आषाढी एकादशीसाठी वारकऱ्यांचा मेळा सध्या पंढरपूरच्या दिशेने निघाला आहे. दरवर्षी आषाढी वारीत लाखो वारकरी सहभागी होतात. पावसातून भिजत, अनवाणी वारी करणाऱ्या या वारकऱ्यांच्या चेहऱ्यावर एक अनोखा आनंद असतो. वारकऱ्यांप्रमाणेच पंंढरपूरच्या वारीला जाण्याचं अनेकांचं स्वप्न असतं. त्यामुळे बऱ्याचदा विठ्ठलाच्या दर्शनासाठी मराठी कलाकारदेखील वारीत सहाभागी होतात.सध्या मराठी अभिनेत्री दिप्ती भागवत आणि गायिका कार्तिकी गायकवाड सध्या आषाढीच्या वारीत सहभागी झाल्या आहेत. या दोघी टेलीव्हिजनवरील ‘गजर कीर्तनाचा’ या कार्यक्रमाचं सूत्रसंचालन करतात. टेलीव्हिजन वाहिनीकडून या कार्यक्रमाच्या प्रमोशनसाठी आणि वारीचा अनोखा आनंद लुटण्यासाठी या दोघी वारीला गेल्या आहेत. त्यामुळे विठ्ठलाच्या दर्शनाला आतूर झालेले भक्तगण आणि मराठी कलाकार असा अनोख संगम त्या निमित्ताने चाहत्यांना पाहण्यास मिळत आहे. वारीमध्ये सहभागी झालेले भक्तगण या दोघींसोबत फोटो घेत आहेत. सामान्य जनतेच्या सुरक्षेची जबाबदारी चोख बजावणाऱ्या पोलीस बांधवानादेखील या मराठी कलाकारांसोबत सेल्फी घेण्याचा मोह आवरता नाही.
कीर्तन लोकप्रबोधनाचे प्रभावी माध्यम
कीर्तन हा भारतीय लोकसंस्कृतीचे दर्शन घडवणारा एक अप्रतीम संगीत प्रकार आहे. कीर्तनाच्या माध्यमातून प्रभावीपणे लोकप्रबोधन केले जाते. सध्या झी टॉकीजवर सुरू असलेल्या ‘गजर कीर्तनाचा, सोहळा आनंदाचा’ या कार्यक्रमाला प्रेक्षक चांगला प्रतिसाद देत आहेत. या कार्यक्रमाचे निवेदन दिप्ती भागवत आणि कार्तिकी गायकवाड करतात. तसंच विविध अभ्यासू किर्तनकारांचे कीर्तन या कार्यक्रमातून सादर केलं जातं. आषाढी एकादशीनिमित्त या कार्यक्रमाची निर्मिती टीम आणि सूत्रसंचालक सध्या वारीत सहभागी झाले आहेत. ज्यामुळे एक वेगळाच आनंद वारकरी आणि मराठी कलाकारांमध्ये निर्माण झालेला दिसत आहे.
कार्तिकी वारकऱ्यांसाठी गातेय भक्तीगीतं
पहिल्या लिटील चॅम्प्सची विजेती कार्तिकीने आता पार्श्वगायनामध्ये स्वतःचे एक वेगळे नाव कमावले आहे. शिवाय ती स्वतः आळंदीमधील असल्यामुळे विठ्ठल भक्तांमध्ये ती फारच लोकप्रिय आहे. सध्या ती आणि अभिनेत्री दिप्ती भागवत आषाढी वारीला गेल्या आहेत. कार्तिकी सध्या वारीत सहभागी होऊन विठ्ठलाची गाणी गात आहे तर दिप्ती वारकऱ्यांशी मुक्त संवाद साधत आहे. ज्यामुळे वारीत सहभागी झालेल्या विठ्ठलभक्तांच्या वारीचा आनंद द्विगुणित झाला आहे. वारीत सहभागी झालेले वारकरी कार्तिकी आणि भक्तीसोबत फोटो काढत आहेत. आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्यापूर्वीच त्या वारीचा आनंद लुटताना त्या दिसत आहेत. पंढरपूरच्या या वारीत विठ्ठल कोणत्या रूपात येऊन दर्शन देईल हे सांगता येत नाही अशी विठ्ठलभक्तांची श्रद्धा असते. त्यामुळे वारकऱ्यांकडून भरभरून मिळणारे हे प्रेम पाहून भक्ती आणि कार्तिकीदेखील भारावून गेल्या आहेत.
आषाढी एकादशीचे महत्त्व
आषाढी एकादशीला देवशयनी एकादशी असेही म्हणतात. हा दिवस महाराष्ट्रात अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. आषाढी एकादशीला विठ्ठलाचे दर्शन घेण्यासाठी महाराष्ट्रभरातून विठ्ठल भक्त पंढरपूरला गोळा होतात. चंद्रभागेत स्नान करून विठ्ठलाचे दर्शन घेतात. विठ्ठलाच्या दर्शनासाठी आषाढीवारीत सहभागी होणाऱ्या विठ्ठलभक्तांना पायी चालताना देहभानदेखील राहत नाही. या वारीत विविध प्रांतातील लोक एकत्र येतात. प्रत्येक व्यक्तीमध्ये विठ्ठलाचे रूप पाहतात. गरीब असो वा श्रीमंत, लहान असो वा वृद्ध सर्वांना या वारीत एकसमान वागणूक दिली जाते. पंढरपूरच्या वारीत रंगणारा हा भक्तीमेळा पाहण्यासाठी प्रत्येकाने एकदातरी वारीत नक्कीच सहभागी व्हायला हवं
अधिक वाचा
पूर्वी भावेचा सुंदर नृत्याविष्कार ‘भज गणपती’
लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी लावायलाच हवी ही evergreen गाणी (Ganpati Songs In Marathi)
पुण्यातील प्रसिद्ध पर्यटन स्थळं
फोटोसौजन्य – इन्स्टाग्राम
Read More From Festival
170+ Happy Diwali Wishes, Messages, Quotes, Status In Marathi 2022 | दिवाळी शुभेच्छा संदेश मराठीत
Aaditi Datar
150+ स्वातंत्र्य दिनाच्या हार्दिक शुभेच्छा | Happy Independence Day Quotes In Marathi
Aaditi Datar