बाथ अॅंड बॉडी
म्हणून येथील त्वचा काळवंडते, जाणून घ्या या मागील कारणे आणि उपाय (How To Whiten Vaginal Area In Marathi)
सूर्याच्या किरणांमुळे शरीरावरील उघडा भाग काळवंडतो हे आपल्याला माहीत आहे. पण सूर्यप्रकाश कधीही न लागणारी जागा देखील शरीराच्या इतर भागांच्या तुलनेत काळी असते. यात जांघ, योनी आणि पृष्ठभागाचा समावेश होतो. हा भाग अधिक काळा का?, ही त्वचा शरीरातील इतर त्वचेच्या तुलनेत इतकी वेगळी का? असा प्रश्नही अनेकांना पडत असेल तर त्वचा काळवंडण्यामागील कारणे देखील तुम्हाला माहीत हवीत. ती कारणे माहीत पडली की, तुम्ही त्यावर झटपट उपायही करु शकता.
योनीजवळील त्वचा काळवंडण्याची कारणे (Causes Of Dark Skin Around Vagina)
1. त्वचा काळवंडण्याचे पहिले कारण म्हणजे स्थूलपणा. अनेकदा चालताना मांड्या मांड्यांवर घासल्या जातात. यासाठी कारणीभूत असते मांड्यांवरील वाढलेले मांस. स्थूल मांड्यांच्या घर्षणामुळे हा भाग काळा पडत जातो. त्याकडे दुर्लक्ष केल्यास तो भाग अधिक काळा होत जातो.
2. योनीची माहिती जाणून घेताना योनीवरील केस काढण्यासाठी अनेकजण रेझर किंवा हेअर रिमूव्हल क्रिम वापरतात हेदेखील माहीत हवे. रेझर फिरवल्यामुळे त्या ठिकाणी केस जाड होतात. त्वचेखाली ते केस राहिल्यामुळे त्वचा अधिक काळी दिसते. योनी हा अत्यंत नाजूक भाग असल्यामुळे तेथील केस काढताना वापरले जाणारे केमिकल मिश्रित हेअर रिमूव्हल क्रिम त्वचेला जाळते. त्यामुळे देखील येथील त्वचा काळी पडते.
3. घाम हे देखील त्वचा काळवंडण्याचे कारण आहे. काही जणींना खूप घाम येतो. तो घाम तसाच राहिला तर येथील त्वचा बदलत जाते. अनेकदा ओल्यामुळे जांघ आणि योनीकडच्या भागावर खाज येऊ लागते. त्वचा नाजूक असल्यामुळे त्वचेवर रॅशेश येतात आणि ही त्वचा इतर त्वचेच्या तुलनेत काळी दिसू लागते.
4. घट्ट कपडे देखील या मागचे कारण असू शकते. शरीरावरील हा भाग सगळ्यात जास्त झाकोळलेला असतो. तंग कपड्यामुळे या ठिकाणी म्हणावी तितकी हवा जात नाही. त्यामुळे सुद्धा ही त्वचा काळवंडते.
5. मासिक पाळीच्या काळात वापरले जाणारे सॅनिटरी पॅडही यासाठी कारणीभूत असू शकते. कारण काही जणी सॅनिटरी पॅड संपूर्ण दिवस वापरतात.त्यामुळे रात्रीपर्यंत सॅनिटरी पॅडचा चोळा-मोळा होतो आणि ते जांघेत रुतायला लागतात. जर त्वचा नाजूक असेल तर जांघेत आणि पृष्ठ भागावर जखमा होण्याची अधिक शक्यता असते.
6. योनी, जांघ आणि पृष्ठ भाग काळवंडण्याचे कारण औषधे देखील असू शकतात. औषधे शरीरातील हार्मोन्सवर परिणाम करत असतात त्यामुळे देखील हा भाग काळवंडतो.
