Celebrity Make Up

या मालिकांमधून आला टिकल्यांचा प्रसिद्ध ट्रेंड, अभिनेत्रींमुळे गाजला ट्रेंड

Dipali Naphade  |  Oct 7, 2020
या मालिकांमधून आला टिकल्यांचा प्रसिद्ध ट्रेंड, अभिनेत्रींमुळे गाजला ट्रेंड

आपल्याकडे बिंदी अर्थात टिकलीला खूपच महत्त्व आहे. वेगवेगळ्या डिझाईन्सच्या आणि आकाराच्या टिकली आपल्याकडे मिळतात. खरं तर श्रृंगाराचा हा एक भागच आहे. पहिल्यांदा महिला केवळ कुंकू किंवा रोली, सिंदूरने आपल्या कपाळावर गोलाकार टिकली लावत असत. पण नंतर अनेक फरक होत गेले. त्यातही बऱ्याच हिंदी मालिकांमधून वेगवेगळ्या टिकलीच्या स्टाईल्स आणि डिझाईन्स आल्या आणि या मालिकांमधून आलेला हा टिकल्यांचा ट्रेंड प्रसिद्ध झाला.  त्यापैकीच अशा काही अभिनेत्री ज्यांनी टिकल्यांचा हा ट्रेंड अधिक प्रसिद्ध करण्यासाठी हातभार लावला. या अभिनेत्रींची पात्र इतकी गाजली की त्यांची प्रत्येक स्टाईल ही ट्रेंड बनली. या टिकली प्रत्येक वेळी आयकॉनिक बनल्या. कोणत्याही कार्यक्रमांना जाताना आपल्यालाही अशाच डिझाईन्सच्या टिकली हव्यात असं बऱ्याच महिलांनाही वाटू लागलं.  अशाच काही अभिनेत्री आणि त्यांच्या टिकल्यांच्या ट्रेंडबद्दल जाणून घेऊया. 

चंद्रकांता

90 च्या दशकात गाजलेली मालिका म्हणजे चंद्रकांता. सुपरनॅचरल पावर असणारी यातील पात्रही तितकीच गाजली. केवळ कॉन्सेप्टसाठीच नाही तर यातील प्रत्येक पात्र हे प्रसिद्ध झालं होतं. या शोमधील अगदी वेशभूषेपासून ते मेकअपपर्यंत सगळ्याच गोष्टी गाजल्या होत्या. चंद्रकांताची भूमिका साकारणारी शिखा स्वरूप आणि दुर्गा जसराज या दोघींच्या टिकल्या खूपच गाजल्या होत्या. अगदी आयकॉनिक बनल्या होत्या.  केवळ शिखा स्वरूप आणि दुर्गाच नाही तर यामध्ये काम केलेल्या इरफान खाच्या भूमिकेलादेखील वेगवेगळे तिलक आणि टिकल्या देण्यात आल्या होत्या आणि त्यादेखील गाजल्या होत्या. 

शांती

90 च्या दशकात दुसरी प्रसिद्ध झालेली मालिका म्हणजे शांती. मंदिरा बेदीची सर्वात पहिली गाजलेली मालिका. त्यावेळी शाळा आणि महाविद्यालयात जाणाऱ्या तरूणींना मंदिरा बेदीचा लुक खूपच भावला होता. कारण त्यावेळी मालिकांमध्ये महिलाप्रधान आणि स्ट्राँग  अशा भूमिका फारच कमी असायच्या. शांती ही व्यक्तिरेखा प्रसिद्ध होण्यामागे मंदिराचा जितका वाटा आहे तितकाच तिच्या साडी आणि टिकल्यांच्या लुकचाही आहे. लांब बाणाच्या आकाराची टिकली ही त्यावेळी खूपच प्रसिद्ध होती. प्रत्येक मुलीला आपल्याला ही टिकली लावायची आहे असंच वाटायचं.  

ब्राईट नेलपॉलिशचा नवा ट्रेंड, तुम्ही वापरले आहेत का हे रंग

कसौटी जिंदगी की

Instagram

सात वर्ष टेलिव्हिजन दणाणून सोडलेली मालिका म्हणजे कसौटी जिंदगी की. यातील कोमोलिकाची भूमिका साकारणारी उर्वशी आजही प्रेक्षकांच्या लक्षात आहे आणि तिच्याशिवाय ही भूमिका कोणीच चांगली करू शकत नाही असंच बऱ्याच जणांचं म्हणणं आहे. त्यावेळी उर्वशीने केलेली ही भूमिका आणि त्यातील तिचा लुक हा विशेषतः गाजला तो तिने लावलेल्या वेगवेगळ्या टिकल्यांमुळे. प्रत्येक वेळी वेगवेगळ्या डिझाईन्सच्या टिकल्या आणि कपाळावर मोठमोठ्या टिकल्या असा ट्रेंडच त्यावेळी आला होता. मोठ्या, हेव्ही, एम्बेलिश्ड आणि ड्रमॅटिर अशा टिकल्या उर्वशीने या मालिकेत लावल्या होत्या. 

लग्नात सुंदर दिसण्यासाठी वाढतोय कलर्ड लेन्सचा ट्रेंड

नागिन

ही मालिका तर संपूर्णतः ड्रामा आणि अतिशयोक्ती आणि फिक्शन याने भरलेली असल्यामुळे यातील कलाकारांच्या टिकल्या कशा काय साध्या असू शकतील. नागिनच्या पहिल्या सीझनमध्ये अर्जुन बिजलानीच्या आईची भूमिका साकारलेल्या सुधा चंद्रन यांचा लुक हा नेहमीच अप्रतिम असतो. या मालिकेतही त्यांनी लावलेल्या टिकल्या तितक्याच गाजल्या. सुधा चंद्रन यांनी या मालिकेत मोठमोठ्या गोल आकाराच्या टिकल्यांसह वेगवेगळ्या डिझाईन्सच्या टिकल्या लावल्या. अगदी सापाच्या आकाराची टिकलीही लावली. या टिकल्याही खूपच ट्रेंडमध्ये आल्या होत्या. 

खादी – कायम टिकणारी फॅशन, नेहमीचा ट्रेंड

साथ निभाना साथिया

सध्या इंटरनेटवर जर कोणी अधिक ट्रेंड करत असेल तर ती म्हणजे कोकिला मोदी (kokila modi). रसोडे में कौन था या यशराज मुखातेच्या गाण्यानंतर पुन्हा एकदा ट्रेंडमध्ये आलेली साथिया साथ निभाना मालिकेतील कोकिला मोदी हीदेखील नेहमीच तिच्या वेगवेगळ्या आणि अतरंगी टिकल्यांसाठी ट्रेंडमध्ये राहिली आहे. संपूर्ण कपाळभर अगदी केसांपर्यंत  इतकी मोठी लांब टिकली या भूमिकेमध्ये रूपल पटेलने लावली होती. त्यामुळे सतत सुनांवर हुकूम चालवणारी आणि उंच पट्टीत बोलणारी कोकिला नेहमीच प्रेक्षकांच्या लक्षात राहिली आहे. पण तिची टिकली चांगलंच लक्ष वेधून घेते हे नक्की. 

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From Celebrity Make Up