बॉलीवूड अभिनेत्री काजोलची आई तनुजा यांच्या तब्येतीत हळूहळू सुधारणा होत आहे. नुकताच काजोलने तनुजा यांचा एक फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे. ज्यामध्ये तनुजा फारच अशक्त झाल्याचं दिसत आहे. मात्र त्यांच्या चेहऱ्यावरील स्मितहास्य पाहून त्यांची तब्येत पहिल्यापेक्षा सुधारली आहे असं नक्कीच वाटत आहे. अचानक पोटात दुखू लागल्यामुळे 28 मे ला तनुजा यांना रूग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. तनुजा यांना लीलावती हॉस्पिटलमध्ये उपचारांसाठी नेण्यात आलं होतं. 30 मेला त्यांच्यावर शस्रक्रिया करण्यात आली. आता त्यांची तब्येत चांगलीच सुधारली असून काजोल आणि अजयच्या परिवारात यामुळे आनंदाचं वातावरण निर्माण झालं आहे.
काजोलने व्यक्त केली कृतज्ञता
काजोलने तनुजा यांचा फोटो आणि एक भावनिक पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. ज्यामध्ये तिने चाहत्यांचे आभार व्यक्त केले आहेत. काजोलने लिहीले आहे, “ सर्व चाहत्यांचे मनापासून आभार. ज्यांनी आमच्यासाठी प्रार्थना केली. हे स्मितहास्य तुमच्या बद्दल कृतज्ञतेचं आहे.” काजोलचं तिच्या आईवर मनापासून प्रेम आहे. ती नेहमीच तिच्या कुंटुंबाची काळजी घेते. आईची तब्येत सुधारल्यामुळे काजोलला बरे वाटत आहे. मात्र या कठीण काळातही ती तिच्या चाहत्यांचे आभार व्यक्त करण्यास मुळीच विसरली नाही.
तनुजा यांना झाला होता हा आजार
तनुजा पंचाहत्तर वर्षांच्या होत्या. 28 मेला तनुजा यांच्या पोटात दुखत असल्यामुळे त्यांना लीलावतीत दाखल करण्यात आलं होतं. तनुजा यांना डायवर्टिकुला हा आजार झाला होता. या आजारपणात पोटातील आतड्यांना सूज येते. त्यामुळे त्यांच्यावर तात्काळ शस्त्रक्रिया करण्यात आली. डायवर्टिकुलामुळे पोटात तीव्र वेदना, डायरिया आणि ताप जाणवतो. ज्यामुळे रुग्ण अतिशय अशक्त दिसू लागतो. तनुजा यांच्यावरील शस्रक्रिया यशस्वी झाली आहे. हळूहळू त्यांच्या तब्येतीत सुधारणा होत आहे. तनुजा आणि काजोलवर चाहत्यांचे विशेष प्रेम आहे.
अखेर काजोल आणि अजयच्या चाहत्यांची प्रार्थना फळली
अजय आणि काजोल सध्या अतिशय कठीण काळाला सामोरे जात आहेत. कारण 27 मेला अजय देवगणचे वडील आणि काजोलचे सासरे वीरू देवगण यांचे निधन झाले होते. वीरू देवगन यांच्या जाण्याने चित्रपटसृष्टीवर शोककळा पसरली होती. काजोल तिच्या सासऱ्यांची वडिलांप्रमाणे काळजी घ्यायची. सासऱ्यांच्या जाण्याने तिला फार दुःख झाले होते. तिने सोशल मीडियावर याबाबत त्यांचा फोटो शेअर करत आपल्या भावना व्यक्त केल्या होत्या.
सासऱ्यांच्या जाण्यानंतर काजोलला आईच्या आजारपणामुळे आणखी एक धक्का बसला होता. कुटुंबात झालेल्या या एका पाठोपाठ एक संकटांतून सावरण्यासाठी काजोल आणि अजयचे चाहते प्रार्थना करत होते. या प्रार्थनेला फळ आलं असून तनुजा आजारपणातून बचावल्या आहेत. काजोलने यासाठी तिच्या आणि तनुजाच्या सर्व चाहत्यांचे यासाठी आभार मानले आहेत.
ज्येष्ठ अभिनेता गिरीश कर्नाड यांचं निधन
वेलकम होम’ चित्रपटामुळे मी प्रगल्भ झाले – मृणाल कुलकर्णी
सोनम कपूरने साजरा केला 34 वा वाढदिवस, मलायकाने वेधून घेतलं लक्ष
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade