Diet

महिलांनो,तब्येतीच्या या लक्षणांकडे मुळीच दुर्लक्ष करू नका.

Vaidehi Raje  |  Feb 1, 2022
महिलांनो,तब्येतीच्या या लक्षणांकडे मुळीच दुर्लक्ष करू नका.

घराघरातील महिला कायमच स्वतःच्या तब्येतीकडे दुर्लक्ष करताना दिसून येतात. घरातल्या सगळ्यांची काळजी घेता घेता त्यांना स्वतःच्या तब्येतीकडे लक्ष द्यायला वेळच मिळत नाही म्हणा किंवा त्यांच्याकडे स्वतःकडे बघण्यासाठी एनर्जीच उरत नाही. तब्येतीच्या कुरबुरी सुरु झाल्या तरी थोड्यावेळ आराम करायचा, घरगुती उपाय करायचे आणि परत कामाला लागायचे अशीच बहुतेक महिलांची सवय असते. पण स्त्रियांनी तब्येतीकडे दुर्लक्ष केल्याने छोट्या समस्या काही काळातच  गंभीर स्वरूप धारण  करतात. खास करून पस्तिशी चाळिशीतल्या स्त्रियांनी तर पुढील लक्षणांकडे मुळीच दुर्लक्ष करू नये. सतत थकवा वाटणे, कशाचाही उत्साह न वाटणे, अचानक वजन वाढणे, अंगावर सूज येणे, त्वचा खूप कोरडी पडणे, चिडचिड वाढणे, नैराश्य येणे, अचानक हृदयगती वाढल्यासारखे वाटणे ही लक्षणे साधी नसून थायरॉईड ग्रंथी व्यवस्थित काम न करण्याची नांदी असते.

थायरॉईड ग्रंथीचे काय कार्य आहे? 

थायरॉईड ही ही आपल्या शरीरातील अत्यंत महत्वाची ग्रंथी आहे. ह्या ग्रंथीशिवाय आपले मेटाबॉलिजम (चयापचय) , शरीराची वाढ आणि इतर अनेक महत्वाच्या शारीरिक क्रिया व्यवस्थितपणे चालू शकत नाहीत. थायरॉईड ग्रंथीतून स्त्रवणारी संप्रेरके आपल्या शरीरातील अनेक महत्वपूर्ण कार्यांचे नियंत्रण करतात. आपल्या शरीरात सतत थायरॉईड ग्रंथीमधून रक्तात हॉर्मोन्स स्त्रवले जातात. जेव्हा शरीराला जास्त ऊर्जेची गरज असते तेव्हा थायरॉईड ग्रंथीतून जास्त प्रमाणात हॉर्मोन्स रक्तात स्रवले जातात. थायरॉईडमधून टी थ्री ( Triiodothyronine)  , टी फोर (Tetraiodothyronine)आणि  Calcitonin ही संप्रेरके स्रवली जातात. थायरॉईड ग्रंथीचे काम व्यवस्थित चालण्यासाठी शरीरात आहारातून योग्य प्रमाणात आयोडीन जाणे अत्यंत आवश्यक आहे. 

स्त्रियांमध्ये थायरॉईड डिसॉर्डर्सचे प्रमाण लक्षणीय आहे 

तब्बल  चार ते  दहा टक्के स्त्रियांना थायरॉईड डिसऑर्डर होतात असे आढळले आहे. हायपोथायरॉईडीजम किंवा हायपरथायरॉईडीजम हे थायरॉईड डिसऑर्डरचे  प्रकार आहेत. ह्या दोन्हींची लक्षणे पटकन लक्षात येत नाहीत पण आपले शरीर काहीतरी संकेत नक्कीच देते. म्हणूनच ह्या दोन्हींची लक्षणे ध्यानात ठेवली पाहिजेत आणि खालीलपैकी कुठलीही लक्षणे आढळली तर त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे. 

जाणून घ्या थायरॉईडची लक्षणं आणि घरगुती उपाय

थायरॉइडमुळे त्वचा आणि केसांवर होणारे दुष्परिणाम आणि उपाय

थायरॉईड डिसऑर्डरची लक्षणे कोणती आहेत?

थायरॉईड ग्रंथी नीट काम करत नाही ह्याची पुढीलप्रमाणे लक्षणे दिसून येतात.स्त्रियांमधील सगळ्यात महत्वाचे लक्षण म्हणजे मासिक पाळी अनियमित होणे. जेव्हा मासिक पाळी अनियमित होते तेव्हा शरीर आपल्याला संकेत देत असते की आपल्या शरीरात हॉर्मोनल इम्बॅलन्स झाला आहे. तसेच आवाज घोगरा होणे, सतत अंगदुखी जाणवणे , हृदयाचे ठोके कमी होणे ,तापमानातील बदलांचा त्रास होणे, जास्त थंडी वाजणे,  रक्तात कोलेस्टेरॉल आणि ट्रायग्लिसराईड्सचे प्रमाण वाढणे , थकवा, निरुत्साह, अंगावरची सूज, कोरडी त्वचा, वजनात अचानकपणे वाढ होणे ही सगळी लक्षणे हायपोथायरॉईडीजम कडेच इशारा करतात. हायपोथायरॉइडिजम म्हणजे शरीरात थायरॉईड हॉर्मोन्स कमी स्रवले जातात.

तसेच जर शरीरात थायरॉईड हॉर्मोन्स जास्त प्रमाणात स्रवले जात असतील तर शरीर त्याचीही लक्षणे दाखवते. हायपरथायरॉईडीजम मध्ये शरीराचे मेटाबॉलिजम  वाढते आणि  वजन कमी होऊ लागते,  हृदयाचे ठोके जलद होतात आणि ते आपल्याला तीव्रपणे जाणवतात. हृदयाच्या ठोक्यांमध्ये अनियमितता येते. कधी कधी Palpitations चा त्रास सुद्धा जाणवू शकतो. बाहेरचे तापमान थंड असले तरी हायपरथायरॉईडीजम असलेल्या व्यक्तींना सतत घाम येतो आणि उकाडा जाणवतो. 

म्हणूनच यापैकी कुठलीही लक्षणे तुम्हालाही जाणवत असतील तर त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका. त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या आणि तब्येतीची काळजी घ्या. 

अधिक वाचा-

या कारणांमुळे येऊ शकतो अशक्तपणा, त्वरीत करा उपाय

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा  MyGlamm कडून एक मोफत लिपस्टिक

Read More From Diet