुमच्या त्वचेतील टॅन काढून टाकते.
पिंपल्स कमी होतात
ज्या लोकांना नेहमी पिंपल्सचा त्रास सहन करावा लागतो, त्यांच्या त्वचेतून नेहमी दाह जाणवतो. तेलकट त्वचेवर अति प्रमाणात तेल जमा होत असल्यामुळे पिंपल्स निर्माण होतात. मात्र जर तुम्ही आइस फेशिअल केलं तर तुमच्या त्वचेवरील अतिरिक्त तेल दूर होतं. त्वचेची छिद्रे स्वच्छ झाल्यामुळे त्वचेला पुरेसं ऑस्किजन मिळते. सहाजिकच पिंपल्स अथवा तेलकट त्वचेच्या इतर समस्या यामुळे कमी होतात.
एजिंग मार्क्स कमी होतात
आजकाल वयाआधीच धुळ, माती, प्रदूषण, अति मेकअप आणि ताणतणावाचा परिणाम म्हणजे एजिंग मार्क्स दिसू लागतात. एजिंग मार्क्समुळे तुमची त्वचा सैल होते आणि त्वचेवर सुरकुत्या, फाईन लाईन्स निर्माण होतात. पण चेहऱ्यावर बर्फ फिरवल्यामुळे त्वचा खेचली जाते. ओपन पोअर्स बंद झाल्यामुळे त्वचा पुन्हा तरूण दिसू लागते.
आइस फेशिअल घरी कसे करतात
आइस फेशिअल घरी करण्यासाठी तुम्ही एका पातळ रुमालामध्ये बर्फाचे लहान तुकडे घेऊ शकता. चेहऱ्यावर गोलाकार मोशनमध्ये रूमाल फिरवत तुम्ही मसाज करू शकता. ज्यामुळे तुमचे रक्ताभिसरण सुधारते आणि त्वचेची छिद्रे स्वच्छ होतात आणि पुन्हा संकुचित पावतात. ज्यानंतर त्वचा कोरडी करून तुम्ही मॉइस्चराईझ लावायचे असते. त्वचेच्या छिद्रांमध्ये मॉईस्चराइझर मुरवल्यामुळे त्वचा मऊ आणि तजेलदार होते. अधिक चांगला परिणाम मिळण्यासाठी आइस ट्रेमध्ये कोरफड, ग्रीन टी, काकडीचा रस टाका. ज्यामुळे तुमच्या त्वचेत हे घटक मुरतील आणि जास्त फायदा मिळेल.
आइस फेशिअल करताना कोणती काळजी घ्यावी
आइस फेशिअलचे अनेक फायदे असले तरी अति संवेदनशील त्वचा असणाऱ्या लोकांनी हे फेशिअल करू नये. कारण जास्त वेळ त्वचेवर बर्फ फिरवल्यामुळे त्यांच्या चेहऱ्यावर रॅशेस अथवा पुरळ येण्याची शक्यता असते.
- आइस फेशिअल करताना कोणती काळजी घ्यावी
- आइस फेशिअल करताना नेहमी बर्फ दोन ते तीन मिनीटपेक्षा जास्त चेहऱ्यावर रगडू नये.
- बर्फ नेहमी सर्क्युलर मोशनमध्येच फिरवावा.
- आइस फेशिअल करण्यापूर्वी तुमच्या त्वचेचा प्रकार समजून घ्या आणि तज्ञ्जांचा सल्ला घ्या.
- आइस फेशिअल केल्यावर जर तुमची त्वचा जळजळत असेल तर त्वरीत थांबा आणि योग्य उपचार करा.
- बर्फ थेट त्वचेवर कधीच लावू नका आणि जास्त वेळ एकाच भागावर ठेवू नका.
- डोळ्यांखालील त्वचा संवेदनशिल असल्यामुळे त्या भागावर जास्त बर्फ लावू नका.
- उन्हातून आल्यावर लगेच चेहऱ्यावर बर्फ लावू नका
- दिवसभरात एकदाच तुम्ही त्वचेवर बर्फ लावू शकता.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक