Recipes

चिंच-गुळाची अशी चटणी कराल तर स्वयंपाकात असा होईल तिचा वापर

Leenal Gawade  |  Aug 17, 2020
चिंच-गुळाची अशी चटणी कराल तर स्वयंपाकात असा होईल तिचा वापर

भाजी- आमटी अशा अनेक पदार्थांमध्ये आपण चिंच- गुळाचा वापर करतो. पण अनेकदा चिंच गुळाचा वापर करताना चिंच भिजत घालणे त्याचा कोळ काढणे…. गुळाचा ढेप काढून तो चिरुन घालणे यामध्ये बरेचदा खूप वेळ निघून जातो. जर तुम्हाला हा वेळ घालवायचा नसेल आणि चवही हवी असेल तर तुमच्यासाठी आम्ही झटपट अशी चिंच- गुळाची चटणी रेसिपी आणली आहे. खूप जण अशी चटणी घरात करुन ठेवत असतील. पण काहींना अजून ही ट्रिक माहीत नाही. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला चिंच- गुळाची अशीच चटणी कशी करायची ते सांगणार आहोत. ही चटणी बरेच दिवस टिकते. शेवपुरी, भेळपुरी, पाणीपुरी करताना ही चटणी झटपट वापरता येते. चला मग करुया सुरुवात 

बेकिंग सोडा आणि बेकिंग पावडरमध्ये काय आहे फरक

अशी करा चिंच-गुळाची चटणी

Instagram

चिंच-गुळाची चटणी करण्यासाठी तुम्हाला फक्त दोनच साहित्याची गरज आहे ती म्हणजे चिंच आणि गुळ.. चला तर मग आता बघुया ही चटणी नेमकी कशी करायची 

टिप:  चटणी करताना ती खूप घट्ट होणार नाही याची काळजी घ्या. कारण ही चटणी खूप घट्ट झाली की, ती पाकासारखी होते. ही चटणी वापरताना तुम्हाला सतत त्यामध्ये पाण्याचा वापर करावा लागतो किंवा तुम्हाला चटणीचा कमी वापर करावी लागेल. 

अप्रतिम चवीच्या स्मूदी बनवा घरच्या घरी, स्मूदी रेसिपीज जाणून घ्या

खजूराचाही करु शकता वापर

Instagram

ही चटणी करत असताना अर्धा कप चिंच, 1 कप खजूर, 1 कप गुळ याचाही वापर करु शकता.  खजूरामुळेही चटणीचा स्वाद चांगला येतो. तुम्हाला या चटणीला अधिक चांगले करायचे असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडे जिरे किंवा ओवा घाला. तुमची चटणी अधिक चांगली लागेल. 

या पदार्थांमध्ये करु शकता वापर

चिंच- गुळाची चटणी तुम्हाला अनेक पदार्थांसाठी वापरता येते. अळुवडी, भरलेले कारले, भरलेली वांगी, पाणीपुरी,शेवपुरी, रगडापुरी यासगळ्यामध्ये तुम्हाला चिंच- गुळ लागते. अशावेळी तुम्ही झटपट चटणी घालू शकता. या चटणीमुळे तुमच्या प्रत्येक पदार्थांची चव वाढते. 

आता घरी नक्की करुन पाहा चिंच- गुळाची चटणी

घरबसल्या खूप खात असाल तर जाणून घ्या काही महत्त्वाच्या टिप्स

Read More From Recipes