Weight Loss

पोटावरील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते खास ड्रिंक

Dipali Naphade  |  Aug 19, 2020
पोटावरील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर ठरते खास ड्रिंक

बऱ्याचदा शरीरावरील इतर ठिकाणी जमा झालेली चरबी ही व्यायामाने पटकन कमी होते. मात्र पोटावरील जिद्दी चरबी कमी होण्यासाठी खूपच प्रयत्न करावे लागतात. तुम्हाला जिममध्ये न जाता वजन कमी करायचं असेल आणि पोटावरील चरबी कमी करायची असेल तर आम्ही तुम्हाला एका खास ड्रिंकबाबत सांगणार आहोत. तुमच्या शरीरातील चरबी कमी करण्यासाठी या ड्रिंकचा तुम्ही उपयोग करून घेऊ शकता. तुम्हाला कोणताही दुष्परिणाम यामुळे जाणवणार नाही आणि मुळात हे नैसर्गिक पदार्थांपासून बनले असल्यामुळे याचा परिणामही चांगला शरीरावर चांगला होतो. आता तुम्हाला नक्कीच उत्सुकता वाटली असणार की असं हे कोणतं ड्रिंक आहे आणि ते कशापासून तयार होतं? तर हो आम्ही तुम्हाला याबाबत अधिक माहिती नक्कीच देत आहोत. कोणतं खास ड्रिंक आहे हे? हे आहे खास गुळ आणि लिंबापासून बनलेले ड्रिंक. जाणून घेऊया काय आहे याचे वैशिष्ट्य आणि कसे ठरते फायदेशीर. 

बेली फॅट नियंत्रणात आणून परफेक्ट फिगरसाठी ‘हे’ आहेत सोपे उपाय

काय आहे हे खास ड्रिंक?

Instagram

गुळ आणि लिंबापासून बनलेले हे खास ड्रिंक आहे. हे दोन्ही पदार्थ आपल्या स्वयंपाकघरात अगदी सहजतेने मिळतात. गुळ आणि लिंबामध्ये वेगवेगळी तत्व आढळतात जी शरीराला फायदेशीर ठरतात. यामुळे आपल्या शरीराला विटामिन सी आणि पाणी दोन्ही मिळते. ज्यामध्ये जिंक आणि अँटिऑक्सिडंट्सचे गुणही आढळतात. त्यामुळे कॅलरी काऊंटदेखील घटते जे चरबी घटविण्यासाठी महत्त्वाचे समजण्यात येते आणि आपल्या शरीरातील प्रतिकारशक्ती (Immunity Booster Drink) वाढण्यासही यामुळे मदत होते. विटामिन सी आणि अँटिऑक्सिडंट्स हे उत्तम समीकरण असून प्रतिकारशक्ती वाढविण्यास याची मदत मिळते. हे पेय प्यायल्याने तुम्हाला पोटावरली चरबी हटविण्यास मदत मिळते. कारण यामुळे पोट भरल्यासारखे राहून भूकही कमी लागते. केवळ चरबी कमी होत नाही तर दिवसभर तुमच्या शरीराला यामुळे ऊर्जाही मिळते. गुळ हा ऊर्जेसाठी उत्तम पदार्थ आहे. त्यामुळेच तुम्ही नेहमी याचा वापर करावा. 

ज्या व्यक्तींचे बसून जास्त काम असते अथवा ज्या व्यक्तींना व्यायाम करण्यासाठीही वेळ मिळत नाही. त्यांनी याचा वापर नक्की करावा. पोटावरील चरबी एकदा वाढू लागली की ती कमी करणं फारच कठीण होऊन जातं. त्यामुळे वेळची तुम्ही सकाळी उठल्यानंतर या पेयाची सवय लाऊन घेणे उत्तम. मुळात यामध्ये काहीही शरीराला अपाय होण्यासारखे घटक नाहीत. तसंच लिंबू आणि गुळ या दोन्ही पदार्थांची चव उत्तम असल्याने  तुम्हाला हे पेय पिण्यासाठीही त्रास होणार नाही. 

पोटातील चरबी आणि वजन कमी करण्यासाठी फायदेशीर आहे पपई

कसे बनवाल गुळ आणि लिंबाचे ड्रिंक

पोटावरील चरबी घटवण्यासाठी करा 4 सोपे उपाय

घराबाहेर न पडता काहीतरी नवीन शिकायचं आहे. तर POPxo तुम्हाला देत आहे ही संधी. #POPxoLive जॉईन करा आणि तज्ज्ञांकडून शिका काही हटके गोष्टी. तर मग वाट कसली पाहताय लगेचच POPxo अॅप डाऊनलोड करा.
आमचे POPxo अॅप डाऊनलोड करण्यासाठी या लिंकवर https://popxo.app.link/9irZMGx6i5 क्लिक करा  

Read More From Weight Loss