लाईफस्टाईल

सकाळी उठल्यावर फॉलो करा ‘या’ 5 मिनिट टीप्स

Aaditi Datar  |  Mar 25, 2019
सकाळी उठल्यावर फॉलो करा ‘या’ 5 मिनिट टीप्स

असं म्हणतात की, सकाळ चांगली झाली की दिवस चांगला जातो आणि जर दिवस चांगला तर मग मूडही चांगला राहतो. जर तुमची सकाळ चिडचिडेपणाने सूरू झाली तर पूर्ण दिवसभर तुमचा मूडही वाईट होतो. म्हणूनच सकाळी डोळे उघडल्यावर असं काम करा ज्याने तुमचा संपूर्ण दिवस मजेत जाईल. आम्हाला माहीत आहे की, प्रत्येकालाच सकाळी ऑफिस किंवा इतर कामांची घाई असते. पण जर या 5 मिनिटांनी तुमचा पूर्ण दिवस चांगला जाणार असेल तर काय हरकत आहे, नाही का. त्यासाठी तुम्हाला काढायचा आहे फक्त 5 मिनिटं वेळ आणि फॉलो करायच्या आहेत 5 सोप्या स्टेप्स. मग बघा कशी जादूची कांडी फिरेल आणि तुमचा दिवस, मन आणि मूडही रोज ताजातवाना राहील. 

# स्टेप 1 – जेव्हा अलार्म वाजेल तेव्हा तो चिडून नाहीतर प्रेमाने बंद करा आणि हळूच उठून बसा. आता उशी घेऊन पाठीच्या मागे ठेवा आणि टेकून बसा. मग तुमचे डोळे बंद करा आणि पूर्ण 1 मिनिटं फक्त एखाद्या पॉजिटीव्ह गोष्टींबाबत विचार करा ज्यामुळे तुम्हाला आनंद मिळेल. जसं तुमची आणि त्याची पहिली भेट, तुमची लहानपणीची एखादी खोडकर आठवण, तुमचा पहिला पगार.   

# स्टेप 2 – तुमचं शरीर सैल सोडा आणि मस्तपैकी हसत मोठ्यांदा आळस द्या. आता कमीतकमी 1 मिनिट बसून अनुलोम-विलोम (श्वास घ्या, थांबा आणि सोडा)प्राणायाम करा. तुम्हाला माहीत असेलच की, आपल्याला होणारे 99  टक्के रोग हे पोटामुळे होतात. जी लोकं रोज नियमितपणे अनुलोम-विलोम करतात. त्यांची पाचनशक्ती इतरांपेक्षा अनेक पटीने चांगली असते. एवढंच नाहीतर ते तणावमुक्तही असतात.

# स्टेप 3 – आता तुमच्या कपाळ, आयब्रो, कपाळाच्या बाजूच्या भागाला हलक्या हाताने मसाज करा आणि मग शेवटी दोन्ही हात एकमेंकावर घासा. असं कमीतकमी 1 मिनिटांपर्यंत करा. यामुळे रक्तप्रवाह चांगला राहतो.

# स्टेप 4 – आता डोळे उघडा आणि घोट-घोट 2 ग्लास पाणी प्या. सकाळी रिकाम्या पोटी पाणी प्यायल्याने शरीरीतील टॉक्सीन्स बाहेर फेकली जातात आणि तुम्हाला डागविरहीत आणि तजेलदार त्वचा मिळते. तुम्ही जर हे रोज केलंत तर तुम्हाला पीरियड्स, पोट आणि किडनी संबंधित कोणतीही समस्या उद्भवणार नाही.  

# स्टेप 5 – आता शेवटी 1 मिनिटं तुमच्या दिवसाला आनंदी बनवणारी आणि सकाळचं वातावरण आनंददायी बनवणारी एखादी गोष्ट करा. उदा. खिडकी किंवा बाल्कनीत जाऊन ताजी हवा फील करा किंवा झाडांना पाणी घाला, म्युझिक ऐका. तुमच्या आवडत्या व्यक्तीला घट्ट मिठी मारा.

विश्वास ठेवा…जर तुम्ही रोज या 5 स्टेप्स फॉलो केल्यातर तुमचा संपूर्ण दिवस छान आणि आनंदी नक्कीच जाईल.

हेही वाचा –

‘साईबाबांची ११ वचनं’ जी तुमच्या आयुष्यातील प्रत्येक चिंता दूर करतील

यशस्वी आयुष्यासाठी फॉलो करा ‘या’ गुडलक वास्तू टीप्स

‘या’ कारणामुळे महिलांना पुरूषांपेक्षा जास्त झोपेची असते गरज

Read More From लाईफस्टाईल