लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी लावायलाच हवी ही evergreen गाणी (Best Ganpati Songs In Marathi)

लाडक्या बाप्पाच्या स्वागतासाठी लावायलाच हवी ही evergreen गाणी (Best Ganpati Songs In Marathi)

सगळ्यांचे दु:ख दूर करुन आनंद आणणारा बाप्पा सगळयांचाच अगदी फेव्हरेट आहे. त्याला वेगवेगळ्या नावाने ओळखले जाते. गणेशचतुर्थीच्या दिवशी तो तब्बल 10 दिवस पृथ्वीवर येतो मग काय त्याच्या आगमनामुळे वातावरण एकदम बदलून जाते.. देशभरात उत्साहाचं,चैत्नयाचं असं वातावरण असतं. घरोघरी बाप्पाची आरास केली जाते. सार्वजनिक मंडळात बाप्पाच्या आगमनाची त्याच्या सेवेची जोरदार तयारी केली जाते. अशा या बाप्पाचे काहीच महिन्यात आगमन होणार आहे आणि गाण्याशिवाय बाप्पाच्या आगमनाची मजा ती काय? बरोबरना म्हणूनच तुमच्यासाठी बाप्पाची काही खास गाणी काढली आहे. त्यातील काही जुनी आहेत तर काही आताच्या काळातील. ही गाणी कोणती ते जाणून घेण्याआधी गणेशोत्सवाबाबत अधिक माहिती घेऊया


best ganpati songs


20 गणपतीची गाणी


गणपती आरती गाणी


असा साजरा केला जातो गणेशोत्सव? (How To Celebrate Ganesh Chaturthi)


देशभरात गणपती बाप्पाचे आगमन मोठ्या थाटामाटात केले जाते. गणपतीची विविध रुपातील मूर्तींची घरी प्रतिष्ठापना केली जाते. सकाळी आणि संध्याकाळी बाप्पाची आरती केली जाते.सगळ्यात महत्त्वाचे म्हणजे या दिवसात बाप्पाच्या आवडीने मस्त मोदक केले जातात. या शिवाय गोडधोड पदार्थांची रेलचेल असते ती वेगळीच म्हणा.. महाराष्ट्रात, देशभरात आणि परदेशात बाप्पाच्या रितीभाती थोड्याफार फरकाने वेगळ्या असतील. पण बाप्पावरील श्रद्धा, प्रेम मात्र तितकेच असते. बाप्पाचे आगमन झाल्यानंतर त्याची प्राणप्रतिष्ठा करण्यात येते. घरी छान गोडधोड बनवले जाते. त्या निमित्ताने घरी पाहुण्यांची उठबस होते. सगळीकडे एकदम आनंदाचे वातावरण असते.


जाणून घ्या नागपंचमीबाबत सर्वकाही


गणपती आगमन आणि विसर्जनासाठी ही आहेत परफेक्ट 20 गणपतीची गाणी (Best Ganpati Songs In Marathi)


लाडक्या बाप्पाच्या स्वागताला अगदी काहीच दिवस उरले आहेत. सगळ्यांची तयारी सुरु झाली असेल म्हणा. पण यावेळी तुम्ही बाप्पाचे स्वागत अगदी दणक्यात करा


1. मोरया मोरया (Morya Morya)


अजय- अतुल  यांचे सर्वात गाजलेले आणि प्रसिद्ध गाणं म्हणजे ‘मोरया मोरया’. उलाढाल या 2008 साली आलेल्या चित्रपटातील हे गाणं आहे. आदित्य सरपोतदार यांनी दिग्दर्शित केलेल्या चित्रपटातील हे गाणं आहे. आजही बाप्पासाठी कोणतं गाणं लावायचं म्हटलं की, हे गाणं आवर्जून लावलं जातं. त्यामुळे बाप्पाच्या स्वागतासाठी हे गाणं तर नक्कीच आणि आवर्जून लावायला हवं.


देवा तुझ्या दारी आलो.. गुणगान गाया


तुझ्याविना माणसाचा जन्म जाई वाया


देवा दिवी हाक उद्धार कराया


आभाळाची छाया तुझी समिंदराची माय


मोरया मोरया…

Subscribe to POPxoTV

या गाण्याचे बोल इतके मंत्रमुग्ध करणारे होते की, आजही हे गाणं एकदम फ्रेश वाटतं


2. तूच सुखकर्ता (Tuch Sukhkarta)


90च्या दरम्यानचा तुमचा जन्म असेल तर तुम्ही कदाचित तुमच्या लहानपणी तुम्ही हे गाणं नक्कीच ऐकलं असेल. हे गाणं त्यावेळी नेहमीच लावल जायचंय


तूच सुखकर्ता तूच दुखहर्ता अवघ्या दिनांच्या नाथा


बाप्पा मोरया रे …॥


चरणी ठेवितो माथा॥


पहा झाले पुरे एक वर्ष, होतो वर्षान एकदाच हर्ष


गोड अन्नाचा होतो रे स्पर्ष, घ्यावा संसाराचा परामर्ष


पुर्या वर्षाची सार्या दुखाची, वाचावी कशी मी गाथा॥


बाप्पा मोरया रे …॥


चरणी ठेवितो माथा

Subscribe to POPxoTV

असे या गाण्याचे बोल होते.


रांगोळीचे विविध प्रकार आणि सोप्या डिझाईन्स


3. देवा श्रीगणेशा  (Deva Shree Ganesha)


अजय- अतुलने गायलेले हे आणखी एक गाणं सुपर डुपर हिट होते असे म्हणायला हवे. 2011 साली आलेल्या ‘अग्निपथ’ या चित्रपटातील हे गाणं. अमिताभ बच्चनच्या 1990 साली आलेल्या अग्निपथचा हा रिमेक होता.  ऋतिक रोशन, प्रियांका चोप्रा आणि संजय दत्त या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते. या गाण्यामध्येही एक वेगळाच स्पार्क होता. तुम्ही या गाण्यावर थिरकणार नाही असे होणार नाही. या गाण्यातील प्रत्येक बीट अंगावर आनंदाचा शहारा आणणारा आहे. हे गाणं जरी हिंदी असलं तरी हे गाणं कित्येक इतर भाषिकांच्या आवडीचे होते. परदेशातही या गाण्याची क्रेझ असेलली पाहायला मिळाली.


देवा श्री गणेशा, देवा श्री गणेशा


ज्वाला सी जलती है आँखो में


जिसके भी दिल मे तेरा नाम है


परवाह ही क्या उसका आरंभ कैसा है


और कैसा परिणाम है


धरती अंबर सितारे


उसकी नज़रे उतारे


डर भी उससे डरा रे


जिसकी रखवालिया रे


करता साया तेरा हे

Subscribe to POPxoTV

या गाण्याचे बोल आहेत


4. एकदंताय वक्रतुंडाय (Ekdantay Vakaratunday)


शंकर महादेवन यांनी गायलेलं हे गाणं  विरुद्ध या चित्रपटातील आहे. 2005 साली हा चित्रपट रिलीज झाला. अमिताभ बच्चन, जॉन अब्राहिम, शर्मिला टागोर आणि अनुष्का दांडेकर यांच्या या चित्रपटात प्रमुख भुमिका आहेत. महेश मांजरेकर यांनी दिग्दर्शित केलेला हा चित्रपट फॅमिली ड्रामा या प्रकारातील होता. या चित्रपटात हे गाणं ओपनिंग किंवा इन्ट्रोडक्टरी गाणं आहे असं म्हणायला हवं. शंकर महादेवन यांनी गायलेलं हे गाणं इतकं शांत आणि मस्त आहे. हे गाणं सुरु झालं की, तुम्ही या गाण्यात गुंग होणारच.. या गाण्याची प्रसिद्धी इतकी होती की, या गाण्यावर अनेक क्लासिकल आणि सेमी क्लासिकल डान्स बसवले गेले.


गणनायकाय गणदेवताय गणाध्यक्षाय धीमहि ।


गुणशरीराय गुणमण्डिताय गुणेशानाय धीमहि ।


गुणातीताय गुणाधीशाय गुणप्रविष्टाय धीमहि ।


एकदंताय वक्रतुण्डाय गौरीतनयाय धीमहि ।


गजेशानाय भालचन्द्राय श्रीगणेशाय धीमहि ॥


वाचा - लता मंगेशकर यांची मराठी भावगीत

Subscribe to POPxoTV

5. या रे या सारे या गजनानाला आळवुया ( Ya Re Ya Saare Ya)