काळवंडलेली त्वचा नितळ करण्याचे काही उपाय (Tips To Lighten Skin Tone Around Vagina)
1. तुम्ही कितीही व्यग्र असाल तरी देखील मांड्या कमी करणारे व्यायामप्रकार घरच्या घरी रात्री झोपताना देखील करु शकता. सीझर्स, सुमो स्क्वॉटस, बट ब्रीज, साईड लेग अप या सारखे व्यायाम करु शकता. हे व्यायाम प्रकार अगदी सोपे आहेत आणि त्या छान झोपताना बेडवर पडून करता येऊ शकता.
2. योनीवरील केस काढताना एखादा माईल्ड फोम वापरा आणि त्यानंतर रेझर वापरा. योनीवरील केस व्यवस्थित निघतील. वारंवार रेझर फिरवावा लागणार नाही. त्यामुळे तेथील त्वचेवर रॅशेश येणार नाहीत. त्यामुळे त्या ठिकाणी येणाऱ्या पुळ्या कमी होतील आणि त्वचा काळवंडणेदेखील कमी होईल.
3. काहींना सतत घाम येतो. त्यामुळे अशांनी आतल्या भागाची विशेष काळजी घेणे गरजेचे असते. शक्य असेल तितक्यावेळा तुम्ही तुमच्या योनीकडील भाग पुसून काढा. लघवीला गेल्यानंतर टिश्यूने हा भाग कोरडा करा. सकाळी आंघोळीच्यावेळी इंटिमेट वॉश वापरा. त्यामुळे त्वचा कोरडी राहते. त्यावर माईल्ड टाल्कम पावडर वापल्यास सुगंधही चांगला राहतो.
4. मासिक पाळीच्या काळात सॅनिटरी पॅड दर तीन ते चार तासांनी बदला. कॉटन सॅनिटरी पॅड सगळ्यात उत्तम. या शिवाय आतील कपडे निवडताना ते कॉटनचे असल्यास उत्तम.
5. वरील उपायांसोबत काही घरगुती उपाय येथील रक्तपुरवठा पूर्ववत करुन ही त्वचा उजवण्यास मदत करु शकतात. हे उपाय खालील प्रमाणे –
- खोबरेल तेल आणि लिंबाचा रस एकत्र करुन ते जांघ, पृष्ठभागावर लावा. अगदी हलक्या हाताने तेथे मसाज करा आणि छान आंघोळ करा. आठवड्यातून ३ वेळा असे करण्यास काहीच हरकत नाही.
- साखरेचे दाणे हे एक उत्तम स्र्कब आहे. १ चमचा लिंबाचा रस, २ चमचे साखर, १ चमचा मध एकत्र करुन ते जांघ आणि पृष्ठभागावर चोळा. या भागावरील मृत त्वचा निघून जाईल. स्क्रब केल्यानंतर काही काळासाठी जळजळ होऊ शकते. म्हणून स्र्कब शक्यतो सुट्टीच्या दिवशीच करा. कारण त्यानंतर तुम्ही छान आराम करु शकाल. हे आठवड्यातून दोनदा तरी कराच.
- बेकिंग सोडा मास्क हा देखील एक चांगला पर्याय आहे. १ चमचा बेकिंग पावडर आणि पाणी एकत्र करा. तयार मास्क लावून ठेवा. १० मिनिटांनी धुवून टाका. तुम्हाला लगेचच फरक जाणवेल.
- अॅलोवेरा जेल देखील चांगला पर्याय आहे. मांड्या घासून जळजळ झाली असेल. तर त्याभागाला थंडावा देण्याचे काम अॅलोवोरा जेल करु शकते. ही जेल लावल्यानंतर धुण्याची काहीच गरज नाही. या मुळे त्वचा उजळण्यास मदत होईल. शिवाय येथील शुष्क त्वचा तजेलदार होण्यास मदत होईल.
पुढे वाचा –
टीप – हे सगळे उपाय एकाचवेळी करु नका. जर तुम्ही स्क्रब आणि मसाजचा पर्याय निवडत असाल तर मास्क आणि अॅलोवेरा जेल वापरु नका.