दिग्गज अभिनेत्री श्रीदेवीने बॉलीवूडमधून अचानक एक्झिट घेतली आणि चाहत्यांना धक्काच बसला. मात्र त्यानंतर चाहत्यांना तिच्या मुली जान्हवी आणि खुशीमध्ये श्रीदेवीची झलक दिसू लागली. आईच्या निधनानंतर लगेच जान्हवी कपूरने तिच्या ‘धडक’ या चित्रपटातून बॉलीवूडमध्ये पदार्पण केलं. जान्हवीने आजवर हातावर मोजण्याइतकेच चित्रपट केले असले तरी मात्र त्यामधील तिचा लुक, डान्स आणि अभिनयाची तुलना सतत श्रीदेवीशी करण्यात आली. काहींना जान्हवीचे काम आवडले तर काहींनी तिच्यावर टीका केली. असं असूनही जान्हवी कपूर मात्र बॉलीवूडमध्ये तिचे पाय रोवून उभी आहे. आता जान्हवीच्या पाठोपाठ श्रीदेवीची दुसरी मुलगी खुशी कपूरदेखील बॉलीवूड पदार्पणासाठी सज्ज झाली आहे. लवकरच तिच्या आगामी चित्रपटाचे शूटिंग सुरू होणार आहे.
‘इंडियन आयडल मराठी’च्या मंचावर येणार ‘झुंड’, आर्ची-परशा पुन्हा एकत्र
खुशीला बॉलीवूडमध्येच करायचं आहे करिअर
जान्हवी कपूरप्रमाणेच खुशीलाही तिच्या आईसारखं बॉलीवूड अभिनेत्रीच व्हायचं आहे. खुशी कपूर सोशल मीडियावर आताच खूप लोकप्रिय आहे. जान्हवीप्रमाणे खुशीलाही सोशल मीडियावर फॉलो केलं जातं. त्यामुळे आता तिला लवकर मोठ्या पडद्यावर झळकण्याचे वेध लागले आहेत. जान्हवी कपूरनंतर बॉलीवूड पदार्पण करण्यासाठी खुशीला मात्र थोडा जास्त वेळ लागला आहे. कारण ती यासाठी काही वर्षांपासूनच मेहनत घेत होती. आता तिचे वडिल निर्माते आणि दिग्दर्शक बोनी कपूर यांनी स्वतः खुशी लवकरच बॉलीवूडमध्ये पदार्पण करत असल्याचं जाहीर केलं आहे.
ऑस्कर सोहळ्याच्या थेट प्रक्षेपणापूर्वीच यंदा दिले जातील ‘या’ आठ श्रेणीतील पुरस्कार
काय म्हणाले बोनी कपूर
बोनी कपूर यांनी एका मुलाखतील खुशी लवकरच चित्रपटात काम करणार असून तिच्या चित्रपटाचं शूटिंग सुरू झाल्याचं जाहीर केलं. मात्र त्यांनी या चित्रपटाचं नाव सांगणं मात्र जाणिवपूर्वक टाळलं. असं असूनही चित्रपटाचं शूटिंग एप्रिलपासून सुरू होत आहे असं ते म्हणाले. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार जोया अख्तरच्या आगामी चित्रपटात खुशी कपूरला कास्ट करण्यात आलं आहे. मात्र त्या चित्रपटासाठी शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि अमिताभ बच्चन यांची नात अगस्त नंदा यांची नावंही पुढे आली होती. त्यामुळे आता नेमकं कोणाला या चित्रपटासाठी कास्ट करण्यात आलं आहे की या तिघी एकत्र जोयाच्या चित्रपटात झळकणार हे चित्रपटाचं शूटिंग सुरू होताच समजेल.
Read More From बॉलीवूड
फिल्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावरील बायोपिक ‘सॅम बहादूर’च्या चित्रीकरणास सुरुवात
Vaidehi Raje