बॉलीवूडमध्ये 90 च्या दशकात बोलबाला होता तो माधुरी, श्रीदेवी आणि जूही चावला या अभिनेत्रींचा. या तिघींमध्ये सतत चढाओढ सुरू असायची. जूहीने आपल्या अभिनय आणि सौंदर्याने फॅन्सचा मनात जागा निर्माण केली. तिने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट या काळात दिले. तिच्या गोड हास्याने अनेकांचं काळीज तेव्हा चोरलं. अगदी आजही तिचं फॅनफोलोइंग कमी झालेलं नाही. जूहीचं आयपीएलमध्ये सहभाग घेणं असो वा तिच्या मुलीबाबतची एखादी बातमी असो आजही फॅन्स जूहीबाबत जाणून घेण्यास उत्सुक असतात. याच दरम्यान जूहीने नुकतंच एका मुलाखतीत आपल्या आयुष्यातील एका रहस्यावरचा पडदा दूर केला. जूहीने सांगितलं की, तिच्या एवढ्या मोठ्या चित्रपटसृष्टीतल्या प्रवासात तिने अनेक निर्णय घेतले. पण त्यापैकी एका निर्णयाचा तिला आजही पश्चाताप आहे.
कोणत्या निर्णयाचा जूहीला आहे पश्चाताप
बॉलीवूडमध्ये नेहमीच असं होतं की, जेव्हा एखादा कलाकार एखादा चित्रपट नाकारतो तेव्हा तो दुसऱ्याला मिळतो. मग हा चित्रपट हिट होतो. त्यामुळे अनेकांना तो चित्रपट किंवा ती भूमिका नाकारल्याचा नंतर पश्चाताप होणं साहजिक आहे. असाच एक चित्रपट जूहीने बऱ्याच वर्षांपूर्वी नाकारला होतो. ज्याचा फायदा दुसऱ्या अभिनेत्रीला झाला. जूहीने या मुलाखतीत तिच्या करिअरबाबत अनेक खुलासे केले. तिने सांगितलं की, मी मूर्ख होते आणि खूप हट्टी झाले होते. मी हा असा ग्रह करून घेतला होता की, जसं मी काम करण्यास नकार दिला तर बॉलीवूड इंडस्ट्रीच थांबेल. मला त्या काळचा एक उत्तम चित्रपट ऑफर करण्यात आला होता. पण माझा ईगो मोठा झाला होता आणि मी तो सिनेमा नाकारला. जो मी खरंतर करायला हवा होता. तो सिनेमा खूप चालला.
जेव्हा माधुरीने सांगितल्या श्रीदेवीसोबतच्या आठवणी
जूही चावलाला तेव्हा एक नाहीतर दोन चांगले सिनेमा ऑफर झाले होते. ते सिनेमा म्हणजे राजा हिंदुस्तानी आणि दिल तो पागल है. पण तिने दोन्ही सिनेमा नाकारले आणि त्यामुळे एका अभिनेत्रीचा जबरदस्त फायदा झाला. ती अभिनेत्री म्हणजे करिश्मा कपूर. हे दोन्ही चित्रपट करिश्माला मिळाले आणि तिच्या करियरला चांगलंच बूस्ट मिळालं.
करिश्माने ना फक्त हा सिनेमा स्वीकारला तर या चित्रपटात त्याकाळी गाजलेला आमिरसोबतचा लिपलॉक सीनही दिला होता.
जूहीने हे सिनेमा नाकारण्याचं कारणही सांगितलं की, त्याकाळी मला फक्त त्याच लोकांबरोबर काम करायचं होतं ज्यांच्यासोबत मी कंफर्टेबल होते. असो कधी तरी एकाचं नुकसान हे दुसऱ्याला फायदा देणार ठरतंच आणि बॉलीवूडमधील भूमिकांबाबत हे अनेकदा पाहायला मिळालं आहे.
जूहीने तिच्या करियरमध्ये अनेक चांगले चित्रपट केले आहेत. ज्यामध्ये 1988 साली आलेला कयामत से कयामत तक आहे. या चित्रपटापासून तिने फिल्मी करियरला सुरूवात केली होती. या चित्रपटानंतर जूहीने मागे वळून बघितलं नाही. तिने हम है राही प्यार के, राजू बन गया जंटलमन, येस बॉस, डर, भूतनाथ आणि इश्कसारखे अनेक यशस्वी चित्रपट दिले. तुम्हाला काय वाटतं करिश्माऐवजी जूही चावला राजा हिंदुस्थानी आणि दिल तो पागल है या चित्रपटांमध्ये चांगली वाटली असती का? तुम्हाला माहीत आहे का, बॉलीवूडमधील असा एखादा किस्सा. माहित असल्यास आम्हाला नक्की मेल करा. आम्ही तो आमच्या वेबसाईटवर शेअर करू.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje