लग्नसराई

ईशा आणि आनंदचा ‘शाही विवाहसोहळा’

Trupti Paradkar  |  Dec 12, 2018
ईशा आणि आनंदचा ‘शाही विवाहसोहळा’

उदयपूरमधील ग्रॅन्ड ‘प्रि-वेडींग’ सेलिब्रेशननंतर बुधवारी मुंबईत ईशा अंबानी आणि आनंद पीरामल विवाहबद्ध झाले. भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची लाडकी कन्या ‘ईशा’चा विवाहसोहळा धुमधडाक्यात पार पडला. हा शाही विवाहसोहळा मुकेश अंबानी यांच्या मुंबईतील ‘अॅन्टीलिया’ या निवासस्थानी झाला.

अशी झाली या ‘बिग फॅट इंडीयन’ विवाहसोहळ्याला सुरुवात…

बुधवारी दुपारी तीनच्या सुमारास ‘आनंद पीरामल’ आपल्या परिवारासह वरात घेवून अंबानीच्या घरी आले. अंबानी कुंटुबाने पीरामल परिवाराचे अगदी जल्लोषात स्वागत केले. मुकेश अंबानी यांनी लेकीच्या वरातीने मध्ये अगदी डान्स देखील केला. वरातीच्या स्वागतासाठी आकाश आणि अनंत आवर्जून उपस्थित होते. अनंत अंबानी घोड्यावर स्वार झालेले आढळुन आले.

ईशा आणि आनंद यांचा लग्नातील पेहराव

ईशा अंबानी आणि आनंद अंबानी लग्नाच्या जोड्यामध्ये फारच सुंदर दिसत होते. ईशाच्या पारंपरिक पेहरावातून तिचे नवरीचे रुप तर अगदीच खुलून आले होते. ईशाने लग्नामध्ये मल्टीकलर लेंहगा परिधान केला होता  तर आनंद पिरामल यांनी ईशाच्या लेंहग्याला साजेश्या रंगसंगतीची शेरवानी परिधान केली होती. दोघांच्या गळ्यामध्ये हिरव्या रंगाची वरमाला दिसत होत्या. लग्नाचे विधी सुरु असताना देखील दोघं अतिशय खूश दिसत होते. सहजीवन सुरू झाल्याचा आनंद त्यांच्या चेह-यावरुन ओसंडून वहात होता.या शाही लग्नसमारंभासाठी अंबानी परिवाराने देखील खास जोधपूरी पारंंपरिक पेहराव परिधान केला होता

या शाही विवाहासाठी 700 कोटींचा खर्च

ईशाच्या लग्नासाठी अंबानींचे  27 मजली ‘अॅन्टालिया निवासस्थान’ अगदी शाही पद्धतीने सजविण्यात आले होते. आठवडाभर अॅन्टालियामध्ये ही ग्रॅन्ड सजावट करण्यात येत होती. या विवाहसोहळ्यासाठी मुकेश अंबानी यांनी तब्बल 700 कोटींचा खर्च केल्याचा अंदाज व्यक्त होत आहे.

लग्नात जवळजवळ 600 सेलिब्रेटी हजर होते

अंबानीच्या या हाय प्रोफाईल विवाहसोहळ्यासाठी बॉलीवूड, राजकारण, उद्योगपती अशा देशविदेशातील एकुण 600 सेलिब्रेटीजनी उपस्थिती लावली.अमेरिकेचे माजी राष्ट्रपती बिल क्लिंटन यांच्या पत्नी हिलरी क्लिंटन, प्रणव मुखर्जी, बच्चन परिवार, सचिन तेंडुलकर,अमिरखान अंबानींच्या आनंदात सामील झालेे होते.

फोटोग्राफर-सचिन

फोटोसौजन्य-इन्स्टाग्राम

Read More From लग्नसराई