बॉलीवूड

कंगनाच्या आईला का सतावत आहे मुलीच्या लग्नाची चिंता, शेअर केली भावनिक पोस्ट

Trupti Paradkar  |  Aug 30, 2020
कंगनाच्या आईला का सतावत आहे मुलीच्या लग्नाची चिंता, शेअर केली भावनिक  पोस्ट

बॉलीवूड अभिनेत्री कंगना रणौत आजकाल अभिनयापेक्षा तिच्या सोशल मीडियावरील बिनधास्त वागण्यामुळेच जास्त प्रसिद्ध झाली आहे. तिच्या सर्व पोस्ट, फोटो आणि व्हिडिओज मधून ती तिच्या मनातील अनेकांच्या बाबत असलेला राग आणि उद्रेक सतत जाहीर करत असते. कंगना सामाजिक, राजकीय आणि बॉलीवूड अशा कोणत्याही गोष्टीवर आपलं मत उघडपणे मांडतेच. मात्र आता ती सुशांत सिंह राजपूत प्रकरणातील अनेक धक्कादायक खुलाशांमुळे चर्चेत आली आहे. या प्रकरणामुळे कंगनाच्या आयुष्यात निर्माण झालेलं एक वैयक्तिक दु:ख कंगनाने तिच्या चाहत्यांसमोर आता व्यक्त केलं आहे. कंगनाने नुकतीच तिच्या आईची एक चिंता सोशल मीडियावर जगजाहीर केली आहे. ज्यामधून सर्वांसमोर बिनधास्त आणि बेधडक वागणारी कंगनाची एक वेगळीच बाजू जगासमोर आली आहे. 

Instagram

कंगनाच्या आईला सतावत आहे ही चिंता

कंगनाने तिच्या ट्विटर अकाऊंटवरू एक ट्विट शेअर केलं आहे. ज्यामध्ये तिने तिच्या आईला तिच्याबाबत नेमकं काय वाटतं ते सांगितलं आहे. सध्या कंगना सुशांत सिंह राजपूत प्रकरणाबाबत तिला वाटत असलेल्या मुद्यांसाठी चर्चेत आहे. याबाबत तिने नुकतीच एक बेधडक मुलाखत एका खाजगी वाहिनीला दिली होती. या मुलाखतीत तिने या प्रकरणातील बॉलीवूडमधील नेपोटिझमवर उघड चर्चा केली आहे.शिवाय बॉलीवूडमधील ड्रग्ज रॅकेटचाही पर्दाफाश केला आहे.  मुलाखत झाल्यावर तिने उत्साहात तिच्या आईला विचारलं की, तुला ही मुलाखत कशी वाटली? त्यावर तिची आई फारच भावूक झाली आणि तिने रडत रडत कंगनाला सांगितलं की, तिला आता कंगनाच्या लग्नाची चिंता सतावू लागली आहे. यासाठी कंगनाची आई सध्या कडक उपवासदेखील करत आहे. तिच्या आईच्या मते कंगना जगभरात स्वतःबाबत घडलेले वाईट अनुभव बिनधास्तपणे शेअर करत आहे. त्यामुळेच कंगनाच्या आईला  कंगनाचं लग्न होईल की नाही अशी भीती वाटू लागली आहे. याचा परिणाम म्हणून या मुलाखतीनंतर तिने कंगनाला सतत फोन करून तिची चौकशी सुरू केली आहे.  यावर कंगनाने “आईचा रडण्याचा नाही तर रडवण्याचा विचार होता का? अशा प्रश्न कंगनाने चाहत्यांसमोर मांडला आहे. 

कंगनाच्या सुरक्षेसाठी तिच्या आईने केली ही पूजा

सोशल मीडियावर कंगनाचे हे ट्विट वाऱ्यासारखे पसरत आहे. तिचे चाहतेही हे ट्विट पाहून नक्कीच भावूक झाले आहेत. कंगनाने तिच्या आईच्या फोटोसह ही पोस्ट शेअर केलेली आहे. ज्यावर चाहत्यांच्या कंमेट्सचा अक्षरशः पाऊस पडला आहे. कंगना सध्या सुशांत सिंह राजपूत प्रकारणाबाबत असलेल्या तिच्या मतांमुळे चर्चेत आहे. त्यात तिने  बॉलीवूडबाबत केलेले काही खुलासे महत्वाचे ठरू शकतात. तिने उघडपणे बॉलीवूड पार्ट्यांमध्ये होणाऱ्या ड्रग्ज रॅकेटचा पर्दाफाश केला आहे. तिच्यामते बॉलीवूड पार्ट्यांमध्ये डग्ज अगदी सहज उपलब्ध होतं. तिच्या या  खुलाशांचा काय परिणाम होणार यामुळे तिच्या तिची चिंता वाटणं स्वाभाविकच आहे. कंगनाची आई लेकीसाठी फक्त उपवासच नाही तर निरनिराळ्या पूजादेखील करत  आहे. कारण कंगनाने असं बिनधास्त वागून अनेकांशी पंगा घेतलेला आहे. काही दिवसांपूर्वी त्यांच्या मनालीतील घराबाहेर गोळीबाारही करण्यात आला होता. या प्रकरणाला घाबरून कंगनाच्या आईने काही दिवसांपूर्वीच तिच्या मुलींसाठी महामृत्युंजय जप पूजादेखील केली होती. 

फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम

अधिक वाचा –

खतरों के खिलाडी: निया शर्मा झाली ‘मेड इन इंडिया’ची विजेती

अजून एका अभिनेत्याची ‘गुड न्यूज’ची घोषणा, दुसऱ्यांदा होणार बाबा

या बॅकराऊंड डान्सर्सनी बॉलिवूडमध्ये निर्माण केली आपली ओळख

Read More From बॉलीवूड