घराबाहेर कावळा जास्तच कावकाव करू लागल्यावर घरात नेहमी म्हटलं जातं की, आज घरात पाहुणे येणार. बरेचदा कावळा बसायला आणि फांदी तुटायला असंही घडतं. पण अनेकदा आपल्याकडे कावळ्याची कावकाव सुरू झाल्यावर अनेक संकेत असतात असं ज्योतिषशास्त्रानुसार म्हटलं जातं. आपल्याकडे कावळ्याला अनन्यसाधारण महत्त्व देण्यात आले आहे. अगदी प्राचीन काळापासून कावळ्यांना आपल्याकडे शुभ आणि अशुभ शकुनांमध्ये समाविष्ट करण्यात आले आहे. कावळ्याने अमृताची चव चाखली होती असा अनेक प्राचीन कथांमध्ये उल्लेख करण्यात येतो. तर कावळ्याला दिलेले अन्न हे आपल्या पितरांना मिळेल असा आशिर्वाद श्रीरामाने कावळ्याला दिल्यामुळेच बाराव्याला अथवा श्राद्धाला पितरांना अर्थात कावळ्यांना अन्न देण्यात येते असं सांगण्यात येतं. कावळा हा शनि देवाचे वाहन असून कावळ्याच्या शरीरात आत्मा प्रवेश करून पितरांच्या स्वरूपात जेवतो अशी आख्यायिका आहे. तर कावळ्यांना भविष्यात ज्या घटना घडतात त्याचे आधीच संकेत मिळतात असं समजण्यात येते, त्यामुळे हे संकेत नक्की काय आहेत याबाबत आपण आज जाणून घेणार आहोत.
काय आहेत संकेत जे कावळा देतो
- सकाळीच कावळा घराजवळ आला असेल तर त्याला खायला घालावे. त्यामुळे घरात कधीही पैशाची कमतरता भासत नाही असं सांगण्यात येते. तर हिंदू वेद पुराणानुसार, सकाळी कावळ्याला खायला दिल्यास पुण्य मिळते असं सांगितले जाते
- काही ठिकाणी कावळ्याला अशुभ मानण्यात येते आणि त्याचा संबंध यमदेवतेशी अर्थात मृत्युच्या देवतेशी जोडण्यात येतो. सकाळीच उठल्यावर कावळा दिसणे अशुभ मानले जाते
- जमिनीवर चोच मारून सकाळी कावळा जर काही खायला शोधत असेल आणि तो तुमच्या दृष्टीस दिसला तर तुम्हाला अचानक धनलाभ होण्याची शक्यता असते असा समज आहे
- पुढे जात असताना पाठीमागून कावळ्याचा कर्कश आवाज आल्यास, तुमची सर्व संकटे आता दूर होण्याची वेळ आली आहे आणि शुभ शकून आहे
- घराच्या छतावर बसून कावळा ओरडत असल्यास, घरी पाहुणे येण्याची शक्यता आहे
- पण जर अनेक कावळे छतावर बसून कर्कश ओरडत असतील तर घरावर संकटे येण्याची शक्यता असते. या संकटापासून कावळे सावध करतात असा समज आहे
- घरासमोर खूप कावळे येऊन एकत्र ओरडत असतील तर अपशकुन मानला जातो
- प्रवासाला जाताना कावळ्याला दही भाताचा नैवेद्य दाखवला आणि तो कावळ्याने खाल्ला तर प्रवास सुखकर होतो असं म्हणतात
- कावळा आपल्या मागून आल्यास, प्रवासाला फायदा मिळतो
- कावळ्याने नेवैद्य ग्रहण केल्यास, करण्यात आलेले कार्य हे सिद्धीला पोहचले असे म्हणतात
- महिलांच्या डोक्यावरून अगदी जवळून कावळा गेल्यास, लवकरच पाळी येणार असं म्हटलं जातं
- नेवैद्य खाऊन कावळा विहिराच्या अथवा नदीच्या काठावर बसल्यास धनप्राप्ती अथवा हरवलेली वस्तू सापडते
- नेवैद्य खाऊन कावळा घराच्या छपरावर अथवा हिरव्या झाडावर बसल्यास, अकस्मात धनलाभ होतो
- कावळ्याच्या तोंडात फळ, माशाचा तुकडा अथवा फळ पाहिल्यास, कामात यश मिळते
- गाईच्या पाठीवर कावळा बसून चोच रगडताना दिसला तर उत्तम मेजवानी प्राप्त होते
- कोरडे गवत घेऊन कावळा जाताना दिसल्यास, धनलाभाची शक्यता असते
- कावळ्याच्या चोचीत फूल अथवा पान तुम्हाला दिसल्यास, मनात असलेली इच्छा पूर्ण होते
- गाईच्या डोक्यावर कावळा बसलेला दिसल्यास, आपल्या आवडत्या व्यक्तीची भेट घडून येते
- डुकराच्या पाठीवर कावळा असेल तर भरपूर संपत्तीचा लाभ होतो
- धुळीत कावळा लोळत असेल तर त्याठिकाणी पावसाची शक्यता असते
आपल्याकडे एक ना अनेक शुभ आणि अशुभ गोष्टी कावळ्यासंबंधित सांगण्यात येते. हे अर्थात तुमच्या मानण्या आणि न मानण्यावर आहे.
विशेष सूचनाः आम्ही कोणत्याही अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही. या सर्व रूढी आणि परंपरा, समज प्राचीन काळापासून चालत आहेत आणि याबाबत केवळ माहिती आम्ही या लेखातून देण्याचा प्रयत्न केला आहे. त्यामुळे कोणीही यावर अंधश्रद्धा अथवा श्रद्धा अशी टिकाटिप्पणी करू नये.
तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र. आमच्या The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा आणि सोबत मिळवा एक MyGlamm कडून मोफत लिपस्टिक
Read More From लाईफस्टाईल
Diwali Padwa Wishes, Quotes, Messages In Marathi 2022 | दिवाळी पाडव्याच्या शुभेच्छा
Dipali Naphade