कंगना रणौतचा आगामी चित्रपट ‘मैंटल है क्या’ वादाच्या भोवऱ्यात अडकला आहे. कंगना आणि राजकुमार राव ‘मेंटल है क्या’ चित्रपटातून एकत्र दिसणार आहेत. मात्र आता चित्रपटाच्या पोस्टर आणि शीर्षकावरून हा चित्रपट वादात अडकला आहे. ‘मेंटल है क्या’ चित्रपटाचा ट्रेलर बुधवारी प्रदर्शित होणार होता. निर्मात्यांनी या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित करण्यासाठी खास इंव्हेटचं आयोजन देखील केलं होतं. कंगना रणौत देखील या इंव्हेटमध्ये सहभागी होणार होती. मात्र अचानक या चित्रपटाचं ट्रेलर रद्द करण्यात आलं आहे. ‘मेंटल है क्या’ चित्रपट 26 जुलैला प्रदर्शित होणार होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखदेखील आता पुढे ढकलण्यात आली आहे. सेन्सॉर बोर्डकडून हिरवा कंदील मिळाल्यावरच आता या चित्रपटाचं ट्रेलर प्रदर्शित केलं जाणार आहे.
‘मेंटल है क्या’ वादाच्या भोवऱ्यात
इंडियन मेडीकल असोसिएशन आणि इंडियन सायकाएट्रीक सोसायटीने ‘मेंटल है क्या’ या चित्रपटाच्या शीर्षक आणि पोस्टरवर आक्षेप घेत सेन्सॉर बोर्डकडे तक्रार नोंदवली होती. त्यांच्या मते, हा चित्रपट मानसिक रूग्णांच्या भावना दुखावणारा आहे. एवढंच नाही तर दीपिका पादुकोणच्या ‘दि ‘लिव्ह, लव्ह अँड लाफ फाऊंडेशन’ या संस्थेनेदेखील या चित्रपटावर टीका केली आहे. या संस्थेच्या मते ‘मेंटल’ शब्दातून मानसिक रूग्णाचा अपमान दर्शवला जात आहे. कंगनाच्या वतीने तिची बहीण रंगोली नेहमीप्रमाणे या वादात सहभागी झाली आहे. मात्र चित्रपटाची निर्माती एकता कपूर हा वाद लवकर मिटवण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे एकता कपूरने असं जाहीर केलं आहे की, आधी हे ट्रेलर मानसिक आजारावर उपचार करणाऱ्या तज्ञांना दाखविण्यात येईल आणि त्यानंतरच लोकांसाठी हे ट्रेलर प्रदर्शित केलं जाईल.
एकता कपूरने सोशल मीडियावर जाहीर केली ही प्रतिक्रिया
एकता कपूरने ‘मेंटल है क्या’ चित्रपटाच्या मोशन पोस्टरसह एक ट्वीटदेखील केलं आहे. या ट्वीटमध्ये तिने असं शेअर केलं आहे की, “ या चित्रपटात मानसिक आजार असणाऱ्या लोकांना कमी लेखण्यात आलेलं नाही. चित्रपटाच्या शीर्षकामधून कोणाच्या भावना दुखावण्याचा आमचा हेतू नाही. हा चित्रपट मानसिक रूग्णाबाबत संवेदनशील आहे. माणसातील वेगळेपण स्वीकारण्यासाठी या फिक्शन थ्रीलरची निर्मिती केली आहे”
‘मेंटल है क्या’ चित्रपटात नेमकं आहे तरी काय
मेंटल है क्या चित्रपट वादात अडकला असला तरी चाहते मात्र या चित्रपटाची आतूरतेने वाट पाहत आहेत. मेंटल है क्या या शीर्षक आणि मोशन पोस्टरवरून या चित्रपटात नेमकं काय असेल हे प्रेक्षकांना जाणून घ्यायचं आहे. दक्षिणेतील आघाडीचे चित्रपट निर्माते दिग्दर्शक प्रकाश कोवेलामुदी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहेत. मेंटल है क्यामध्ये कंगना आणि राजकुमार सोबत जिमी शेरगिल, सतिश कौशिक, अमृता पुरी आणि अमिरा दस्तुर यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. निर्मात्यांनी सांगितल्याप्रमाणे यात मानसिक रूग्णाच्या भावना दुखावल्या जाणार नसतील तर कथानक नक्कीच वेगळं असण्याची शक्यता आहे. चित्रपटाच्या शीर्षकावरून चिघळलेला हा वाद लवकर मिटल्यास एखादा हटके चित्रपट प्रेक्षकांना पाहता येण्याची शक्यता आहे.
अधिक वाचा
मानसिक आजार म्हणजे काय आणि त्याचे काय आहेत प्रकार
मानसिक ताणाला दूर ठेवण्यासाठी करा ‘हे’ सोपे उपाय (How to Relieve Mental Pressure in Marathi)
पहिल्यांदाच आई होणाऱ्या महिलांमध्ये मानसिक ताणाच्या समस्येत पाच वर्षांत 10% वाढ
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
Read More From मनोरंजन
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
170+ श्रीकृष्ण जन्माष्टमीच्या हार्दिक शुभेच्छा | Krishna Janmashtami Quotes In Marathi | Janmashtami Chya Hardik Shubhechha
Leenal Gawade