#coronavirus चा वाढता आकडा पाहता सगळ्या देशवासियांना रविवारपासून घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. परदेशातून आलेल्या भारतीयांची कसून चौकशी केली जात आहे. पण कनिका कपूर या गायिकेने मात्र सगळे नियम धाब्यावर बसवून सगळ्या देशासाठी एक वेगळेच संकट उभे केले आहे. #Coronaनirus च्या काळात परदेशातून येऊन तिने घरी स्वस्त न बसता बाहेर जाणे पसंत केले आणि आता तिच्यासंपर्कात आलेल्यांना कोरोना होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. आपली चूक असूनही कनिकाचे नखरे मात्र दिवसेंदिवस वाढत आहेत
पंतप्रधान मोदींनी सांगितलेल्या घंटानादामुळे Corona Virus निघून जाईल का?
कनिकाचे नखरे झाले डोक्याला ताप
कनिकाला कोरोनाची लागण झाल्याचे कळल्यानंतर तिला लखनऊ येथील संजय गांधी पीजीआय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तिच्या संपर्कात आलेल्या अनेकांना हा आजार संक्रमित होण्याची शक्यता आहे.त्यामुळे तिला विशेष ठिकाणी ठेवण्यात आले आहे. पण कनिकाचे वाढते नखरे लखनऊ येथील रुग्णालय प्रशासनाला डोक्याला ताप झाले आहे. VVIP ट्रिटमेंट मिळण्यासाठी तिने हा सगळा तमाशा केला आहे, असे समजत आहे. त्यामुळे इतर रुग्णांकडे लक्ष द्यायचे की कनिकाकडे ? या सगळ्यामुळे रुग्णालय प्रशासन गोंधळले आहेत.
कनिकाच्या नखऱ्यांची ही आहे यादी
कोरोना व्हायरसची लागण झालेल्या रुग्णांना अत्यंत चांगल्या पद्धतीने आणि योग्य सुविधा पुरवत इलाज केला जात आहे. पण कनिकाच्या नखऱ्यांची एक यादीच रुग्णालयाने सगळ्या मीडियापुढे दिली. कनिकाला VVIP ट्रिटमेंट हवी होती. तिला एका रुग्णासारखे नाही तर स्टारसारखी वागणूक मिळावी असे तिचे म्हणणे होते. त्यानुसार तिला रुग्णालयातील एसी रुम, अटैच बाथरुम आणि टीव्ही देखील देण्यात आला. हे इतके पुरेसे नव्हते की, कनिकाला घरचे जेवण हवे होते. रुग्णांना इलाजादरम्यान असे घरचे जेवण देऊ शकत नाही, त्यामुळे तिच्या आवडीचे ग्लुटन फ्री जेवण तिला देण्यात येत आहे. तिच्यासाठी स्वतंत्र किचनमध्ये ग्लुटेन फ्री जेवण बनवले जात आहे. तिच्या या फर्माईशी डोक्याला ताप होत आहेत.
ती थांबलीये… पण आपल्या चांगल्यासाठी
आणि झाला कोरोना डिटेक्ट
कनिका कपूर मार्चच्या पहिल्या आठवड्यात लंडनमधून परतली. तिने दिलेल्या माहितीनुसार ती ज्यावेळी देशात परतली त्यावेळी कोरोनाचे सावट नव्हते. तिला एअरपोर्टवर तपासून घरी पाठवण्यात आले. तिला कोणत्याही सूचना देण्यात आल्या नाहीत. त्यामुळे ती घरी आली. याकाळात झालेल्या अनेक मोठ्या पार्ट्यांना कनिका गेली. तिने केलेल्या शोजमध्येही अनेकांचा तिच्याशी संपर्क आला. अनेक बडया असमींना भेटली. तिच्या संपर्कात आलेल्या अनेकांनी स्वत:हून चाचणी केली आहे. अनेक मंत्री यामध्ये सहभागी आहेत. त्यामुळे आता हा आकडा वाढू नये याची खबरदारी घेतली जात आहे. कनिकाप्रमाणेच ज्यांना हातावर शिक्का देण्यात आला अशा व्यक्तीही बाहेर राजरोसपणे कोणतेही नियम न पाळता फिरु लागल्यामुळेच जनताफर्फ्यूसारखा निर्णही घ्यावा लागला.
रिपोर्टमुळे एक नवाच वाद
सगळीकडे कनिकाबद्दल चर्चा होत असताना तिच्या कुटुंबियांकडून रुग्णालय प्रशासनाला काही प्रश्न विचारण्यात आले आहेत. कनिकाचे जे रिपोर्ट रुग्णालयाकडून देण्यात आले आहेत. त्यावर कनिकाऐवजी कोणाची दुसऱ्याचीच माहिती आहे. कनिका 41 वर्षांची आहे पण रिपोर्टमध्ये 28 आणि पुरुष असा उल्लेख करण्यात आला आहे. त्यामुळे आता नवा वाद उद्भवण्याची शक्यता आहे.
कनिकाने देशात चाललेल्या काही गोष्टींचा थोडासा अभ्यास करुन एक सेलिब्रिटी म्हणून न वागता एक नागरिक म्हणून वागली असती तर तिच्यावर कौतुकाचा वर्षाव झाला असता पण आता तिच्या नावाने सगळेच शंख करत आहे. त्यातच तिच्या या वागणुकीची माहिती मिळाल्यामुळे अनेकांना धक्काच बसला आहे.
2020 ची सुरुवात करा POPxo च्या नव्या कोऱ्या प्लॅनर्स आणि स्टेटमेंट मेकिंग स्वेटशर्टने. जे आहेत तुमच्यासाठी एकदमच कूल! विशेष म्हणजे यावर तुम्हाला मिळणार आहे 20% ची अतिरिक्त सूट. मग वाट कसली पाहताय लगेचच शॉपिंग करण्यासाठी POPxo.com/shop ला भेट द्या.
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje