मनोरंजन

सुशांत सिंह राजपूतनंतर या टीव्ही कलाकाराच्या आत्महत्येने सुन्न झाले सेलिब्रिटी

Leenal Gawade  |  Jul 8, 2020
सुशांत सिंह राजपूतनंतर या टीव्ही कलाकाराच्या आत्महत्येने सुन्न झाले सेलिब्रिटी

सुशात सिंह राजपूतच्या आत्महत्येतून बाहेर येत नाही तोच आणखी एका कलाकाराने आत्महत्या केल्यामुळे खळबळ माजली आहे. हा कलाकार टीव्ही इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अॅक्टर सुशील गौडा यानेही आत्महत्या केल्याचे समोर आले आहे. कन्नड मालिकांमध्ये काम करणारा हा चेहरा अल्पावधीतच प्रसिद्ध झाला होता. पण अचानक 7 जुलै रोजी त्याच्या मृत्यूची बातमी समोर आली. त्याच्या मृत्यूचे कारण आत्महत्या आहे हे कळल्यानंतर तर अनेकांना धक्काच बसला. त्याच्या जाण्याचे दु:ख अनेकांनी सोशल मीडियातून व्यक्त केले आहे. सुशील गौडा असे या कलाकाराचे नाव असून लवकरच तो एका मोठ्या बॅनरच्या चित्रपटात दिसणार होता.

कंगना रणौतच्या रडारवर आली पूजा भट, जाणून घ्या कारण

आत्महत्येचे कारण अस्पष्ट

सुशीलच्या आत्महत्येसंदर्भात कोणतीही माहिती अद्याप समोर आलेली नाही. पण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ 30 वर्षीय सुशीलने स्वत:ला मारल्याचे समजत आहे. यावर अधिक माहिती देण्यास पोलिसांनी अद्याप तरी नकार दिला आहे. त्यामुळे त्याच्या आत्महत्येचे गूढ अजूनही त्याच्या फॅन्सना आहे. 

अभिनयच नाही तर…

Instagram

कन्नड फिल्म इंडस्ट्रीमध्ये सुशीलला आपले नाव करायचे होते. त्यासाठी तो फार मेहनतही घेत होता. त्याने कन्नडमधील ‘अनंतपुरा’ नावाची एक रोमँटीक टीव्ही मालिका केली होती. त्यामध्ये तो लीड रोलमध्ये सगळ्यांना दिसला. त्याच्या अभिनयामुळे तो अगदी काहीच दिवसात कन्नड प्रेक्षकांच्या मनात घर करुन गेला. पण तो अभिनय क्षेत्रातच नव्हता तर त्याला फिटनेसचीही विशेष आवड होती. तो फिटनेस ट्रेनर म्हणूनही काम करत होता. त्याच्या सोशल मीडियावर तो त्याचे अनेक जीम व्हिडिओज कायम पोस्ट करायचा. त्यामुळे त्याच्याकडे करीअरसाठी दोन पर्याय कायम होते. पण त्याला अभिनयाची आवड असल्यामुळे तो दोन्ही क्षेत्र अगदी सहज सांभाळत होता. 

कुमकुम भाग्यमध्ये आता आलियाच्या रूपात दिसणार रिहाना पंडित

कन्नड चित्रपटातून करणार होता डेब्यू

सुशील, दुनिया विजयसोबत ‘सालेगा’ चित्रपटात दिसणार होता. त्यात त्याने एका पोलिसाची भूमिका साकारली आहे. सुशील या चित्रपटातून डेब्यू करणार होता. कोरोनामुळे या चित्रपटाचे रिलीज पुढे गेले होते. सुपरस्टार दुनिया विजयला सुशीलच्या आत्महत्येची बातमी कळताच त्याने त्याच्या भावना सोशल मीडियावर मांडल्या. त्याने लिहिले की, माझ्यासाठी हा आश्चर्याचा धक्का आहे.  ज्यावेळी मी त्याला पहिल्यांदा पाहिले त्यावेळी त्याच्याकडे पाहून मला हा मुलगा हिरो होऊ शकेल असे मनापासून वाटले. त्याचा डेब्यू चित्रपट येण्याआधीच त्याने आपले जीवन संपवले याचे मला अतीव दु:ख आहे. सध्या देशाची परिस्थिती पाहता सगळीकडे नैराश्याचे वातावरण पसरले आहे. अनेक जण तणावाखाली आहेत. अनेकांना काम नाहीत. त्यामुळे साहजिकच पैसा नाही. पैसा नाही त्यामुळे स्थिरता नाही. एकूणच काय याचा परिणाम माणसावर होऊ लागला आहे. कोरोनाने माणसामधील आशेचा किरण मिटवून टाकला आहे. या परिस्थितीवर लवकर मात करणे गरजेचे आहे. 

अभिनेता पुष्कर श्रोत्री घेऊन येत आहे भारताचा एकमेव मराठी ओटीटी प्लॅटफॉर्म

हे ही दिवस जातील

कलाकारच नाही तर सध्याच्या परिस्थितीत अनेकांना नैराश्य आले आहे. आजुबाजूला घडणाऱ्या घटनांनी अनेकांच्या मनावर विपरित परिणाम केला आहे. पण थोडा धीर धरा कारण हेही दिवस जातील आणि चांगले दिवस नक्की येतील 

 

 

Read More From मनोरंजन