आरोग्य

सतत च्विंगम चघळणं पडेल महागात, जाणून घ्या दुष्परिणाम

Trupti Paradkar  |  Jan 31, 2022
सतत च्विंगम चघळणं पडेल महागात, जाणून घ्या दुष्परिणाम

च्विंगम खाणं योग्य की अयोग्य असा प्रश्न जर तुम्ही कोणाला विचारला तर तुम्हाला प्रत्येकाकडून निरनिराळं उत्तर मिळेल. कारण काहींना च्विंगम खाण्याची आवड असेल तर काहींना त्याबद्दल फारसं माहीतदेखील नसेल. यासाठीच या प्रश्नाचं योग्य उत्तर जाणून घेणं खूप गरजेचं आहे. कारण आजही पन्नास टक्क्याहून अनेक लोकांना च्विंगम खाणं खूप आवडतं. काही लोक टाईमपास करण्यासाठी तर काही लोक स्टाईल म्हणून च्विंगम चघळत असतात. च्विंगम खाण्याचे दुष्परिणाम जाणवू लागल्यानंतर यावर अनेक संशोधनं सुरू आहे. मात्र अजूनही अनेकजण याबाबत अंधारात आहेत. यासाठी जाणून घेऊ या च्विंगम खाण्याचे काही दुष्परिणाम 

च्विंगम खाण्यामुळे नेमके काय होतात दुष्परिणाम 

तुम्ही नियमित च्विंगम खात असाल तर तुम्हाला च्विंगमचे होणारे दुष्परिणाम माहीत असायलाच हवेत.

Is Chewing Gum Good or Bad For Your health

जबड्याचा विकार 

च्विंगम हा खाण्याचा पदार्थ नसून चघळण्याचा पदार्थ आहे. त्यामुळे तोंडाला चांगला सुंगध यावा, टाईमपास अथवा स्टाईल म्हणून काही लोक सतत च्विंगम चघळत राहतात. मात्र याचा वाईट परिणाम तुमच्या जबड्याच्या स्नायूंवर होतो. च्विंगम चघळताना सतत वापर झाल्यामुळे तुमच्या जबड्याचे स्नायू आणि हाडे थकतात आणि असंतुलित होतात. ज्याचा परिणाम पुढे जबड्याचे गंभीर विकार होण्यावर होऊ शकतो. 

दातांच्या समस्या 

च्विंगम सतत चघळण्यामुळे तुमच्या दातांवर असलेले संरक्षक कवच म्हणजेच टूथ एनॅमल नष्ट होते. च्विंगम चघळण्याची सवय लागल्यामुळे तुमची अन्न चावण्याची पद्धत बदलते. ज्याचा परिणाम दातांच्या संरचनेवर होतो आणि दातांची ठेवण बदलण्याचा धोका निर्माण होतो. दात संवेदनशील होतात आणि दातांचे विकार वाढू लागतात. 

डोकेदुखी 

डोकेदुखीची अनेक कारणं असू शकतात. मात्र सतत च्विंगम चघळणे हे त्यापैकी एक असू शकते. जर तुम्हाला सतत डोकेदुखीचा त्रास होत असेल तर तुम्हाला च्विंगम खाणे त्वरीत बंद करणे गरजेचं आहे. कारण च्विंगम खाण्यामुळे तुमच्या जबडा आणि त्याजवळील स्नायूंवर ताण येतो ज्यामुळे तुमचे डोके दुखू शकते. 

त्वरीत परिणामासाठी करा डोकेदुखी घरगुती उपाय (Dokedukhi Var Gharguti Upay)

दात किडणे

च्विंगम खाण्यामुळे तुमचे दात लवकर कीडतात. कारण  च्विंगममध्ये मोठ्या प्रमाणावर साखर आणि सुगंध वापरण्यात येतात. जर तुम्ही सतत च्विंगम चघळत असाल तर त्यातील गोड घटक तुमच्या दातात अडकतात आणि तुमचे दात लवकर कीडतात. 

जाणून घ्या दात दुखीवर घरगुती उपाय (Home Remedies For Toothache In Marathi)

अपचनाचा त्रास 

अनेक लोकांना च्विंगम खाण्यामुळे अपचनाचा त्रास जाणवतो. कधी कधी यामुळे उलटी, चक्कर आणि पोटदुखीचा त्रास वाढू शकतो. कारण च्विंगम चघळणे अथवा त्यापासून तोंडात फुगे तयार करणे या प्रक्रियेमध्ये मोठ्या प्रमाणावर हवा तुमच्या तोंडावाटे आत जाते. ज्यामुळे तुमच्या पोटात अती प्रमाणात गॅस निर्माण होतो. ज्यामुळे तुम्हाला चक्कर, मळमळ, अपचनाचा त्रास होण्याची शक्यता वाढते. 

पोटातील दुखणे कमी करण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies For Stomach Pain In Marathi)

Read More From आरोग्य