Weight Loss

रोज सकाळी लसूण आणि मध खाल्ल्यामुळे होतात हे अप्रतिम फायदे

Leenal Gawade  |  Aug 21, 2019
रोज सकाळी लसूण आणि मध खाल्ल्यामुळे होतात हे अप्रतिम फायदे

आयुर्वेदात अनेक पदार्थांचे असे अनेक कॉम्बिनेशन करण्यात आहेत जे तुमच्यासाठी वेगवेगळ्या कारणाने फायदेशीर ठरतात. लसूण आणि मध खाल्ल्याने तुम्हाला अप्रतिम फायदे होऊ शकतात हे माहीत आहे का?? आज आपण लसूण आणि मध खाण्याचे हेच फायदे जाणून घेणार आहोत. वजन कमी करण्यापासून ते आरोग्य सुधारण्यापर्यंत लसूण-मधाचे फायदे आहेत. जाणून घेऊया याचे फायदे आणि नेमकं कशाप्रकारे करायचे याचे सेवन

असं बनवा लसूण मधाचे चाटण

shutterstock

लसूणचा एक मोठा कांदा घेऊन तुम्हाला त्याच्या पाकळ्या मोकळ्या करायच्या आहेत. सालं न काढता तुम्हाला लसूणीच्या पाकळ्या घ्यायच्या आहेत.  आता महत्वाची गोष्ट ती म्हणजे मधाबाबत.. तुम्हाला जरकेमिकल फ्री मध मिळत असेल तर फारच उत्तम कारण या मधाचा परिणाम लवकर होतो आणि अपेक्षित असलेला बदल तुम्हाला मिळू शकेल.साधारण वाटीभर मधामध्ये तुम्हाला त्यात बुडतील एवढ्या लसूणच्या पाकळ्या घालायच्या आहेत. चमच्याने आतील सगळी हवा काढून एका एअर टाईट कंटेनरमध्ये तुम्हाला हे मिश्रण भरायचे आहे. फ्रिजमध्ये आठवडाभरासाठी ठेवून तुम्हाला त्यानंतर ते रोज सकाळी उठून एक चमचा हे चाटण खायचे आहे.

सकाळी रिकाम्या पोटी चहा-कॉफी घेतल्याने होऊ शकतं ‘हे’ नुकसान

लसूण आणि मधाचे चाटण खाण्याचे हे आहेत चमत्कारीत फायदे

1.वजन करते कमी (Help weight loss)

shutterstock

जर तुम्ही वजम कमी करण्याचा विचार करत असाल तर तुम्ही याचे सेवन करायला हवे. तुम्ही रोज सकाळी उठून रिकामी पोटी याचे सेवन केल्याने तुम्हाला अतिरिक्त वजन कमी करण्यास मदत मिळेल. त्यामुळे वजन कमी करण्यासाठी तुम्ही याचे सेवन अवश्य करु शकता. दर दिवशी तुम्हाला या चाटणाचा केवळ चमचा खायचा आहे.तुम्हाला महिन्याभरात तुमच्यातील झालेला बदल जाणवेल.

तुळशीच्या पानांचा वापर करून मिळवा असे लांबसडक केस

2,त्वचा करते चांगली (clear skin)

shutterstock

जर तुम्हाला सुंदर त्वचा हवी असेल तर तुम्ही याचे सेवन करायला हवे. मध आणि लसूणमुळे तुमची त्वचा चांगली होते. तुमच्या त्वचेला आवश्यक असलेले न्युट्रिएटंस तुम्हाला याच्या सेवनातून मिळतात. अँटीफंगल, अँटीबॅक्टेरिअल गूण असल्यामुळे तुम्हाला जर पिंपल्सचा त्रास असेल तरी देखील तुमच्या त्वचेवरील पिंपल्सही त्यामुळे कमी होतात.या शिवाय त्वचेसंदर्भातील अनेक समस्या त्यामुळे कमी होतात.

नारळाच्या तेलाने होतो weight loss, जाणून घ्या कसं

3.हृदयविकार ठेवते नियंत्रणात(Control heart diseases)

shutterstock

हृदयविकाराचा त्रास असलेल्यांनी याचे नित्यनेमाने सेवन करायला हवे. याच्या सेवनामुळे हृदयविकार नियंत्रणात राहतो. त्यामुळे तुम्ही लसूण आणि मधाचे सेवन करायला हवे. (डॉक्टरांचा सल्ला घेऊन तुम्ही याचे सेवन केले तरी चालेल. पण याचा कोणताही विपरीत परिणाम तुमच्या आरोग्यावर होत नाही.)

4.प्रतिकारशक्ती वाढवते (Increase immune system)

shutterstock

तुम्ही सतत आजारी पडत असाल तर तुमची प्रतिकारशक्ती कमी आहे. जर तुम्हाला तुमची प्रतिकारशक्ती वाढवायची असेल तर तुम्ही लसूण आणि मध खायला हवे. त्यामुळे तुमची प्रतिकारशक्ती वाढण्यास मदत मिळते.रोज सकाळी उठल्याबरोबर रिकामी पोटी याचे सेवन करा.

5. पचनशक्ती वाढवते (Improve digestion)

shutterstock

जर तुम्हाला पचनाचा त्रास असेल तर त्यावर मध आणि लसूण रामबाण इलाज आहे. त्यातील पोषकतत्वांमुळे तुमची पचनशक्ती वाढते. जर तुम्हाला सतत अपचन होत असेल तर दिवसातून एकदा तरी हे चाटण खा. याची चव चांगली लागत नसली तरी तुमचे अन्न चांगले पचते.

लसूण आणि मधाची चव जरी चांगली लागत नसली तरी त्याचे फायदे पाहता एक चमचा  तरी याचे सेवन केल्याने तुम्हाला त्याचा फायदा होऊ शकतो.

Read More From Weight Loss