प्रियांका चोप्राची प्रस्तुती असलेल्या व्हेंटिलेटर या चित्रपटातील हे गाणे. घरातील ज्येष्ठ व्यक्ती आजारी पडल्यानंतर एकत्र आलेले कुटुंब.. एकमेकांपासून दुरावलेली मन एकत्र येताना घडणाऱ्या गोष्टी यात दाखवण्यात आल्या आहेत. बाप्पावर अपार श्रद्धा असलेलं हे कुटुंब दुरावा असूनही कसं एकत्र येतं हे यात दाखवण्यात आले आहे. चित्रपटातील एका प्रसंगी हे गाणं दाखवण्यात आलं आहे. मुंबईत बाप्पाची जंगी मिरवणूक काढली जाते. बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी परदेशातूनही या गणेशोत्सवाच्या काळात लोकं येतात. हे या गाण्यातून दाखवण्यात आले आहे. मल्टीस्टारर कास्ट असलेल्या या चित्रपटात आशुतोष गोवारीकर यांची महत्त्वाची भुमिका आहे.


या रे या सारे या


गजाननाला आळवूया


नाम प्रभूचे गाऊया


गणपती बाप्पा मोरया


मंगलमूर्ती मोरया


गुणगान तुझे ओठांवर राहू दे


चरणी तुझ्या हे जीवन वाहू दे


नाथांचा नाथ तू, मायेची हाक तू


भक्तीचा नाद तू, माऊली तुझी दया


उपकार तुझे सुखदायक सुखकर्ता


आधार तुझा तू तारण करता


तू माता, तूच पिता


तू बंधू, तूच सखा


आम्हावरी राहू दे माऊली तुझी दया

Subscribe to POPxoTV

असे या गाण्याचे बोल आहे. हे गाणे पाहिल्यानंतर आणि ऐकल्यानंतर बाप्प्पाला नुसते बघतच राहावेसे वाटते


6. शेंदुर लाल चढायो (Shindoor Laal Chadhayo)


बाप्पाचं हे गाणं तुम्ही लावलं नाही तर काहीच अर्थ नाही. हे गाणं इतकं एव्हरग्रीन आहे. 1999 साली आलेल्या ‘वास्तव’ या चित्रपटातील हे गाणं आहे. महेश मांजरेकर यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते. संजय दत्त या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होता.ड्रामा आणि अॅक्शनने भरलेला असा हा चित्रपट त्यावेळी खूप गाजला होता. या चित्रपटात बाप्पाची आळवणी करतानाचे हे गाणं होतं.


शेंदूर लाल चढायो अच्छा गजमुखको ||


दोंदिल लाल बिराजे सूत गौरीहरको ||


हाथ लिए गुड-लड्डू साईं सुरवरको ||


महिमा कहे ना जाय लागत हूँ पदको || 1 ||


जय जय श्री गणराज विध्यासुखदाता || धन्य तुम्हारा दर्शन मेरा मन रमता ||

Subscribe to POPxoTV

आजही हे गाणं अनेकांची रिंगटोन किंवा कॉलरट्युन असताना तुम्ही ऐकले असेल.


7. गणपती बाप्पा मोरया (Ganpati Bappa Morya)


ABCD(Any body can dance) हा चित्रपट 2008 साली आला. या चित्रपटातील हे गाणं. बाप्पाची विसर्जन मिरवणूक या गाण्यामध्ये दाखवण्यात आली आहे. हे गाणं त्यावेळी खूपच जास्त चाललं होतं. या गाण्यात प्रभू देवा, गणेश आचार्य दिसत आहे. हा चित्रपट डान्स जर्नीवर होता.त्यामुळे या गाण्यात त्यावेळचे अनेक डान्सर्स दिसत आहेत.


रिद्धी,सिद्धी, वृद्धि होती,हा तेरेही आने से


हा और सुंदर ये सृष्टी होती हा तेरे ही आनेसे

Subscribe to POPxoTV

मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया पुढच्या वर्षी लवकर या, असे या गाण्याचे बोल आहेत


वाचा - दिवसाची सुरूवात करा या पहाटेच्या भक्ती गीतांनी


8. गजानना गजानना पार्वतीनंदन गजानना (Gajanana Gajanana Parvati Nandan Gajanana)


हे गाणं तसं जुनच आहे. पण हल्लीच आलेल्या ‘लोकमान्य: एक युगपुरुष’ या चित्रपटात हे गाणं घेण्यात आलं आहे. सार्वजनिक गणेशोत्सवाची मुहूर्तमेढ टिळकांनी रोवली आणि लोकांना एकत्र आणले. सुबोध भावे याने या चित्रपटात टिळकांची भूमिका साकारली आहे. त्यात गणेशोत्सवाचा एक प्रसंग दाखवण्यात आला आहे. बाप्पाच्या आगमनासाठी हे गाणं आहे.


गजानना गजानना पार्वतीनंदन गजानना


विघ्नविनाशक एकदंताय, गौरीपुत्रा गजानना


देवांचा तू देव मोरया गातो तुझे गुणगान


वाट नवी चालाया दे तू  शक्तीचं वरदान

Subscribe to POPxoTV

असे या गाण्याचे बोल होते.


9. मोरया रे (Morya Re)


अमिताभ बच्चन यांचा DON हा चित्रपट तुम्ही नक्कीच पाहिला असेल  तुम्ही जर पाहिला नसेल तर त्याचा रिमेकदेखील आला होता. त्यामध्ये शाहरुख प्रमुख भूमिकेत होता. 2006 साली Don हा चित्रपट आला. त्या चित्रपटातील हे गाणं. बाप्पाच्या विसर्जनाचे हे गाणे आहे. शंकर महादेवन यांनी गायलेले हे गाणं गायले असून या गाण्यामध्ये मस्त विसर्जनाचा तो आनंद सोबत बाप्पा जाण्याचे दु:खही दिसते. पण अगले बरस आना है आना ही होगा… ही ओळ तुमच्यामध्ये एक वेगळीच उर्जा भरते.


मेरे सारे पलछिन सारे दिन


तरसेंगे सुन ले तेरे बिन


तुझको फिरसे जलवा दिखानाही होगा


अगले बरस आना है, आना ही होगा


देखेंगी तेरी राहे, प्यासी प्यासी निगाहे


तो मान ले, तू मान भी ले कहना मेरा


लोट के तुझको आना है,सुन ले कहता दिवाना है,


जब तेरे दर्शन पाएंगे, चैन तब हमको पाना है ||

Subscribe to POPxoTV

असे या गाण्याचे बोल आहेत.


10. गजानना गणराया(Gajanana Ganraya)


नुकत्याच आलेल्या बाजीराव मस्तानी या चित्रपटातील हे बाप्पाचं गाणं. सुखविंदर सिंह यांनी हे गाणं या चित्रपटासाठी गायले आहे. हा चित्रपट सुपरडुपर हिट होता. चित्रपट हिंदी असला तरी यात आपल्या लाडक्या बाप्पाची आरती घेण्यात आली आहे. एकूणच हे गाणं ऐकल्यानंतर मराठी गाणं ऐकल्याचा फिल येतो.


लंबोदर तू, विनायका तू बल्लाळेश्वर मोरया


विघ्नेश्वर तू, एकदंत तू मयुरेश्वरा मोरया


वक्रतुंड तू  गजमुखा तू सिद्धीविनायका


गजानना गजानना, गजानाना गणराया

Subscribe to POPxoTV

या गाण्यात बाप्पाची विविध रुपे सांगण्यात आली आहेत. हे गाणं रणवीर सिंहवर चित्रित करण्यात आले आहे.


11. हे विघ्नहर्ता बाप्पा विघ्नहर्ता (Hey Vignaharta Bappa Vignharta)


2016 साली आलेल्या Banjo या चित्रपटातील हे गाणं आहे. या चित्रपटाने फार कमाईल केली नसली तरी हे गाणं मात्र अनेकांना आवडलं होतं आणि हे गाणं बाप्पाच आहे म्हटल्यावर ते नक्कीच सगळ्यांना आवडणार. रितेश देशमुख या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होता. विशालआणि शेखर यांनी या गाण्याला संगीतबद्ध केलं होतं. तर विशालने हे गाणं गायलं होते.


हे विघ्नहर्ता हे बाप्पा विघ्नहर्ता


सहस्त्र भक्तजन का तू एक कर्ता धर्ता


है द्वेष मुक्त मन वो तू जिसमे वास करता


इसिलिए तो सबसे बोले बाप्पा मोरया रे


हे विघ्नहर्ता हे बाप्पा विघ्नहर्ता

Subscribe to POPxoTV

असे या गाण्याचे बोल आहेत. चित्रपटाच्या नावाप्रमाणेच हे गाणे अगदी हटके आणि कलरफूल आहे


20 मराठी देशभक्तीपर गीतं आणि त्याचा अर्थ


12. जयघोष चाले तुझा मोरया (Jaigosh Chale Tuza Morya)


‘अरे आवाज कोणाचा’ या मराठी चित्रपटातील हे गाणं असून हे गाण आनंद शिंदे यांनी गायले आहे.


तू सुखकर्ता तु दु:खहर्ता


भक्तगणांचा दाता


तुझ्या भक्तीचा जागर केला


दे वरदान तू आता

Subscribe to POPxoTV

असे या गाण्याचे बोल आहेत.


13. अशी चिकमोत्याची माळ (Ashi Chikmotyachi Maal)


लहानपणी अनेकांनी या गाण्यावर नक्कीच सार्वजनिक कार्यक्रमात डान्स केला असेल. कारण हे गाणं फारच प्रसिद्ध होते. अनेकांच्या या गाण्याशी खूप आठवणी जोडलेल्या असतील. या गाण्याचा पहिला म्युझिक पीस तर आजही अनेकांच्या लक्षात आहे.


अशी चिकमोत्याची माळ, होती ग तीस तोळ्याची ग


चिकमोत्याची माळ, होती ग तीस तोळ्याची ग -  


जसा गणपतीचा गोंडा, चौरंगी लाल बावटा ग


गणपतीचा गोंडा, चौरंगी लाल बावटा ग

Subscribe to POPxoTV

14. ओह माय फ्रेंड गणेशा (Oh My Friend Ganesha)


लहानमुलांसाठी आलेला बाप्पाचा my friend ganesha चित्रपट आणि त्यातील हे गाणं.. बाप्पा सगळ्यांचाच मित्र आहे. प्रत्येकाच्या अडीअडचणीला धावणारा आणि त्यांना मार्ग दाखवणारा असा बाप्पा.. त्या बाप्पासाठी गाणं गाणारा एक चिमुकला यात दाखवण्यात आला आहे.


धरती उपर दरीया, दरीया के उपर अंबर


अंबर के उपर चंदा, चंदा के उपर तारे


धरती के उपर दरीया, दरीया के उपर अंबर


अंबर के उपर चंदा, चंदा के उपर तारे


तारो मे तारा धृव तारा, देवो मे तू देव हमारा


सबसे उपर तू ही हमेशा


ओह माय फ्रेंड गणेशा तू रहना साथ हमेशा

Subscribe to POPxoTV

असे या गाण्याचे बोल आहेत. हे गाणं लहान मुलांचे असले तरी हे गाणं मस्त आहे.


15. सूर निरागस हो (Sur Niragas Ho)


म्युझिकल ड्रामावर आधारीत असलेला 2015 साली आलेला ‘कट्यार काळजात घुसली’  हा चित्रपट खूपच चालला. या चित्रपटातील हे गाणं. शंकर महादेवन यांनी हे गाणं गायलं असून या गाण्यात ते स्वत: आहेत.


सूर निरागस हो 


सूर निरागस हो


शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरदविनायक.


शुभनयना करुणामय गौरीहर श्री वरदविनायक.


ॐकार गणपती. ॐकार गणपती.


अधिपती. सुखपती. छंदपती. गंधपती


लीन निरंतर हो. लीन निरंतर हो...


सूर निरागस हो


मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया


मोरया. मोरया. गणपती बाप्पा मोरया


गजवदना तु सुखकर्ता


गजवदना तु दु: खहर्ता


गजवदना मोरया. मोरया.

Subscribe to POPxoTV

असे या गाण्याचे बोल असून सर्व गणेशभक्तांनी ऐकावे असे हे गाणं आहे.


16. रांजण गावाला गावाला महागणपती (Ranjan Gavala Gavala)


अष्टविनायकापैकी एक बाप्पा हा रांजणगावात आहे. या रांजणगावच्या बाप्पावरच हे गाणे आहे.  सगळ्यात आधी उषा मंगेशकर यांनी हे गाणं गायलं. त्यानंतर या गाण्याचे अनेक व्हर्जन आले. त्यामुळे हे गाणं देखील सर्वश्रूत आहे.


रांजणगावाला गावाला महागणपती नांदला


चला पहाटे पहाटे देव केव्हाचा जागला


रांजणगावाला गावाला महागणपती नांदला


त्रिपुरासूर ऐसा कोपे शिवंकराला टोपे


पुत्र गणपती गणपती राणी सह्याला धावला


रांजणावाला गावाला महागणपती नांदला

Subscribe to POPxoTV

असे या गाण्याचे बोल आहेत. जर तुम्ही अष्टविनायकाची यात्रा केली असेल आणि रांजणगावी गेला असाल तर तिकडे तुम्ही हे गाणं नक्की ऐकलं असेल.


17. तुझं मागतो मी आता (Tuza Magto Me Aata)


बाप्पाचं हे गाणंही जुनचं आहेत. लता मंगेशकर यांनी हे गायलेलं गाण आहे. या गाण्याबद्दल फार काही बोलायलाच नको. लता दिदींच्या आवाज ऐकल्यानंतर तुम्ही मंत्रमुग्ध होऊन जाल.


तुझं मागतो मी आता, मज द्यावे एकदंता


तुझे ठायी माझी भक्ती विरुठावी भक्ती


तुझे ठायी ज्याची प्रीती, त्याची घडावी संगती

Subscribe to POPxoTV

असे या गाण्याचे बोल आहेत.


18. मोरया मोरया बाप्पा बाप्पा मोरया (Morya Morya Bappa Bappa Morya)


अंडरवर्ल्डवर आधारीत असलेला मराठी चित्रपट ‘दगडी चाळ’  (2015) साली रिलीज झाला होता. अंकुश चौधरी या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होता. या चित्रपटात गणेशोत्सवाचा एक सीन दाखवण्यात आला आहे. त्यामध्ये एक गाणं आहे. आदर्श शिंदे याने गायलेलं हे गाणं आहे.


हे गणराया, वारसा हा शक्तीचा


लागला आम्हाला नादखुळा भक्तीचा


नामघोष आभाळाला फिरला


मोरया मोरया मोरया मोरया


गणपती बाप्पा मोरया

Subscribe to POPxoTV

असे या गाण्याचे बोल होते.


19. प्रथम तुला वंदितो (Pratham Tula Vandito)


अष्टविनायक या मराठी चित्रपटातील हे गाणं असून हा चित्रपट त्याकाळी खूप गाजला होता. अष्टविनायकाचे दर्शन या चित्रपटात करुन दिले होते. सचिन पिळगावकर आणि वंदना पंडीत या चित्रपटात प्रमुख भूमिकेत होते.


प्रथम तुला वंदितो कृपाळा


गजानना गणराया 


प्रथम तुला वंदितो 

Subscribe to POPxoTV

असे या गाण्याचे बोल होते.


20. पार्वतीच्या बाळा तुझ्या पायात वाळा (Parvatichya Bala Tuzya Payat Bala)


हे गाणं तर इतकं जुन आहे की, अनेक गणेश मंडळात हे गाणं हमखास लावले जाते. आनंद शिंदे यांनी हे गाणं सगळ्यात आधी गायलं. या गाण्याचे  कितीतरी रिमिक्स व्हर्जन आले. पण तरीही आनंद शिंदे यांचे हे गाणं आजही तितकंच evergreen आहे.


पार्वतीच्या बाळा,पायात वाळा


पार्वतीच्या बाळा,तुझ्या पायात वाळा


पुष्प हारांच्या घातलात माळा


ताशांचा आवाज


ताशांचा आवाज तारारारा   झाला र


गणपती माझा नाचत आला


ताशांचा आवाज तारारारा   झाला र


गणपती माझा नाचत आला

Subscribe to POPxoTV

आपल्या लाडक्या गणपतीची आरती गाणी (Ganesh Aarti)


वर बाप्पांच्या गाण्यामध्ये बऱ्यापैकी आरतींमधील ओळींचा वापर करण्यात आला आहे. आता गणपतीची आरती कोणती ती देखील पाहूया. तशी तर अनेक भाषांमध्ये आपल्या लाडक्या बाप्पाची आरती आहेत. पण या काही निवडक आरती खास तुमच्यासाठी


1. सुखकर्ता दुखहर्ता वार्ताविघ्नाची (Sukhkarta Dukhharta) बाप्पाची ही आरती सगळ्यांना माहीत असेलच या गाण्यानेच सगळ्या आरतींना सुरुवात केली जाते


2. वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ (Vakratunda Mahakaya)

Subscribe to POPxoTV

सुरेश वाडकरांच्या आवाजातील ही आरती तर अजूनही अनेकांच्या लक्षात असेल.ही आरती देखील तशी बरीच प्रसिद्ध आहे. तुम्ही ही नक्कीच ऐकली असेल.


3. श्री सिद्धीविनायक मंत्र (Shri Siddhivinayak Mantra)

Subscribe to POPxoTV

सुरेश वाडकर यांच्या आवाजातील सिद्धीविनायक मंत्र आजही अनेक ठिकाणी लावले जाते. अमिताभ बच्चन यांनी देखील त्यांच्या आवाजात सिद्धिविनायक मंत्र गायले आहे.


देखील वाचा - 


लक्ष्मीच्या कृपेचा दिवस...अक्षय तृतीया शुभेच्छा संदेश