मनोरंजन

कार्तिक आर्यनने बहिणीला दिली या कारणासाठी शिक्षा

Leenal Gawade  |  Apr 20, 2020
कार्तिक आर्यनने बहिणीला दिली या कारणासाठी शिक्षा

14 एप्रिलला लॉकडाऊन संपणार या आशेवर असताना अचानक दुसरा लॉकडाऊन सुरु करण्यात आला. आता 3 मे पर्यंत सगळ्यांनाच घरात राहावे लागणार आहे. सेलिब्रिटींनाही यामधून कोणत्याही प्रकारची सुटका मिळाली नाही.पण स्वत:ला boredom ने ग्रासू नये म्हणून हे सेलिब्रिटी रोज काहीना काही नवे करत आहे. म्हणजे कोणी किचनमध्ये काम करतयं, कोणी घरं आवरतंय ( यात काय नवीन हे आम्हाला देखील माहीत आहे नाही का?) म्हणजे इतरवेळी छान लाईमलाईटमध्ये फिरणारे हे कलाकार आता सध्या त्यांची घरकाम करताना दिसत आहेत. अभिनेता कार्तिक आर्यनचा लॉकडाऊन टाईम एकदम मस्त सुरु आहे. रोज तो काहीतरी नवे करताना दिसत आहे. आता त्याचा आणखी एक व्हिडिओ समोर आला आहे ज्यामध्ये तो त्याच्या बहिणीला शिक्षा देतोय. आता ही शिक्षा त्याने कशासाठी दिली आहे ते जाणून घेणे फारच गरजेचे आहे.

ब्लाऊज पीसपासून कसे शिवायचे मास्क.. सांगतेय विद्या बालन

म्हणून कार्तिकने दिली शिक्षा

आता व्हिडिओमध्ये कार्तिक आर्यन मस्त पोळी रोल खात बसला आहे. त्याच्या चेहऱ्यावरुन पोळीचा हा रोल त्याला आवडला असे अजिबात वाटत नाही. कारण तो पोळी खाता खाता उठतो. त्याच्या बहिणीकडे जातो. तिची वेणी ओढतो आणि त्या पोळीचा राग काढण्यासाठी तिच्या मागे पळतो. आता हा व्हिडिओ सिरीअस कशाला असेल नाही का? कार्तिकने यामध्ये एक धमाल केली आहे. तो लाटणं हातात घेतलेल्या बहिणीच्या मागे धूम ठोकून लागतो आणि शेवटी जे होते ते पाहून तुम्ही नक्कीच खळखळू हसाल.

Flashback : कला आणि कलाकारांबद्दल प्रेम असणाऱ्या बाळासाहेबांची आठवण

कार्तिकचा कोरोना व्हिडिओ झाला व्हायरल

लॉकडाऊनच्या सुरुवातीच्या काळात लोकांनी या आजाराला फार गांभीर्याने घेतले नव्हते. लोक विनाकारण घराबाहेर फिरत होती. त्यामुळेच कार्तिक आर्यनने अशा लोकांसाठी एक खास व्हिडिओ केला होता. कार्तिकने या नतंर एक रॅप केले होते. हा रॅप व्हिडिओसुद्धा खूप प्रसिद्ध झाला होता. त्यामुळे कोरोनाच्या काळातही कार्तिक एकदम हिट झाला होता.

कार्तिक रॉक्स

कार्तिक आणि कार्तिकची बहीण सध्या सोशल मीडियावर जास्त दिसते. तो तिच्यासोबत अनेक फनी व्हिडिओज बनवत असतो. त्यामुळे कार्तिकच नाही तर कार्तिकची बहीण सोशल मीडियावर रॉक्स असे म्हणावे लागेल. 

लॉकडाऊनमुळे वडिलांचे पार्थिवही नाही पाहू शकला हा अभिनेता, अर्ध्या रस्त्यातून यावे लागले परत

दोस्ताना 2 मध्ये दिसणार कार्तिक आर्यन

कार्तिक आर्यनच्या करीअरबद्दल बोलायचे झाले तर त्याला सोनू की टिट्टू की स्विटी पासूनच प्रसिद्धी मिळाली आहे. तरुणींमध्ये तो फारच प्रसिद्ध आहे. लॉकडाऊनपूर्वी त्याचा लव आज कल 2  हा चित्रपट येऊन गेला यात तो सारा अली खानसोबत दिसली होती. त्यांच्या या जोडीलाही फार प्रसिद्धी मिळाली होती. सारासोबतचा हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर चालला नसला तरी लोकांना ही जोडी आवडली होती.आता तो दोस्ताना 2 या चित्रपटात दिसणार आहे. या शिवाय कार्तिक आर्यन ‘भुलभुल्लैया’ या चित्रपटात ही दिसणार आहे. 

सध्या चित्रपटातून तुम्हाला कार्तिक आर्यन दिसला नसला तरी त्याच्या सोशल मीडियावरुन तुम्हाला तो नक्कीच दिसू शकेल.

Read More From मनोरंजन