लाईफस्टाईल

घरासाठी वॉटर प्युरिफायर खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी

Trupti Paradkar  |  Jun 10, 2021
घरासाठी वॉटर प्युरिफायर खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी

पिण्याचे पाणी स्वच्छ नसेल तर गंभीर आजारपणांचा धोका वाढतो. आजकल नळाचे पाणी सुरक्षित आणि स्वच्छ असेल याची खात्री देता येत नाही. मात्र पाणी गरजेपेक्षा स्वच्छ झालं तर त्यामुळे शरीरातील प्रतिकार शक्ती कमजोर होते. यासाठीच वॉटर प्युरिफायर खरेदी करताना तुम्हाला तुमच्या नळाला येणाऱ्या पाण्याच्या गुणवत्तेनुसार ते खरेदी करायला हवं. सध्या बाजारात विविध प्रकारचे वॉटर प्युरिफायर मिळतात. या सर्वांमधून तुमच्या घरासाठी योग्य वॉटर प्युरिफायर खरेदी करण्यासाठी फॉलो करा या टिप्स

बाजारात आरओ, युव्ही आणि युएफ अशा तीन प्रकारचे वॉटर प्युरिफायर मिळतात. जाणून घ्या तीन प्रकारच्या वॉटर प्युरिफायर विषयी…

आरओ ( Reverse osmosis)

आरओ हे एक असे पाणी शुद्धीकरण करणारे तंत्रज्ञान आहे ज्यामध्ये खूप प्रेशर टाकून पाणी स्वच्छ केले जाते. या टेकनिकमध्ये पाण्यातील अशुद्धता, कण, खनिज नष्ट होतं. म्हणूनच आरओचा वापर अशा ठिकाणी करायला हवा ज्या ठिकाणचे पाणी खारे असते. थोडक्यात ज्या पाण्यात टीडीएस म्हणजेच Total Dissolved Solids असते थोडक्यात ज्या ठिकाणी बोरवेलचे पाणी असते अथवा समुद्रकिनारचे पाणी असते. अशा ठिकाणी आरओ वापरणे नक्कीच फायद्याचे ठरते.

फायदे –

तोटे –

युव्ही (Ultraviolet water)

युव्ही म्हणजेच अल्ट्रा व्हायलोट टेकनिक द्वारे पाणी शुद्ध केल्यास पाण्यातील जंतू आणि व्हायरस नष्ट होतात. मात्र हे टेकनिक पाण्यातील क्लोरिन आणि आर्सेनिक नष्ट करत नाही. यासाठीच गोड्या पाण्याच्या ठिकाणी असलेल्या विभागात आणि जंतू नष्ट न करण्याची गरज असलेल्या  पाण्यासाठी हे टेकनिक वापरता येते. निसर्गरम्य ठिकाणी, डोंगराळ भागात, कमी प्रदूषण असलेल्या भागात हे टेकनिक पाणी शुद्ध करण्यासाठी वापरणे सोयीचे ठरते. 

फायदे –

तोटे –

युएफ (Ultrafiltration)

युएफ म्हणजेच अल्ट्रा फिल्टरेशन सिस्टिम हे एक फिजिकल तंत्रज्ञान आहे. ज्यामध्ये पाणी टाकल्यानंतर पाणी स्वच्छ केले जाते.

फायदे –

तोटे –

घरासाठी कोणते वॉटर प्युरिफायर घ्यावे

बाजारात सध्या वॉटर प्युरिफायरचे इतके प्रकार आणि ब्रॅंड आहेत की तुम्हाला ते पाहून नक्कीच संभ्रम होऊ शकतो. यासाठी आधी तुम्ही राहत असलेल्या पाण्याची गुणवत्ता तपासून घ्या. ज्या ठिकाणी प्रदूषण जास्त  आहे, पाणी खूप मोठ्या प्रमाणावर अशुद्ध आहे अशा ठिकाणी आरओ तंत्रज्ञानाचे वॉटर प्युरिफायर घेणे गरजेचं आहे. मात्र इतर ठिकाणी तुमच्या गरजेनुसार तुम्ही युव्ही अथवा युएफ बसवू शकता. 

फोटोसौजन्य – 

मिक्सर अथवा फूड प्रोसेसर वापरताना या गोष्टी ठेवा लक्षात, लवकर नाही होणार खराब

स्वयंपाकघरात असायलाच हव्यात या इलेक्ट्रॉनिक वस्तू

स्वयंपाकघरासाठी असे निवडा परफेक्ट स्टोरेज कंटेनर

Read More From लाईफस्टाईल