घर आणि बगीचा

म्हणून दिवाळीतील लक्ष्मीपूजनाला असते महत्व, अशी करा लक्ष्मीची आराधना

Leenal Gawade  |  Oct 26, 2019
म्हणून दिवाळीतील लक्ष्मीपूजनाला असते महत्व, अशी करा लक्ष्मीची आराधना

आज नरकचतुर्दशी.. सकाळी छान सुगंधी उटणं लावून तुमची छान आंघोळ झाली असेल. फराळावर ताव मारुन झाला असेलच एव्हाना.. आता लक्ष्मीपूजनाची तयारी तुम्ही सुरु केली असेल. दिवाळीतील लक्ष्मीपूजनाला विशेष महत्व असते. म्हणूनच लक्ष्मीपूजन मोठ्या उत्साहात केले जाते. व्यापारी वर्ग असू दे किंवा इतर कोणीही लक्ष्मीचा वास आपल्याकडे असावा. म्हणून लक्ष्मीपूजा केली जाते. आज आपण लक्ष्मीपूजनाचे महत्व आणि लक्ष्मीची आराधना आजच्या दिवसात कशी करावी ते पाहुया. 

वास्तूशास्त्रानुसार अशी साजरी करा दिवाळी

दिवाळी लक्ष्मी आणि गणेश पूजनाशिवाय अपुरी

Instagram

दिवाळीच्या आधी आणि नवरात्रीच्यानंतर येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा म्हणतात. हा दिवस माता लक्ष्मीचा जन्म दिवस म्हणून साजरा केला जातो असे देखील म्हटले जाते. तर दिवाळीत तिची पूजा पैसा अडका, धन-धान्य यांच्यात वाढ व्हावी यासाठी केली जाते. लक्ष्मीसोबतच या दिवशी गणपती बाप्पाची पूजा देखील केली जाते. हिंदू धर्मात कोणत्याही शुभ कार्याची सुरुवात ही बाप्पाच्या आशीर्वादाने केली जाते. ‘गणपती बाप्पा मोरया’ असे म्हणत बाप्पाची पूजा केली जाते. पैसा घरात येऊन सुख येतेच असे नाही. कारण त्याचा उपयोग चांगल्या कामांसाठी करणेही तितकेच गरजेचे असते. म्हणूनच गणपती बाप्पाकडून आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडू दे याचा आशीर्वाद मागितला जातो. म्हणूनच बाप्पा आणि लक्ष्मीची पूजा केली जाते आणि दिवाळीची सुरुवात केली जाते. 

लक्ष्मी पूजनामागील धार्मिक श्रद्धा

Instagram

आता लक्ष्मी पूजनामागेही अनेक धार्मिक कथा आहे. पण एक कथा सर्वसाधारणपणे सांगितली जाते ती अशी की, शरद पौर्णिमेच्या दिवशी झालेल्या समुद्रमंथनातून लक्ष्मीची उत्पत्ती झाली. शरद पौर्णिमा म्हणजे नवरात्राैत्सवानंतर येणारा कोजागिरीचा दिवस हा लक्ष्मीचा जन्मदिवस म्हणून साजरा केला जातो. तर दिवाळी हा सण कार्तिक अमावस्येला येतो. कार्तिक अमावस्येचा हा दिवस काली मातेचा असतो. या दिवशी काली मातेची पूजा होणे अपेक्षित असते. असे म्हणतात की, शरद पौर्णिमेचा म्हणेज धवल (प्रकाशाचा दिवस) लक्ष्मीचा आणि अमावस्येचा दिवस हा कालीमातेचा असतो. पण बदलत्या काळानुसार दिवाळीच्या दिवसात लक्ष्मीची पूजाच केली जाते. आता तर दिवाळीत लक्ष्मीपूजनाची प्रथाच रुढ झालेली दिसते. 

उठा उठा दिवाळी आली.. जुन्या जाहिराती 

अशी करायला हवी पूजा

Instagram

आता दिवाळीतील लक्ष्मीपूजनाविषयी काही गोष्टी कळाल्यामुळे अर्थातच तुम्हाला पूजा करताना काही खास गोष्टी लक्षात घ्यायला हव्यात. तुम्ही लक्ष्मीपूजनाची तयारी केली असेल तर तुम्हाला त्यासोबत अजून देवतांचीही पूजा करायला हवी. लक्ष्मी,ब्रम्हा, विष्णू,महेश, सरस्वती यांची पूजा करायला हवी. 

आता दिवाळीतील लक्ष्मीपूजनाचे महत्व जाणून तुम्ही साग्रसंगीत लक्ष्मीची पूजा करा.

खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.

Read More From घर आणि बगीचा