मनोरंजन

सुर्यवंशीच्या सेटवर कतरिना कैफकडून करून घेतलं जात आहे ‘हे’ काम

Trupti Paradkar  |  Feb 3, 2020
सुर्यवंशीच्या सेटवर कतरिना कैफकडून करून घेतलं जात आहे ‘हे’ काम

कतरिना कैफ आणि अक्षय कुमार सध्या त्यांच्या आगामी चित्रपट सुर्यवंशीच्या शूटिंगमध्ये व्यस्त आहेत.  सुर्यवंशी एक कॉप ड्रामा आहे. रोहीत शेट्टी या चित्रपटाचं दिग्दर्शन करत आहे. रोहीतने त्यांच्या सिम्बा चित्रपटामधून सुर्यवंशी चित्रपटाचं नाव जाहीर केलं होतं. लवकरच हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. ज्यामुळे या चित्रपटाच्या चित्रीकरणाचं काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा प्रयत्न सूरू आहे. सुर्यवंशी चित्रपटात  अक्षय आणि कतरिना मुख्य भूमिकेत आहे. मात्र या चित्रपटाच्या सेटवर कतरिना मात्र नेहमीपेक्षा वेगळं काम करताना दिसत आहे. ज्यावर तिच्या को-स्टार अक्षयने मजेशीर कंमेट केली आहे. 

कतरिना कैफ सेटवर करत आहे ‘हे’ काम

अभिनेता अक्षय कुमारने त्याच्या इन्स्टा अकाउंटवरून हा व्हिडिओ शेअर केला आहे. ज्यामध्ये अभिनेत्री कतरिना कैफ चक्क सेटवर केर काढताना दिसत आहे. या व्हिडिओसोबतच अक्षयने शेअर केलं आहे की, “सुर्यवंशीच्या सेटवर नवीन स्वच्छ भारत ब्रॅंड अॅंम्बेसेडर”. कलाकारांना चित्रपटाच्या शूटिंगदरम्यान अनेक तास अथवा कधी कधीतर अनेक दिवस एकत्र राहावं लागतं. ज्यामुळे शूटिंग व्यतिरिक्त काळात एकमेकांचे मनोरंजन करण्यासाठी अनेक असे किस्से घडत असतात. अभिनेता अक्षय कुमार तर चित्रपटाप्रमाणेच त्याच्या खऱ्याखुऱ्या जीवनातही मौजमस्ती करत असतो. अक्षयने अशीच मौजमस्ती करत हा व्हिडिओ शूट केला आहे. त्याने शूट केलेला हा सेटवरचा व्हिडिओ चांगलच व्हायरल होत आहे. कतरिनाचा सेटवर साफसफाई करत असलेल्या व्हिडिओला चाहत्यांकडून चांगला प्रसिसाद आणि कंमेट्स मिळत आहे. 

2020 मध्ये ईदच्या मुहूर्तावर सुर्यवंशीचा धमाका

सुर्यवंशी चित्रपटाची निर्मिती करण जोहर आणि रोहीत शेट्टी करत आहेत. 2020 मध्ये ईदच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. सिंघम आणि सिम्बामधील पोलिसाच्या भुमिकेतील अजय देवगन आणि रणवीर सिंगला प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. आता सुर्यवंशीमध्ये अक्षयची भूमिका नेमकी कशी असेल याबाबत सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. रोहित शेट्टीचा अंदाज प्रत्येक चित्रपटामध्ये हटके असतो.  शिवाय अक्षयकुमार पहिल्यांदाच रोहितबरोबर सुर्यवंशीमध्ये काम करत आहे. त्यामुळे या चित्रपटाबाबत प्रंचड उत्सुकता लागली आहे. सिम्बामधील ‘सूर्यवंशी’ची पहिली झलक पाहिल्यापासूनच प्रेक्षकांमध्ये याबाबत प्रचंड क्रेझ निर्माण झाली आहे. 

अक्षय आणि कतरिना हिट जोडी पुन्हा एकदा एकत्र

खरंतर मागील काही वर्षांपासून अक्षय आणि कतरिनाच्या अफेअरच्या चर्चांमुळे ट्विंकलने अक्षयला कतरिनासोबत काम करण्यास मनाई केली होती. मात्र आता अक्षयने ट्विकंल खन्ना चा राग शांत केला असावा. म्हणूनच तिने अक्षयला पुन्हा कतरिनासोबत काम करण्यासाठी परवानगी दिली असावी. कारण काहिही असलं तरी जवळजवळ नऊ वर्षांनी ‘अक्षय आणि कॅट’पुन्हा एकत्र येणार आहेत. त्यामुळे पुढच्या वर्षी अक्षय-कतरिनाची जोडी आणि रोहीत शेट्टीचे अफलातून दिग्दर्शन यातून ‘सुर्यवंशी’ ब्लॉकब्लस्टर नक्कीच ठरणार.

फोटोसौजन्य् – इन्स्टाग्राम

हे ही वाचा –  

#POPxoLucky2020 ने आम्ही देत आहोत या दशकाला निरोप, प्रत्येक दिवशी असेल एक नवीन सरप्राईज, मग नक्की बघा नवीन POPxo Zodiac Collection ज्यामध्ये आहे नोटबुक्स, फोन कव्हर्स आणि मॅजिक मग्ज्स जे आहेत मजेशीर आणि अगदी 100% तुमच्यासारखे. एवढंच नाहीतर यावर आहे 20% डिस्काऊंट, मग लगेच क्लिक करा POPxo.com/shopzodiac आणि शॉप करा.

अधिक वाचा –

नेहा कक्कड आणि आदित्यचं लग्न खरंच ठरतंय…

Bigg Boss 13: रश्मी देसाईने केलं अरहान खानबरोबर ब्रेकअप, हिमांशीकडून घरच्यांना निरोप

जयललितांच्या रुपात भरतनाट्यम करणार कंगना, पोस्टर झाले व्हायरल

Read More From मनोरंजन