Festival

‘शुभो महालया’साठी रिताभरी चक्रवर्तीने धारण केली दुर्गेची ही विविध रूपं

Trupti Paradkar  |  Sep 17, 2020
‘शुभो महालया’साठी रिताभरी चक्रवर्तीने धारण केली दुर्गेची ही विविध रूपं

शुभो महालया अमावास्या म्हणजे श्राद्ध किंवा पितृ पक्षाचा अखेरचा दिवस आणि शुभ मानल्या जाणाऱ्या देवी पक्षाची सुरुवात. बऱ्याचदा यानंतर नवरात्री अथवा दुर्गा पूजेच्या सणाची सुरुवात होते. यंदा मात्र दुर्गा देवीचे आगमन शुभो महालया अमावास्येनंतर जवळजवळ एका महिन्याने होणार आहे. हा महत्त्वाचा दिवस साजरा करण्यासाठी कल्याण ज्वेलर्सच्या ब्रँड अम्बेसिडर रिताभरी चक्रवर्तीने दुर्गेची विविध रूप धारण केली होती. दुर्गा मातेच्या या तीन वेगवेगळ्या लक्षणीय रुपात रिताभरीने या दिवस साजरा केला. सती, पार्वती आणि महिषासुर मर्दिनी या तीन रुपांसाठी रिताभरीने कल्याण ज्वेलर्सचे हाताने घडवलेले, पारंपरिक दागिने परिधान केले होते.

रिताभरीने व्यक्त केलं शुभो महालयाचे महत्व –

बंगाली भाषिकांसाठी पवित्र मानल्या जाणाऱ्या महालयाच्य प्रसंगी कल्याण ज्वेलर्सची ब्रँड अम्बेसिडर रिताभरी चक्रवर्तीने आपल्या भावना शेअर केल्या तिच्या मते, ‘या दिवशी मां दुर्गा आपल्या मुलाबाळांसह स्वर्गातून पृथ्वीवर आपल्या वडिलांच्या घरी येते. बंगाली भाषिकांसाठी दुर्गा पूजन हा वर्षभरातील सगळ्यात मोठा उत्सव असतो आणि हा दिवस या उत्सवाची सुरुवात असते. गेली कित्येक वर्ष मां दुर्गाने असुरांवर मिळवलेला विजय आपण रेडिओ, टीव्ही आणि नाटकांच्य माध्यमातून अनुभवलेला असून तिचं हे रूप ‘महिषासुरमर्दिनी’ या नावाने ओळखले जाते. मां दुर्गाच्या कोणत्याही मूर्तीत तिने नखशिखांत परिधान केलेले दागिने उठून दिसत असतात. कल्याण ज्वेलर्स आणि आनंदबझार पत्रिका यांच्या सहकार्याने मां दुर्गाचं रूप धारण करणं हा माझ्यासाठी खूप मोठा सन्मान आहे. हे माझ्यासाठी जास्त खास आहे, कारण त्यातून मां दुर्गा जर नारीशक्तीचे प्रतीक आहे, तर आपण आपल्या स्त्रियांचा समान आदर व पूजन का करायला नको असा महत्त्वाचा संदेश दिला जाणार आहे. आपल्या देशात स्त्रियांवर होणारे अत्याचार गेल्या काही वर्षांत खूप वाढलेले आहेत. प्रत्येक स्त्रीमध्ये देवीचा वास असतो आणि आपण तिचा आदर करायला हवा याची लोकांना आठवण करून देण्याचा हा आमचा एक साधा प्रयत्न आहे.’

सतीचे रूप

रिताभरी यांनी कोरियल लाल पार साडी आणि कल्याण ज्वेलर्सचे सोन्याचे दागिने परिधान करत सती अवतार धारण केला. या अतिशय सुंदर, हाताने घडवलेल्या, फिलिग्रीपासून प्रेरणा घेतलेल्या सोन्याचा चोकरचे डिझाइन खूप नाजूक आहे. त्याला पांच पालीच्या वारसा नेकलेसची जोड दिल्यानंतर दिसणारं रूप भारावून टाकणारं असतं. सोन्याचे पारंपरिक चूर किंवा बांगड्या हा बंगाली पोशाख पूर्ण करतात. गडद लाल रंगाच्या साडीवर शाखा पोल्का बांगड्या, चूर या रूपाचे स्त्रीत्व अधोरेखित करतात. वैविध्यपूर्ण हस्तभूषण असणाऱ्या चूरचे सौंदर्य कधीच कमी होत नाही.

महिषासुर मर्दिनीचे रूप

या अवतारात रिताभरी यांनी तिसरे नेत्र दर्शवले असून त्याला घुमटाच्या आकाराच्या सोनार मुकुटाची जोड दिली आहे.पंच नोली हार हा पाच स्तर असलेला सोन्याचा हार असून तो सौंदर्यात आणखी भर घालत आहे. कमरबंध, जुही बांगड्या आणि नथ या पारंपरिक रूपाला उठाव देत आहेत.

पार्वतीदेवीचे रूप

गुलाबी आणि पांढऱ्या रंगाच्या साडीतलं हे पार्वतीचं रूप सोन्याच्या टेम्पल डिझाइन असलेल्या दागिन्यांनी पूर्ण करण्यात आलं आहे.सोन्याची टिकली (टिका) आणि टेम्पल डिझाइनचा हार, झुबे, कान पाशा आणि नाजूरकशी नथ एकंदर रूपाचं सौंदर्य खुलवणारे दागिने यासाठी घालण्यात आलेले आहे. अंगठीला बंगाली मध्ये अंगटी असं म्हटलं जात असून हा दागिना प्रत्येक पारंपरिक पोशाखासाठी आवश्यक असतो. अंगठीसाठी अनेक पॅटर्न्स आहेत जे बोटांना आणखी सुंदर बनवतात

रिताभरीचा अभिनय प्रवास

कल्याण ज्वेलर्सची ब्रँड अम्बेसिडर रिताभरी चक्रवर्ती हिने 2009 मध्ये ‘ओगो बोधू सुंदरी’ या बंगाली टेलिव्हिजन मालिकेतून अभिनयक्षेत्रात पर्दापण केले होते. आतापर्यंतच्या तिच्या 11 वर्षांच्या अभिनय प्रवासात तिने अनेक बंगाली आणि हिंदी चित्रपटांमधून आपल्या दमदार अभियनाने प्रशंसा मिळवली आहे. 2017 मध्ये तिने नेकेड या शॉर्ट फिल्ममध्ये अभिनेत्री कल्की कोचल्निसह काम करत हिंदी चित्रपटसृष्टीत पर्दापण केलं होतं.त्यानंतर अनुष्का शर्मा यांच्या परी या सिनेमातल्या त्यांच्या अभिनयाचेही खूप कौतुक झाले. त्याशिवाय रिताभरी चक्रवर्ती आयुषमान खुराना यांच्या ‘ओरे मॉन’ या संगीत व्हिडिओमधूनही झळकली होती. या शिवाय नुकत्याच प्रदर्शित झालेल्या टिकी टाका या झी5 ओरिजनल स्पोर्ट्स ड्रामा सिनेमामध्ये तिने काम केलं होतं.

फोटोसौजन्य – कल्याण ज्वेलर्स

अधिक वाचा –

प्रत्येक महाराष्ट्रीयन मुलीकडे असायलाच हवेत हे 5 दागिने

अशी घ्या मोत्यांच्या दागिन्यांची काळजी How to take care of Pearl Jewellery

मराठमोळ्या पारंपरिक दागिन्यांनी खुलू शकतो नववधूचा शृगांर

Read More From Festival