Recipes

वजन नियंत्रणात ठेवणाऱ्या या सोप्या सूप रेसिपीज, नक्की करुन पाहा

Leenal Gawade  |  Feb 14, 2020
वजन नियंत्रणात ठेवणाऱ्या या सोप्या सूप रेसिपीज, नक्की करुन पाहा

हल्ली फिटनेसच्याबाबतीत सगळेच जण फार सजग झाले आहेत. नेमका आणि योग्य आहाक यासोबतच व्यायाम अशा पद्धतीने हल्ली अनेक जण स्वत:ची काळजी घेतात. चांगल्या आहाराबाबत तुम्हाला शंका असेल तर तुमच्यासाठी आम्ही आज वजन  नियंत्रणात ठेवणाऱ्या काही सूप रेसिपी शेअर करणार आहोत. हे सूप तुमच्यामधील नको ते खाण्याचे क्रेव्हिंग कमी करेल आणि तुम्हाला हेल्दी ठेवण्यास मदत करेल. आज आम्ही शेअर करत असलेल्या रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करुन पाहा.

इडली-डोशाचे बॅटर बिघडत असेल तर तुम्ही करत आहात या चुका

1. क्लिअर व्हेजिटेबल सूप

Instagram

अगदी सोप्या पद्धतीने करता येईल असे व्हेजिटेबल सूप तुमचे वजन तर नियंत्रणात ठेवतेच. पण तुमच्या तोंडालाही त्यामुळे चव येईल. 

साधारण  4 जणांसाठी 

साहित्य : ¼ कप गाजराचे तुकडे, ¼  कप चिरलेला कोबी, ½ कप दूधी, ¼ फ्लॉवर, 1मध्यम कांदा, मॅगी मसाल क्युब चवीसाठी, मिरी पावडर, फरसबी, गाजर, पातीचा कांदा, कोबीआणि ढोबळी  मिरची यांचे बारीक क्युब ( सूपला क्रिस्प मिळण्यासाठी), तेल आणि बटर

कृती: सगळ्या भाज्या कुकरमध्ये घ्या. त्यात साधारण 5 कप पाणी घ्या. मीठ घालून कुकरच्या 5 ते 6 शिट्ट्या काढून घ्या. भाज्या पाण्यातून निथळून काढा. पाणी फेकून देऊ नका. तयार भाज्यांना मिक्सीमध्ये वाटून घ्या. एका भांड्यात तुम्हाला वाटलेल्या भाज्या घेऊन त्यात पाणी टाकायचे आहे. तयार सूप उकळून घेऊन तुम्हाला त्यात चवीनुसार मीठ आणि मिरी पावडर, मॅगी मॅजिक क्युब घालायचे आहे. या सूपला थोडे क्रिस्पी करण्यासाठी तुम्हाला एका पॅनमध्ये थोडे बटर आणि तेल गरम करुन त्यात फरसबी, गाजर, पातीचा कांदा, कोबी, ढोबळी मिरची यांचे बारीक क्युब घालून ते छान खरपूस भाजून घ्यायचे आहेत. या भाज्या थोड्या कुरकुरीतच व्हायला हव्यात. तयार सूपमध्ये या भाज्या घालून तुम्हाला ही डिश सर्व्ह करायची आहे. 

सौजन्य: Poonam’s kitchen

2. चिकन सूप

Instagram

चिकनमध्ये प्रोटीन असते. वजन कमी करण्यासाठी आपण अनेक गोष्टींचे लंघन करत असतो. अशावेळी तुमच्या शरीराला आवश्यक प्रोटीन्स मिळणेही आवश्यक असते. 

साहित्य:  1 कांदा, एक चमचा जिरे, काळी मिरीचे दाणे, कोथिंबीर,आलं-लसूण पेस्ट, हळद, 50 ग्रॅम चिकन 

कृती:  एका मिक्सरच्या भांड्यात उभा चिरलेला कांदा, एक चमचा जिरे, काळी मिरी, कोथिंबीर घेऊन त्याची पेस्ट करुन घ्या. 

एका कुकरच्या भांड्यात तेल घेऊन तेल गरम झाल्यावर त्यात अख्खे जिरे, काळी मिरी, अर्धा बारीक चिरलेला कांदा घेऊन छान परतून घ्या. कांद्याचा कच्चा वास जाण्यासाठी त्यामध्ये आलं-लसूण पेस्ट घाला. त्यात वाटलेल्या कांद्याचे मिश्रण टाका आणि चांगले शिजवून घ्या. त्यात हळद, चवीनुसार मीठ घाला. चिकनचे बारीक बोनलेस तुकडे यामध्ये घाला.  त्यात पाणी घालून कुकर बंद करुन साधारण चार ते पाच शिट्ट्या काढून घ्या. तुमचे चिकन सूप तयार. वर कोथिंबीर घालून सर्व्ह करा तुमचे पौष्टिक चिकन सूप

सौजन्य: Mas cook

अशा पद्धतीने तयारी केलीत तर तुमची बिर्याणी नेहमीच होईल बेस्ट

3. मका आणि मटारचे सूप

Instagram

मका आणि मटारचे सूप हे तुमच्या पोटाच्या आरोग्यासाठी फारच चांगले आहे. 

साहित्य: एक वाटी मटारचे दाणे आणि मक्याचे दाणे, आलं-लसूण (बारीक चिरलेले), एक बारीक चिरलेला कांदा, मीठ, आवश्यकतेनुसार पाणी, लो फॅच बटर, काळी मिरी पावडर 

कृती: एका पॅनमध्ये मटार, मका, आलं-लसूण, कांदा, मीठ आणि भाज्या बुडेल इतके पाणी घालून झाकण लावून भाज्या छान शिजवून घ्या. भाज्या शिजल्यानंतर त्याचे पाणी एका बाजूला काढून घ्या. गाळलेल्या भाज्या मिक्सीमध्ये वाटून त्याची प्युरे करा.  एका भांड्यात एक चमचा लो फॅट बटर घेऊन त्यात भाज्यांची प्युरे घाला. आता त्यात भाज्या शिजवलेले पाणी तुमच्या आवश्यकतेनुसार घाला. अधिक चवीसाठी काळे मिरी पूड, मीठ घालून हे सूप सर्व्ह करा. 

सौजन्य: Fit tak 

4. मसूर डाळीचे सूप

Instagram

डाळींचे सूप ही प्रोटीन युक्त असते त्यामुळे तुम्ही तेही कधी कधी प्यायला हवे. 

साहित्य:  एक वाटी भिजलेली मसूर डाळ, 5 ते 6 लसूणच्या पाकळ्या,लाल तिखट, हळद, मीठ, गरम मसाला, हिरव्या मिरच्या, कोथिंबीर 

कृती: मसूर डाळ साधारण अर्धा तास भिजत ठेवा. एका कुकरमध्ये सगळे साहित्य एकत्र करा. आणि डाळ शिजवून 5 ते 6 शिटट्या काढा. डाळ छान शिजल्यानंतर त्यावर कोंथिंबीर घाला.आवश्यक असल्यास आणखी पाणी घाला. तुमचे सूप तयार.

सौजन्य: Life with amna

5. पालक सूप

Instagram

पालक सूप तर सगळ्यात पौष्टिक. जर तुम्हाला पालेभाज्या आवडत नसेल तर तुम्ही हे सूप नक्की ट्राय करा. 

साहित्य: पालकाची एक जूडी, लसूण, जीरं, मीठ, काळी मिरी पूड

कृती: पालक वाफवून घ्या. मिक्सरमधून काढून त्याची प्युरे करुन घ्या. फोडणीसाठी एका भांड्यात तेल,तूप किंवा बटर घेऊन त्यामध्ये बारीक चिरलेली लसूण, जीरं घालून फोडणी चांगली करुन घ्या. त्यात पालकाची प्युरे घाला. आवश्यकतेनुसार पाणी घालून वरुन काळी मिरी पूड घाला. 

तुमचे पौष्टिक सूप तयार 

आता या इंडियन चवीच्या सूप रेसिपी नक्की प्या आणि वजन नियंत्रणात ठेवा.

 

 

2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.

Read More From Recipes