ADVERTISEMENT
home / मनोरंजन
Jhund

‘इंडियन आयडल मराठी’च्या मंचावर येणार ‘झुंड’, आर्ची-परशा पुन्हा एकत्र

‘इंडियन आयडल मराठी’ (Indian Idol Marathi) हा कार्यक्रम आता रंगतदार होऊ लागला आहे. सोनी मराठी वाहिनीवरील फ्रिमेन्टल इंडिया टेलिव्हिजन प्रॉडक्शन्स प्रा. लि. चा हा कार्यक्रम सध्या मराठी प्रेक्षकांमध्ये खूपच चर्चेचा विषय बनला आहे. विजेतेपदासाठी सुरांची चांगलीच टक्कर बघायला मिळते आहे. परीक्षकांचे गुण आणि प्रेक्षकांची मतं यांच्या आधारे स्पर्धकांची विजेतेपदाकडे वाटचाल सुरू झाली आहे. अजय-अतुल (Ajay – Atul) हे लोकप्रिय आणि अनुभवी परीक्षक स्पर्धकांना उत्तम मार्गदर्शन करत असल्याने स्पर्धकांचा जोश वाढतो आहे. दर आठवड्याला या स्पर्धकांचं मनोबल वाढवण्यासाठी वेगवेगळे पाहुणेही मंचावर येतात. या आठवड्यात ‘झुंड’ (Jhund) चित्रपटाचे कलाकार मंचावर येऊन स्पर्धकांना शुभेच्छा देणार आहेत. नागराज मंजुळे (Nagraj Manjule), आकाश ठोसर (Akash Thosar) आणि रिंकू राजगुरू (Rinku Rajguru) हे कलाकार त्यांच्या आगामी चित्रपटाची माहिती देण्यासाठी आणि स्पर्धकांचा सुरेल आवाज ऐकण्यासाठी सुरांच्या मंचावर येणार आहेत.

आर्ची आणि परशा पुन्हा एकदा एकत्र 

सैराट (Sairat) फेम आर्ची आणि परशा यांनी महाराष्ट्राच्या मनामनांत स्थान निर्माण केलंय. अर्थात आकाश ठोसर आणि रिंकू राजगुरू हे पुन्हा एकदा प्रेक्षकांना भेटायला झुंडच्या निमित्ताने येणार आहेत. अमिताभ बच्चन (Amitabh Bachchan) यांची प्रमुख भूमिका असणारा हा चित्रपट सध्या चाहत्यांच्या चर्चेचा विषय झाला आहे. मुख्यत्वे नागराज मंजुळेच्या चित्रपटातून अभिताभ बच्चन येणार आणि नक्की आता कोणता विषय असणार आहे याकडेही प्रेक्षकांचे लक्ष लागून राहिले आहे. तर महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यांत आर्ची आणि परशाचे चाहते बघायला मिळतात आणि आता चाहत्यांसाठी ही जोडी आणि नागराज मंजुळे यांची निर्मिती हा संगम पुन्हा बघायला मिळणार आहे. ‘झुंड’ चित्रपटाच्या निमित्तानं ही जोडी लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी सध्या ही जोडी विविध कार्यक्रमांना भेट देत आहे आणि याच निमित्ताने मराठी इंडियन आयडलच्या मंचावरही ही जोडी धुमाकूळ घालणार आहे. आज रात्री प्रेक्षकांना खास भाग पाहायला मिळमार असून या चित्रपटाविषयी अधिक माहितीदेखील यातून मिळेल. 

स्लम सॉकरच्या विजय बारसेंवर आधारित चित्रपट 

झुंडचा चित्रपटाचा ट्रेलर नुकताच प्रदर्शित झाला असून 4 मार्च रोजी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. झुंड ही एका निवृत्त क्रिडा प्रशिक्षकाची कथा असून झोपपट्टीतील मुलांना शिस्तबद्ध सॉकर खेळाडू बनविण्याचा प्रवास अशी कथा आहे. तर स्लम सॉकर या स्वयंसेवी संस्थेचे संस्थापक असणारे विजय बारसे (Vijay Barse) यांच्या आयुष्यावर आधारित हा चित्रपट आहे असंही सांगण्यात येत आहे. निवृत्त झाल्यानंतर विजय बारसे यांना मिळालेल्या रकमेतून त्यांनी जमीन खरेदी केली आणि त्यानंतर तळागाळातल्या मुलांना ज्यांना सहजपणाने क्रिडा प्रशिक्षण मिळत नाही अशांसाठी फुटबॉलची अकादमी उघडण्याची योजना आखली असं म्हटलं जातं. तर वंचित मुलांना भर पावसाळ्यात प्लास्टिकच्या बादलीचा वापर करून फुटबॉल खेळताना पाहून त्यांनी हा विचार केला असे विजय बारसे यांनी सांगितले होते आणि नागराज मंजुळे यांनी आपल्या शैलीत हा चित्रपट रसिकांच्या भेटीला आणला आहे. तर अमिताभ बच्चन प्रमुख भूमिकेत असल्याने सर्वांनाच या चित्रपटाविषयी उत्सुकता असल्याचे दिसून येत आहे. पण त्यासाठी अजून एक आठवड्याची वाट पाहावी लागणार हे नक्की!

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

ADVERTISEMENT
27 Feb 2022

Read More

read more articles like this
good points

Read More

read more articles like this
ADVERTISEMENT