मनोरंजन

कंगनाची महाराष्ट्र सरकारला विनंती, इंडस्ट्रीच्या भवितव्यासाठी पुढे सरसावली

Leenal Gawade  |  Sep 8, 2021
कंगनाने केली मागणी

 गेल्या काही दिवसांपासून कंगना अगदी गप्प गप्प आहे. कोणत्याही प्रकरणात तिने अजून आपले कोणतेही वादग्रस्त मत व्यक्त केलेले नाही. कंगना इतके दिवस गप्प राहण्याचा अनुभव आतापर्यंत कोणालाच नाही.पण आता पुन्हा एका कारणास्तव कंगना चर्चेत आली आहे. एरव्ही सगळ्यांवर ताशेरे ओढणाऱ्या कंगनाने चक्क महाराष्ट्र सरकारसमोर हात जोडले आहेत. हात जोडून तिने चक्क बॉलिवूडकरांसाठी एक मागणी केलेली आहे. कंगनाने नेमकी अशी कोणती मागणी केली आहे? इंडस्ट्रीच्या भविष्यासाठी ती का पुढे सरसावली आहे ते जाणून घेऊया

दीपिकाने केली अमिताभ बच्चन यांच्याकडे रणवीरची तक्रार आणि…

हात जोडून केली विनंती

 गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे देशात तशी बऱ्यापैकी मंदावलेली अर्थव्यवस्था पाहायला मिळाली. कोरोनाचे संक्रमण होऊ नये म्हणून देशभरात लॉकडाऊन लावण्यात आला. कोरोनातून थोडे थोडे डोकं वर काढत असताना देशात पुन्हा कोरोनाची साथ वाढली आणि पुन्हा लॉकडाऊन करण्यात आले. त्याचा परिणाम हा सिनेमागृहे आणि नाट्यगृहे बंद करण्यावर झाला. गेल्या दोन वर्षांपासून थिएटरमध्ये एकही चित्रपट रिलीज होऊ शकलेला नाही. अनेक मोठ्या बॅनरचे आणि मोठ्या बजेटचे चित्रपट प्रमोशनपासून वंचित आहेत. त्यांना बरेच नुकसानही होत आहे. त्यामुळे आता तरी महाराष्ट्र सरकारने सिनेमागृह सुरु करावेत अशी मागणी कंगनाने केली आहे.

‘थलयवी’ चित्रपटासाठी प्रयत्न

कंगनाने हा सारा घाट तिच्या आगामी चित्रपटासाठी केला आहे. कंगनाचा थलायवी नावाचा चित्रपट येत्या शुक्रवारी रिलीज होणार आहे. हा चित्रपट अनेक भाषांमध्ये प्रदर्शित होणार आहे. तेलगु, तामिळ, हिंदी भाषेत डब झालेला हा चित्रपट चित्रपटगृहांमध्ये दाखवण्यात यावा जेणेकरुन पुन्हा एकदा प्रेेक्षक सिनेमागृहांकडे वळेल असा विश्वास तिने व्यक्त केला आहे. दरम्यान, जयललिता यांच्या जीवनावर आधारीत हा चित्रपट असून या चित्रपटात कंगनाची मुख्य भूमिका आहे. जयललिता यांचा जीवनपट मांडण्यासाठी तिने बरीच मेहनत घेतली आहे. तिची मेहनत वाया जाऊ नये यासाठीच तिने हे सगळे प्रयत्न केलेले आहेत. तिने तिच्या स्टोरीमध्ये काही थिएटर्सना टॅग केलेल आहे. हिंदीमध्ये म्हणजेच मुंबईत हा चित्रपट अधिक पाहिला जावा अशी तिची इच्छा असल्यामुळे तिने महाराष्ट्र सरकारकडे थिएटर सुरु करण्याची ही मागणी केलेली आहे. 

ओटीटीचा आधार

गेल्या दोन वर्षात चित्रपटगृह बंद झाल्यामुळे अनेकांनी ओटीटीचा आधार घेऊन अनेक चित्रपट रिलीज करण्यात आले आहेत. खूप जणांनी आपले नुकसान टाळण्यासाठी चित्रपटाला ओटीटीचा आधार दिला. अनेक मोठे चित्रपट या प्लॅटफॉर्मवर रिलीज करण्यात आले. पण अजूनही काही चित्रपटांना थिएटरची प्रतिक्षा आहे. 

आता कंगनाची मागणी महाराष्ट्र सरकारसोबत आधी पंगा घेतल्यानंतर पूर्ण होईल का नाही यात शंकाच आहे.

विजय देवरकोंडाचा बॉलीवूड डेब्यू रजनीकांत,प्रभासपेक्षाही असणार ग्रॅंड

Read More From मनोरंजन