आज 9 सप्टेंबर कंगना रणौत मुंबईत येण्याचा दिवस. काही दिवसांपूर्वी व्हिडिओ शेअर करत कंगनाने तिला ‘हरामखोर मुलगी’ म्हणणाऱ्यांना चॅलेंज करत मी मुंबईत येणार असा दावा केला होता. त्यानुसार आजच्या दिवशी कंगना रणौत मुंबईला येण्यासाठी रवाना झाली आहे. तिने कोरोना टेस्ट केली असून ही टेस्ट निगेटीव्ह आल्यामुळे तिचा मुंबईला येण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कंगनासोबत तिची बहीण रंगोली ही देखील मुंबईला येण्यासाठी रवाना झाली आहे. तिचे काही फोटो देखील सोशल मीडियावर वायरल होत आहेत. पण आता तती मुंबईत आल्यानंतर तिला मारण्यासाठी धमकी देणारे आता काय करणार किंवा काय गोंधळ उडणार याकडे अनेकांचे लक्ष लागून राहिले आहे. अद्याप कंगनाने कोणताही नवा व्हिडिओ केलेला नाही.
11 वर्षांपूर्वी केलेल्या रियाने केलेल्या ट्विटवर नेटीझन्सची चर्चा
वाय सिक्युरीटीमध्ये रवाना
कंगना रणौतला मारण्याची धमकी मिळत असल्यामुळे तिला Y सुरक्षा देण्यात आली आहे. तिने मनाली ते पैतृक असा पहिला प्रवास केला. हा प्रवास सुरु करण्यापूर्वी तिने मध्ये देवाची पूजाही केली. त्यानंतर आज सकाळी ती चंडीगढला रवाना झाली आहे. आता ती मुंबईत कधी येणार हे अद्याप माहीत नाही. पण तिचा मुंबई प्रवास हा होणार आहे, असे देखील सांगितले जात आहे. तिच्या संपूर्ण सुरक्षा व्यवस्थेत तिला मुंबईत आणण्यात येणार आहे. मुंबईत आल्यानंतर तिच्याविरोधात प्रदर्शन होणार का नाही? असा प्रश्नही अनेकांना पडला आहे.
वनसंवर्धनासाठी प्रभासने केली दोन कोटींची मदत, दत्तक घेतलं हे जंगल
पुढे काय होणार?
मुंबईत शिवसेनेच्या अनेकांकडून कंगनाला धमकी देण्यात आली होती. त्यामुळे कंगना रणौतने एक व्हिडिओ करत संजय राऊत यांच्यावर चांगलेच ताशेरे ओढले आहेत. मुलींचा अशाप्रकारे अपमान करणाऱ्या व्यक्तिंच्या मानसिकतेमुळेच मुलींवर अत्याचार होत आहेत. असे म्हणत तिने संजय राऊत यांनी तिच्यासाठी वापरलेल्या ‘हरामखोर मुलगी’ या शब्दाचाही तिने निषेध केला होता. त्यानंतर मुंबईत येऊ नको असे म्हणणाऱ्यांना चपराक देण्यासाठी कंगनाने मुंबईत येण्याचा निर्णय घेतला आहे. आता ती मनालीमधून निघाल्यानंतर ती मुंबईत पाय ठेवेपर्यंत कोणत्या घडामोडी होणार याकडे अनेकांचे लक्ष आहे. दरम्यान, आता कंगना रणौतचे मुंबईच्या पाली हिलमधील ऑफिस पालिकेकडून तोडण्यात आले आहे. हे बांंधकाम अवैध असल्याचे सांगत पालिकेने ही कारवाई केली आहे. पण कंगनाने याचेही सडेतोड उत्तर दिले आहे तिने हायकोर्टात या संदर्भात याचिका दाखल केली असून तिने ट्विट करत आपली बाजू मांडली आहे.
बधाई हो’ मधील अभिनेत्री रुग्णालयात दाखल, ब्रेन स्ट्रोकचा त्रास
मनालीमध्ये घेतला आनंद
हिमालयाच्या कुशीत जन्मलेली कंगना गेले काही दिवस तिच्या मनाली येथील घरी आहे. तिने काही दिवसांपूर्वी एक व्हिडिओ शेअर करत लॉकडाऊनमध्ये हिमालयाच्या कुशीत घेतलेला कुटुंबासोबतचा आनंद एका व्हिडिओच्या माध्यमातून शेअर केला आहे. तिने रितसर परवानगी काढून ही पिकनिक अरेंज केल्याची माहिती देखील यामध्ये दिली आहे. पण तिचा हा आनंद पाहिल्यानंतर अनेकांना आपल्या चांगल्या दिवसाची नक्कीच आठवण झाली आहे. तिचा हा व्हिडिओ अनेकांनी पाहिला आहे आणि अनेकांना हा व्हिडिओ आवडलासुद्धा आहे.
आता मुंबईत आल्यानंतर कंगना विरुद्ध सुरु असलेले हे कोल्ड वॉर नेमके काय रुप घेणार ते पाहण्यासाठी थोडी वाट पाहावी लागेल . कारण आधीच बॉलिवूडमध्ये सुरु असलेला नेपोटिझमचा वॉर आणि त्यात कंगनाने केलेली विधान यामुळे नेमकं काय होणार याची चिंता अनेकांना सतावत आहे.
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje