आज जागतिक प्रसाधन दिन अर्थात World toilet day…भारतात स्वच्छ प्रसाधनगृह असणं ही एक खूप गरजेची गोष्ट झाली आहे. त्यात महिलांना प्रसाधनगृहासाठी कोणतीच चांगली सुविधा नसते ही एक खूपच मोठी खंत आहे. मात्र जर महिलांसाठी स्वच्छ प्रसाधनगृह…शिवाय या प्रसाधनगृहात सुविधेसोबत चहा- कॉफी, पाण्याची बाटली, सॅनिटरी पॅड्स, सुमधूर संगीत असं सारं काही एकाच छताखाली मिळालं तर… या सुविधा एकत्र मिळण्याच्या ठिकाणास पाश्चात्य देशांमध्ये ‘वुमन्स पावडर रुम’ असं म्हटले जातं. भारतातही अशाप्रकारची पहिली वुमन्स पावडर रुम ‘वुलू’ अर्थात `वुमन्स लू’ सुरू होत आहे. महिलांनी, महिलांसाठी सुरु केलेल्या प्रसाधनगृहाचा लोकार्पण सोहळा (World Toilet Day) जागतिक प्रसाधन दिनानिमित्त 19 नोव्हेंबर 2019 रोजी ठाणे शहरातील पश्चिम रेल्वे स्थानकाजवळ संपन्न झाला. ज्यामुळे महिलांना त्यांच्यासाठी सुसज्ज प्रसाधनगृह मिळालं आहे.
वुमन्स पावडर रुममागची संकल्पना
समाजातील काही प्रतिष्ठित व्यक्तींच्या उपस्थितीत रविवारी 17 नोव्हेंबर 2019 ला यासाठी एक स्नेहभेट आयोजित करण्यात आली होती. यानिमित्ताने ‘वुलू’ या संकल्पनेची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली. लूम ॲण्ड व्हिवर रिटेल्स प्रा.लि या संस्थेचा ‘वुलू’ हा नवउद्यमी प्रकल्प आहे. मनीष केळशीकर या संस्थेचे संस्थापक असून शिवकला मुदलीयार सहसंस्थापिका आहेत. तब्बल 80 लाख प्रवासी दररोज मुंबईत लोकल ट्रेनने प्रवास करतात. त्यामध्ये 41 टक्के महिला प्रवाशांची संख्या आहे. या महिलांना चांगल्या दर्जाचे प्रसाधनगृह उपलब्ध नाहीत. परिणामी त्यांना शारीरिक आणि मानसिक कुचंबनेस त्यांना सामोरे जावे लागते. विशेषत: कार्यालयीन महिलांची अवस्था अत्यंत बिकट आहे. या सगळ्यांचा विचार करून सर्वोत्तम पर्याय म्हणून ‘वुलू’ ही पाश्चात्य संकल्पना आम्ही भारतात पहिल्यांदा आणत आहोत. याचा आनंद आहे. असे मनीष केळशीकर आणि शिवकला मुदलीयार यांनी म्हटले. ‘वुलू’ या महिलांसाठी असलेल्या अनोख्या प्रकल्पाची माहिती जास्तीत जास्त महिलांपर्यंत पोहचावी याकरिता, वुलूच्या वुमन्स पावडर रूम मध्ये काढलेले स्वतःचे फोटोज समाजमाध्यमांद्वारे ‘वुलू’ असे हॅशटॅग वापरून शेअर करण्याचे आवाहन मनीष केळशीकर आणि शिवकला मुदलीयार यांनी केले आहे.
“वुलू” मध्ये महिलांसाठी काय काय असेल
या अत्याधुनिक प्रसाधनगृहात महिलांसाठी अनेक सुविधा पुरवल्या जाणार आहेत. उच्च दर्जाचे प्रसाधनगृह, सॅनिटरी पॅड्स, चहा-कॉफी, शेविंग किट, ब्युटी प्रोडक्ट्स, पाण्याच्या बॉटल्स, सॅनिटायझर, सुमधुर संगीत, चॉकलेट्स अथवा स्नॅक्स या गोष्टी दैनंदिन जीवनात प्रत्येक महिलेसाठी गरजेच्या झाल्या आहेत. लहान मुलांसोबत प्रवास करणाऱ्या महिलांना स्तनपान देण्यासाठी हे हक्काचे ठिकाण असेल. या अशा सुविधांमुळे आता कोणत्याच महिलेला भविष्यात सार्वजनिक ठिकाणी नैसर्गिक विधीसाठी जाण्यास संकोच वाटणार नाही. ज्यामुळे महिलांच्या जीवनशैली आणि आरोग्यात नक्कीच बदल होतील.
हे ही वाचा –
खास तुमच्यासाठी आम्ही घेऊन आलो आहोत #POPxoEverydayBeauty. POPxo Shop’s मध्ये तुम्हाला सुंदर त्वचेसाठी आणि मजबूत केसांसाठी वेगवेगळे प्रोडक्ट मिळतील. जे 100% तुम्हाला रिझल्ट देतील शिवाय हे प्रोडक्ट वापरण्यास फारच सोपे आहे. तुम्ही या प्रोडक्टचा लाभ घ्यावा यासाठी आम्ही तुम्हाला 25% पर्यंतची सूट देणार आहोत. मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo Shop च्या https://www.popxo.com/shop/beauty लिंकवर क्लिक करा.
अधिक वाचा –
प्राउड फादर्स फॉर डॉटर्ससाठी वरळीत खास कार्यक्रम
म्हणूून घरात आवर्जून लावायला हवे धूप, जाणून घ्या फायदे
एका स्पर्शातूनही तुम्हाला कळू शकते व्यक्ती ‘चांगली’ की ‘वाईट’
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje