बॉलीवूड

जान्हवी कपूरच्या लग्नाबाबत श्रीदेवीची होती ही ‘इच्छा’

Trupti Paradkar  |  Sep 9, 2019
जान्हवी कपूरच्या लग्नाबाबत श्रीदेवीची होती ही ‘इच्छा’

श्रीदेवी आणि बोनी कपूर यांची मुलगी जान्हवी कपूर हिने ‘धडक’ चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं होतं. आता जान्हवी लवकरच ‘गुंजन सक्सेना’ या चित्रपटामधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. जान्हवीच्या या चित्रपटाबाबत सर्वत्र चर्चा सुरू आहे. शिवाय या चित्रपटातील तिच्या भूमिकेबाबत जाणून घेण्यास चाहते नक्कीच उत्सुक आहेत. जान्हवीला बॉलीवूड अभिनेत्री होताना पाहणं हे श्रीदेवीचं स्वप्न होतं. मात्र तिचं हे स्वप्न पूर्ण होण्यापूर्वीच श्रीदेवीने जगाच्या पडद्यावरून एक्सिट घेतली होती. श्रीदेवी बॉलीवूडची एक दिग्गज कलाकार होती. तिच्या नृत्य आणि अभिनयाचे अनेक चाहते होते. त्यामुळे आता जान्हवी कपूरमध्ये तिची झलक पाहण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळे एक अभिनेत्री म्हणून जान्हवीची जबाबदारी नक्कीच वाढली आहे. मात्र त्यासोबत जान्हवीच्या वैयक्तिक आयुष्याबाबतदेखील श्रीदेवीच्या काही इच्छा होत्या. 

जान्हवीच्या लग्नाबाबत काय होती श्रीदेवीची इच्छा

जान्हवी कपूरने नुकतच एका मॅग्नझिनसाठी ब्राइडल लुकचं फोटोशूट केलं आहे. ज्यामध्ये तिचं ब्राइडल रूप नक्कीच खुलून आलेलं दिसत आहे. मात्र या लूकमुळे तिच्या लग्नाविषयीच्या चर्चांना उधाण आलं आहे. जान्हवीने स्वतः एका मुलाखतीत तिच्या लग्न आणि श्रीदेवीच्या इच्छेविषयी खुलासा केला आहे. या मुलाखतीनुसार श्रीदेवीला जान्हवीचा जोडीदार स्वतःच शोधायचा होता. कारण तिला जान्हवीच्या चॉईसवर मुळीच विश्वास नव्हता. जान्हवीला कोणत्याही मुलाबाबत प्रेम वाटू शकतंं असं श्रीदेवीचं म्हणणं होतं. त्यामुळे तिला तिचा जावई स्वतःच शोधायचा होता. मात्र आता ते शक्य नाही कारण तिची स्वतःचा  जावई शोधण्याची इच्छा अपूर्णच राहिली. जान्हवी मात्र तिच्या लग्नाचं प्लॅंनिंग केलेलं आहे. तिच्या मते तिचं लग्न अगदी पारंपरिक पद्धतीने आणि तिरूपती मंदीरमध्ये होईल. लग्नात ती पारंपरिक कांजीवरम साडी नेसणार आहे आणि लग्नातील जेवण साऊथ इंडीयन असेल. साऊथ इंडियन पद्धतीने लग्न म्हणजे ही नक्कीच तिच्या आईची म्हणजेच श्रीदेवीची इच्छा असणार यात शंकाच नाही. शिवाय जान्हवीच्या या बोलण्यावरून लवकरच कपूर घराण्यात शहनाईचा आवाज येईल असं वाटत आहे. मात्र तिचं लग्न कोणाबरोबर होणार आहे हे नक्कीच तिने जाहीर केलेलं नाही.   

गुंजन सक्सेना मधील जान्हवीची भूमिका

पहिली महिला फायटर प्लेन पायलेट गुंजन सक्सेनच्या जीवनावर आधारीत चित्रपटात जान्हवी गुंजनची भूमिका साकारणार आहे. पहिली महिला फायटरची भूमिका साकारणे हे  सोपे नाही म्हणूनच जान्हवी यासाठी खूप मेहनत घेताना दिसत आहे. १९९९ साली झालेल्या कारगिल युद्धात गुंजन सक्सेना यांनी युद्धात सहभागी होत महत्वाची भूमिका निभावली होती. गुंजन सक्सेना यांच्या अतुलनीय कामगिरीची आठवण कारगिल युद्धावेळी नेहमीच घेतली जाते. त्यामुळेच या महिला पायलटच्या कामगिरीची अधिक माहिती लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा चित्रपट तयार केला जात आहे. 

जान्हवीचे आगामी चित्रपट

जान्हवी सध्या तिच्या आगामी चित्रपट ‘रूह अफ्जा’ची तयारीदेखील करत आहे. हा चित्रपट हॉरर कॉमेडी असून ती या चित्रपटात अभिनेता राजकुमार राव यासोबत दिसणार आहे. यासोबतच ती करण जोहरच्या ‘तक्त’ या अॅक्शनड्रामामध्ये देखील झळकणार आहे. या चित्रपटात रणवीर सिंह, करिना कपूर, आलिया भट, विकी कौशल, भूमी पेडणेकर, अनिल कपूर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. थोडक्यात जान्हवी तिच्या आगामी चित्रपटांसाठी प्रचंड मेहनत घेत असल्याचं दिसून येत आहे. सुदैवाने स्टार किड असल्यामुळे तिला पदार्पणातच अनेक चित्रपट मिळाले आहेत. मात्र आता या आगामी चित्रपटांमधून चाहत्यांच्या जान्हवीच्या अभिनयाबाबतच्या अपेक्षा नक्कीच वाढल्या आहेत.

फोटोसौजन्य – इन्साग्राम

अधिक वाचा

सुरवीन चावलाची 5 महिन्यांच्या मुलीने केला डेब्यू

कसौटी जिंदगी की मालिकेमध्ये कोमोलिका येणार परत, पुन्हा हिनाच्या प्रतीक्षेत

करण जोहरला मिळाला आणखी एक नवा चेहरा… हा स्टार किड करणार ‘दोस्ताना 2’

Read More From बॉलीवूड