Jewellery

लग्नात सोन्याहूनही अधिक सुंदर दिसतील दागिन्यांचे हे प्रकार

Leenal Gawade  |  Feb 21, 2021
लग्नात सोन्याहूनही अधिक सुंदर दिसतील दागिन्यांचे हे प्रकार

लग्नाचा सीझन सुरु झाला की, सोनं खरेदी खूप मोठ्या प्रमाणावर होते. नववधू म्हटली की, सोनं आलंच. पण सोन्याचा सध्याचा भाव पाहता सोन्याच्या दागिन्यांची खरेदी करणे काही साधीसोपी गोष्ट राहिलेली नाही. या सोन्याच्या दागिन्यांना टक्कर देईल असे दागिनेही सध्या बाजारात आहे. सोन्याची झळाळी या दागिन्यांना नसेल पण सोन्याहून अधिक सुंदर असे पॅटर्न इमिटेशन ज्वेलरीमध्ये मिळतात. साडी असो वा लेहंगा तुम्हाला तुमच्या वेडिंग आऊटफिटवर हे सुंदर दागिने घालू शकता. जाणून घेऊया दागिन्यांचे असे प्रकार जे सोन्याहूनही आहेत अधिक सुंदर

प्रत्येक महाराष्ट्रीयन मुलीकडे असायलाच हवेत हे 5 दागिने

गोल्डन हँडक्राफटेड ज्वेलरी

जर तुम्हाला खऱ्या सोन्याचे दागिने घ्यायचे असतील. पण तुमचं तेवढं बजेट नसेल तर गोल्डन हँडक्राफडेट ज्वेलरी तुम्ही आरामात घेऊ शकता. यामध्ये वेगवेगळे पॅटर्न तुम्हाला मिळतात. अगदी चोकर सेटपासून ते लाँग नेकलेस मिळतात. हे सेट आणि त्याची चकाकी अगदी सोन्यासारखी असते. असे प्रकार हे तुमच्या बजेटमध्ये बसतील असे असतात. गोल्डन हँडक्राफडेट ज्वेलरी या साड्यांवर अधिक चांगले दिसतात. लग्न किंवा रिसेप्सशन सोहळ्यामध्ये या ज्वेलरी घालता येतात. जर तुम्ही ऑनलाईन खरेदी करण्याचा विचार करत असाल तरी देखील तुम्हाला 500 रुपयांपासून पुढे मिळतात. 

गोल्ड कुंदन सेट

कुंदन हे कोणत्याही कार्यक्रमासाठी एकदम परफेक्ट असतात. कुंदन हा असा प्रकार आहे जो कोणत्याही कपड्यांवर चांगला दिसतो. कुंदनमध्ये अनेक प्रकारचे दागिने मिळतात. जर तुम्हाला सोनं नको असेल म्हणजे गोल्डन रंग नको असेल तर तुम्ही कुंदन सेटची निवड करु शकता. दागिन्यांचा हा प्रकार चारचौघात उठून दिसेल असा असतो. हे दागिने घातल्यानंतर तुम्हाला इतर काहीही नाही घातले तरी चालू शकते. असा सेट तुम्ही घेऊन तो साडी, लेहंगा अशा कोणत्याही आऊटफिटवर घालू शकता. त्यामुळे हा पर्याय तुमच्यासाठी उत्तम आहे.

जाणून घ्या पैंजण घालण्यामुळे होणारे आश्चर्यकारक फायदे

कुंदन बॅगल्स

कुंंदनच्या बांगड्याही खूप जणांना आवडतात. लग्नासारख्या सोहळ्यातही कुंदनच्या बांगड्या या खूप चांगल्या दिसतात.  हिरव्या बांगड्या किंवा कोणत्याही रंगाच्या बांगड्या तुम्ही घातल्या तरी त्याचा साज वाढवण्यासाठी या बांगड्या खूप चांगल्या आहेत. तुम्हाला यामध्येही वेगळ्या बांंगड्या मिळतात. बारीक आणि सिंगल स्टोनपासून ते दोन लेअर असे वेगवेगळे प्रकार यामध्ये चांगले दिसतात. वेगवेगळ्या ब्रँडमध्ये तुम्हाला या बांगड्या मिळू शकतात. साधारण 6 बांगड्या या ब्राईडसाठी पुरेशा आहेत. 

गोल्डन कडा

काही जणांना किमान लग्नाच्या दिवशी तरी काही तरी सोन्याचे घालावे असे अनेकांना वाटते. जर तुम्हालाही असं काहीतरी सोन्याचे हवे असेल तर तुम्ही गोल्डन रंगाच्या बांगड्याही घालू शकता. गोल्डन रंगाच्या बांगड्या नेहमीच चांगल्या दिसतात. यामध्ये तुम्हाला पातळ बांगड्या आणि त्याच्या वेगवेगळ्या डिझाईन्स मिळतात. असे कडे तुम्हाला तुमच्या हिरव्या, लाल किंवा कोणत्याही मल्टी कलरच्या बांगड्यांवर घातला येतात. 

मोत्याचे चोकर सेट

मोती हा कधी स्टाईलच्या बाहेर जाऊ  शकत नाही. जर तुम्हाला मोत्याचे दागिने आवडत असतील. तर तुम्हाला मोत्याच्या दागिन्यांमध्ये वेगवेगळे प्रकार मिळतात. हे दागिनेही तुम्हाला एलिंगट लुक देतात. मोत्याचे चोकर आणि लाँग सेट घातल्यानंतर तुम्हाला इतर काहीही घालण्याची गरज भासत नाही हे दागिने फारच सुंदर दिसतात. खरे मोती नसले तरी इमिटेशन ज्वेलरीमध्ये मिळणारे मोती हे बजेटमध्ये बसणारे असतात. 

 

 ज्वेलरीचे हे काही प्रकार तुम्हाला नक्कीच ट्राय करायला काहीच हरकत नाही. या शिवायही तुम्हाला सिल्व्हर आणि गोल्डन ज्वेलरीमध्ये असे प्रकार मिळू शकतात. 

कोणतेही दागिने ठेवायचे असतील चमकदार, तर करू नका ‘या’ चुका

Read More From Jewellery