मनोरंजन

करिना कपूर झाली निर्माती, लवकरच तयार करणार थ्रिलर चित्रपट

Trupti Paradkar  |  Aug 11, 2021
Kareena Kapoor turns producer with Hansal Mehta thriller movie

बॉलीवूड अभिनेत्री करिना कपूर लवकरच एका वेगळ्या भूमिकेत प्रेक्षकांच्या समोर येत आहे. आतापर्यंत करिनाने चित्रपटामधून निरनिराळ्या  भूमिका साकारल्या आहेत. मात्र आता ती अभिनय नाही तर चक्क निर्मातीच्या भूमिकेत सर्वांसमोर येत आहे. नुकतीच करिनाने तिच्या आगामी प्रोजेक्टची घोषणा केली आहे. ज्या चित्रपटात ती अभिनयासोबत निर्मातीच्या भूमिकेतदेखील असेल. हा थ्रिलर चित्रपट सत्य घटनेवर आधारित असून त्यांचे दिग्दर्शन हंसल मेहता आणि एकता कपूर करणार आहेत. एकता कपूर आणि करिना कपूर एकत्र येत या चित्रपटाच्या निर्मातीपदाची जबाबदारी सांभाळणार आहेत. या आधी ‘वीरे दी वेडिंग’मध्ये त्यांनी एकत्र काम केलं होतं.

करिनाने केली नव्या चित्रपटाची घोषणा

करिना कपूर एकता कपूरच्या बालाजी टेलीफिल्मसोबत हा चित्रपट निर्माण करत आहे. त्यामुळे हा चित्रपट जबरदस्त असेल यात शंकाच नाही. कारण चित्रपटाच्या निर्मात्या दोन यशश्वी महिला आहेत. यापूर्वी करिनाने एकतासोबत वीरे दी वेडिंग चित्रपटात काम केलं होतं. मात्र या चित्रपटात ती चक्क अभिनयासोबत निर्माती होण्याची धुरादेखील सांभाळणार आहे. करिना कपूरच्या पहिल्या बाळंतपणानंतर म्हणजेच तैमूरच्या जन्मानंतर आलेला वीरे दी वेडिंग चित्रपट सुपरडूपर हिट ठरला होता. सहाजिकच आता करिनाच्या दुसऱ्या  बाळंतपणानंतर म्हणजेच जेहच्या जन्मानंतर करिना प्रेक्षकांसमोर दुहेरी भूमिकेत (अभिनेत्री आणि निर्माती) येण्यास सज्ज झाली आहे. हा चित्रपटही करिनासाठी लकी असेल यात शंका नाही. कारण दोन्ही चित्रपट हे बालाजी टेलीफिल्मच्या बॅनरचे आहेत. 

निर्माती करिनाने व्यक्त केल्या भावना

पहिल्यांदा निर्मातीची भूमिका साकारणाऱ्या करिना कपूरने याबाबत तिच्या मनातील खास भावना चाहत्यांसोबत शेअर केल्या आहेत. करिनाच्या मते,” एकतासोबच या चित्रपटाची निर्मातीची भूमिका सांभाळणं ही सन्मानाची आणि आनंदाची गोष्ट आहे. आम्ही एकमेकींना अनेक वर्षांपासून ओळखतो. हा चित्रपट हंसल मेहता दिग्दर्शित करत आहेत. मला त्यांचे चित्रपट आणि शैली नक्कीच  आवडते. त्यांच्यासोबच पहिल्यांदा एकत्र काम करत आहे. माझ्या आयुष्यात अनेक गोष्टी पहिल्यांदा घडत आहेत. त्यामुळे मी चित्रपटाचे काम सुरू करण्यासाठी आतूर झाले आहे. करिनाने तिच्या इन्स्टा अकाउंटवर याची घोषणा केली आहे. ज्यात हंसल मेहता आणि एकतासोबत फोटो शेअर करत तिने कॅप्शन दिली आहे. “नवी सुरूवात” करिनाचा या चित्रपटाचे शीर्षक अजून जाहीर झाले नसले तरी तो ब्रिटनमधील एका सत्य घटनेवर आधारित असेल. लवकरच या चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात केली जाणार आहे. या नव्या चित्रपटासोबतच यंदा करिना आमीर खानसोबत लाल सिंह चड्ढामध्येही झळकणार आहे. विशेष म्हणजे या चित्रपटाचे शूटिंग करिनाने दुसऱ्या वेळी गरोदर असताना पाचव्या महिन्यात पूर्ण केलं होतं. या  चित्रपट हॉलीवूडच्या फॉरेस्ट गम्प या चित्रपटाचा रिमेक असेल. तसंच ती करण जौहरच्या तख्तमध्येही काम करत आहे. 

पहिल्याच दिवशी पेटले भांडण, दिव्या – प्रतीकचे घमासान

सोनली कुलकर्णी येतेय परत…चित्रपटाचे पोस्टर रिलीज

एतशा संझगिरी साकारणार किशोरवयीन आहिल्याबाईंची भूमिका

Read More From मनोरंजन