लग्नसराई

ईशा अंबानीच्या शाही संगीत सोहळ्यातील खास फोटो आणि व्हिडीओज

Aaditi Datar  |  Dec 9, 2018
ईशा अंबानीच्या शाही संगीत सोहळ्यातील खास फोटो आणि व्हिडीओज

मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांची मुलगी ईशा अंबानी (Isha Ambani) हीच लग्न 12 डिसेंबरला आनंद पिरामल याच्याशी मुंबईत होणार आहे. या दोघांच्या लग्नाचे भव्यदिव्य प्री वेंडीग फंक्शन्स सध्या उदयपूरच्या प्रसिद्ध हॉटेल ऑबेरॉय उदय विलासमध्ये सूरु आहेत.

शाही संगीताची रंगतदार संध्याकाळ
ईशा अंबानीच्या लग्नात मुकेश अंबानी यांनी कोणतीही कसर ठेवली नाही. लेक कोमो येथे ईशा आणि आनंदचा साखरपुडा पार पडल्यानंतर उदयपूरमध्ये धूमधडाक्यात प्री वेडींग फंक्शन्स सुरू आहेत.

ईशा- आनंदचा संगीत सोहळ्यातील लुक

ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या जीवनातील नव्या प्रवासाला सोहळ्याचं सुंदर रूप देण्यात आलं आहे. साखरपुड्यापासून ते प्री वेडींग फंक्शन्सपर्यंत सर्व सोहळे अगदी बघण्यासारखे आहेत. या संगीत सोहळ्यासाठी ईशा अंबानीने गुलाबी रंगाचा लेहंगा घातला होता तर आनंद पिरामलने गोल्डन कलरची शेरवानी घातली होती. खास गोष्ट अशी की, या सोहळ्याची बहुतेक सजावट ही याच रंगांमध्ये होती.

नीता अंबानींची कृष्णभक्ती

आपली मुलगी ईशाच्या लग्नाच्यानिमित्ताने आई नीता अंबानी आपली सर्व हौस पूर्ण करत आहेतच. पण या निमित्ताने त्यांनी पुन्हा एकदा आपल्या कृष्णभक्तीचे ही दर्शन सर्वांना घडवले. ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांच्या प्री-वेडींग फंक्शनमध्ये बॉलीवूड डान्स आधी नीता अंबानी यांनी काही कृष्णभक्तीची नृत्य सादर केली. पाहा हे व्हिडीओज –

मुलीच्या संगीतात आईबाबांचा खास परफॉर्मन्स

आपल्या मुलीच्या संगीत सोहळ्याला चारचांद लावले ते मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांच्या बहारदार परफॉर्मन्सने. आपल्या लाडकीच्या संगीत सोहळ्यात दोघांनीही खास बॉलीवूडचा किंग खान शाहरूखच्या गाण्यांवर रोमॅंटीक डान्स केला. मुकेश अंबानी आणि नीता अंबानी यांनी जब तक है जान’ या चित्रपटाच्या टायटल सॉंगवर जबरदस्त डान्स केला.

तसंच नीता अंबानी यांनी आपले दोन्ही मुलगे आकाश अंबानी आणि अनंत अंबानी यांच्याबरोबर ‘कल हो न हो’ मधलं गाणं ‘माही वे’ वरसुद्धा परफॉर्म केलं.

संगीत सोहळ्यावर किंग खानची जादू

या संगीत सोहळ्यामध्ये अंबानी कुटुंबियांवर सर्वात जास्त प्रभाव दिसला तो शाहरुख खानचा. अंबानी आणि किंग खान यांची चांगलीच जवळीक आहे. म्हणूनच की काय, मुकेश अंबानी यांच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्याने शाहरुखच्या लोकप्रिय गाण्यांवर डान्स केला. तसंच शाहरूख खान आणि गौरी खान यांचाही डान्स करतानाचा फोटो व्हायरल झालाय. तसंच इतरी बॉलीवूड सेलेब्सनी बहारदार नृत्य केली. 

उत्सवमूर्ती जोडी ईशा आणि आनंद यांचा खास डान्स

या सोहळ्याच्या उत्सवमूर्ती ईशा अंबानी आणि आनंद पिरामल यांनी ही डान्स करत संगीत सोहळ्याला चारचांद लावले. तर या संगीतात नवीन जोड्या म्हणजेच ईशाच्या भाऊ आणि वहीनीने ही डान्स केला. आकाश अंबानी आणि श्लोका मेहताने शाहरूखच्या ‘मेरे मौला मौला मेरे’ या गाण्यावर डान्स करून सगळ्यांचं मन जिंकलं.

8 डिसेंबरच्या भव्य संगीत सोहळ्यानंतर 9 डिसेंबरला  अंबानी आणि पिरामल कुटुंबियांनी एका कार्निवलचे आयोजन केले आहे. यामध्ये पाहूण्यांसाठी खास खेळ आणि इतर पारंपारिक कार्यक्रमांची व्यवस्था करण्यात आल्याचं कळतंय.

या लग्नासाठी देशातूनच नाहीतर विदेशातूनही अनेक प्रसिद्ध व्यक्ती उदयपूरमध्ये दाखल झाल्या आहेत.  या खास प्री वेडींग फंक्शन्ससाठी आलेल्या पाहुण्यांच्या यादीत हिलरी क्लिंटन, रतन टाटा, सचिन तेंडुलकर, साक्षी धोनीपासून शाहरुख खान (Shah Rukh Khan), विद्या बालन, सलमान खान, करिश्मा कपूर, जान्हवी कपूर यासारखे अनेक बॉलीवूड सेलेब्स आहेत.

फोटो आणि व्हिडीओ सौजन्य : इन्स्टाग्राम/ विरल भयानी

Read More From लग्नसराई