बॉलीवूड

करिना कपूरने नेपोटिझमवर सुनावले खडे बोल, यावर चर्चा होणंच विचित्र वाटतं

Dipali Naphade  |  Aug 4, 2020
करिना कपूरने नेपोटिझमवर सुनावले खडे बोल, यावर चर्चा होणंच विचित्र वाटतं

बॉलीवूड अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या आत्महत्येनंतर सोशल मीडियावर वेगवेगळ्या गोष्टींवर सध्या चर्चा चालू आहेत.  केवळ चर्चाच नाहीत तर अनेक विषयांवर वादही चालू आहेत आणि त्यापैकी सर्वात महत्त्वाचा वाद म्हणजे नेपोटिझम. यावेळी सर्वच स्टार किड्सवर प्रेक्षकांनीही झोड उठवलेली दिसून येत आहे. या संदर्भात अनेक कलाकारांच्या प्रतिक्रया समोर आल्या आहेत. यामध्ये आता अजून एक नवा जोडलं गेलं आहे आणि ते आहे करिना कपूरचं. करिनाने नेहमीच आपली मतं स्पष्टपणे मांडली आहेत. आताही तिने आपलं मत परखडपणे मांडून नेपोटिझमवर चर्चा करणाऱ्यांना खडे बोल सुनावले आहेत. नेपोटिझमने काहीही खास परिणाम होत नाही असं स्पष्ट मत करिनाने मांडलं आहे. नुकत्याच एका दिलेल्या मुलाखतीमध्ये करिनाने आपलं मत सांगितलं असून या विषयावर चर्चा होणंही विचित्र वाटत असल्याचं तिने सांगितलं आहे. 

बिग बींचे मन अजूनही हॉस्पिटलमध्येच, अभिषेकच्या आठवणीने झाले व्याकूळ

रोचक नसलं तरीही इंडस्ट्रीत मी पण स्ट्रगल केलं आहे – करिना कपूर

मुळात नेपोटिझमवर झोड उठवणंच चुकीच असल्याचं करिनाने म्हटलं आहे. ‘कारण प्रेक्षकच आहेत जे इनसाईडर अथवा स्टार किड्सना स्टार बनवतात. मीदेखील स्ट्रगल केलं आहे. कदाचित माझं स्ट्रगल त्या लोकांइतकं रोचक नाही जे 10 रूपये घेऊन ट्रेनमधून इंडस्ट्रीत आले आहेत आणि मोठे झाले आहेत. पण तरीही 21 वर्ष इंडस्ट्रीमध्ये काम करत टिकून राहणं हे केवळ नेपोटिझममुळे होऊ शकत नाही. हे अशक्य आहे. मी त्या सुपरस्टार मुलांची एक मोठी यादी देऊ शकते जे चित्रपटात आले मात्र इथे टिकू शकले नाहीत. याचाच अर्थ त्यांना प्रेक्षकांची साथ मिळाली नाही.’ इतकंच नाही तर करिना पुढे म्हणाली, ‘ही चर्चा मला खूपच विचित्र वाटते. मी पण स्ट्रगल केलंय. माझं स्ट्रगल खूप रोमांचक नक्कीच नाही जे ट्रेनमधून येऊन इथे इंडस्ट्रीत टिकतात आणि मोठे होतात. पण इतके वर्ष टिकून राहण्यासाठी स्ट्रगल करावाचा लागतो आणि तो मी केला आहे. इनसाईडर अथवा आऊटसाईडर कोणालाही इथे टिकवून ठेवणं हे प्रेक्षकांच्या हातात असतं. ती त्यांची  ताकद आहे. आम्ही स्टार किड्स आहोत म्हणून प्रेक्षकांना येऊन चित्रपट बघण्यासाठी कोणीच बळजबरी करत नाही.’

करिनाने आपलं मत मांडत पुढे म्हटले की, ‘प्रेक्षकांनीच आम्हाला मोठं केलं आहे, कोणी इतरांनी आम्हाला मोठं केलं नाही. आज स्टार किड्सना बोलणारेदेखील तेच प्रेक्षक आहेत. तुम्ही जाताच ना चित्रपट बघायला? मग ज्यांच्यासाठी जावंसं वाटत नाही त्यांच्यासाठी जाऊ नका. तुमच्यावर कोणीच बळजबरी केली नाही.  त्यामुळेच मला ही चर्चा समजत नाही. हा मुळात मुद्दाच मला विचित्र वाटतो. अक्षय कुमार असो वा शाहरूख खान अथवा आयुषमान खुराणा असो वा राजकुमार राव हे सर्व इंडस्ट्रीच्या बाहेरून येऊनच यशस्वी झाले आहेत. मी आज यशस्वी अभिनेत्री आहे कारण त्यामागे माझी मेहनत आहे. आलिया भट असो वा करिना कपूर कोणीही मेहनतीशिवाय मोठं  होत नाही. त्यामुळे प्रेक्षकच आहेत जे आम्हाला मोठं करतात.’

अभिनेता ज्यांनी ऑनस्क्रिन गाजवल्या महिलांच्या भूमिका, दिसतात सुंदर

करिना गेले 21 वर्ष करत आहे काम

करिनाच्या मते गेले 21 वर्ष ती मेहनतीने काम करत आहे. अनेक स्टार किड्स  आहेत जे इथे टिकू शकलेले नाहीत.  त्यामुळे नेपोटिझमवर झोड उठवून चर्चा करण्यात काहीच अर्थ नाही. हा मुद्दाच आपल्याला पटत नसल्याचंही तिने या मुलाखतीमध्ये स्पष्ट सांगितलं आहे. तसंच कितीतरी अशा स्टारकिड्सची यादीदेखील आपण देऊ शकतो जे टिकू शकले नाहीत असंही तिने सांगितलं. 

बॉलिवूडच्या या अभिनेत्रींची ओळख आहे त्यांची उंची

Read More From बॉलीवूड