गेल्या दोन वर्षांपासून सेलिब्रिटी चित्रपटातून नाही तर सोशल मीडियातून चांगलेच अॅक्टिव्ह दिसत आहेत. काहींनी या ब्रेकच्या काळात लग्नदेखील केली आहेत. अशीच एक अभिनेत्री म्हणजे सोनाली कुलकर्णी. अप्सरा सोनाली कुलकर्णी नुकतीच विवाहबंधनात अडकली असून ती सध्या हनीमूनटाईम मजेशीर घालवताना दिसत आहे. ती आणि तिचा पती सध्या अनेक छोट्या टूर करताना दिसत आहे.तिचे फोटो पाहून खूप जणांना तिचे ट्रान्सफॉर्मेशन चांगलेच दिसून आले असेल. लग्नासाठी तिने खास ट्रान्सफॉर्मेशन केले असे अनेकांना वाटत होते. पण आता त्याचे कारण समोर आले आहे. एका चित्रपटाच्या निमित्ताने ती पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.
तमाशा लाईव्हमधून दिसणार
सोनाली कुलकर्णी ‘तमाशा लाईव्ह’ या चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. तमाशा लाईव्ह या टायटलवरुन हा चित्रपट कसा आहे याचा अंदाज अजिबात येत नाही. या चित्रपटाचे पोस्टर रिलीज केले आहे. या पोस्टरवर सोनाली कुलकर्णीचा चेहरा दिसत आहे. तिच्या चेहऱ्यावर मेकअप दिसत आहे. ब्लॅक अँड व्हाईटमध्ये असलेले हे पोस्टर यामध्ये सोनाली कुलकर्णी गडद गुलाबी रंगाच्या लिपस्टिकमध्ये दिसत आहे. या पोस्टवरुन तमाशा लाईव्हचा लाईट दिसत आहे. पण तरीही त्यातून चित्रपटाचा कोणताही अंदाज येत नाही. हा चित्रपट दिवाळीत 2022 मध्ये रिलीज होणार आहे.
चित्रपटाबद्दल
तमाशा लाईव्ह या चित्रपटाची कथा मनीष कदम यांची आहे. या चित्रपटाची पटकथा ही संजय जाधव यांची आहे. तर संवाद हे अरविंद जगताप यांचे आहे.प्लॅनेट मराठीचे अक्षय बर्दापूरकर, अभयानंद सिंग आणि पियुष सिंह यांचे निर्माते आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन संजय जाधव करणार आहे. ‘तमाशा लाईव्ह’विषयी दिग्दर्शक संजय जाधव म्हणाले, ” हा एक संगीतमय चित्रपट असून यात सुमारे तीस गाणी आहेत. मराठीत असा प्रयोग पहिल्यांदाच होत आहे. अमितराज, पंकज पडघन यांचे संगीत लाभलेल्या या चित्रपटातील गाण्याचे बोल क्षितिज पटवर्धन यांचे आहेत. तर कोरिओग्राफी उमेश जाधव यांची आहे. एकंदरच चित्रपटाची टीम एकदम भन्नाट आहे. मुळात सोनाली माझी खूप चांगली मैत्रीण आहे. परंतु आम्ही प्रथमच एकत्र काम करत आहोत. त्यामुळे या प्रोजेक्टबाबत मी खूपच उत्सुक आहे.”
सोनाली होती ब्रेकवर
सोनाली कुलकर्णी काहीच महिन्यांपूर्वी विवाहबद्ध झाली आहे. तिने लॉकडॉऊनच्या काळात अमेरिकेत असताना साखरपुडा केला. साखरपुडा तिने अत्यंत साध्या पद्धतीने केला. तिने व्हिडिओ कॉलवरुन तिने साखरपुडा केला. खूप कमी जणांच्या उपस्थितीत तिने लग्नसोहळाही आटोपला. तिच्या लग्नाला अगदी मोजकीच माणसं उपलब्ध होती. दुबईच्या एका देवळात तिने लग्न केले. मधल्या काळात तिने वजनदार डान्सिंग क्वीन या रिअॅलिटी शोमध्ये परिक्षकाची भूमिका पार पाडली
आता एका मोठ्या ब्रेकनंतर सोनाली येणार म्हटल्यावर चर्चा तर होणारच!
अधिक वाचा
एतशा संझगिरी साकारणार किशोरवयीन आहिल्याबाईंची भूमिका
आणखी एक मराठी अभिनेत्री खूप वर्षांनी दिसणार छोट्या पडद्यावर
सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा अडवाणीचं रोमॅंटिक फोटोशूट, चाहत्यांना आवडला अंदाज