Weight Loss

जपानी पद्धतीने असे करा पोट कमी, आठवड्यात दिसेल फरक

Leenal Gawade  |  Aug 19, 2021
सपाट पोट

पोटाचा घेर कमी कऱण्याच्या अनेक पद्धती व्यायाम आतापर्यंत तुम्ही करुन पाहिल्या असतील. पण तुम्ही कधी कोणत्या जपानी पद्धतीने पोट कमी करण्याचा प्रयत्न केला आहे का? नसेल तर आजपासूनच पोटाचा घेर कमी करण्यासाठी आणि सपाट पोट मिळवण्यासाठी या काही जपानी पद्धती म्हणजेच काही सोपे व्यायाम नक्की ट्राय करा. सातत्याने या गोष्टी केल्यामुळे तुमच्या पोटाचा टायर कमी होण्यास तुम्हाला नक्कीच मिळेल.

टॉवेल पद्धत

जपानमध्ये फारच प्रचलित असलेली टॉवेलने अॅब्ज मिळवण्याची ही पद्धत फारच सोपी आहे. यासाठी तुम्हाला एक जाड टर्किश टॉवेलची गरज आहे. हा प्रकार केल्यामुळे अगदी 10 दिवसातच तुमचे पोट कमी होण्यास मदत मिळते.  एका जपानी डॉक्टरने ही पद्धत शोधून काढली आहे. या पद्धतीनुसार तुम्ही शरीरात घेतलेल्या कॅलरीहून अधिक कॅलरी बर्न करण्यास मदत करते. 

अशी करा कृती :

टिकटॉक डान्स

सध्या तुम्ही जिथे जाल तिथे तुम्हाला हा जापनीज डान्स दिसेल. एक मुलगी एक गाणं लावून त्यावर पोटाची हालचाल करताना दिसते. हा डान्स आता इतका प्रसिद्ध झाला आहे आणि वजन कमी करण्याची पद्धतही इतकी प्रचलित झाली आहे की, विचारता सोय नाही. या डान्समध्ये कोअर मसलवर सगळा ताण आलेला दिसतो. अगदी काहीच दिवसात तुम्हाला इच्छित असलेला निकाल यामध्ये मिळतो. 

अशी करा कृती:

आया या पद्धतीने तु्ही पोट कमी करण्याचा प्रयत्न करु शकता. 

रोज योगा करत आहात, तर लक्षात ठेवा खास गोष्टी

Read More From Weight Loss