मनोरंजन

शेरशाहसाठी कियारा अडवाणीने नेसलेल्या साडीची किंमत ऐकून व्हाल थक्क

Trupti Paradkar  |  Jul 27, 2021
शेरशाहसाठी कियारा अडवाणीने नेसलेल्या साडीची किंमत ऐकून व्हाल थक्क

अभिनेत्री कियारा अडवाणीने तिच्या दिलखेचक अदा आणि अभिनयाने कमी वेळात बॉलीवूडमध्ये स्वतःचे अस्तित्त्व निर्माण केलं आहे. मग कबीर सिंह मधील साधी भोळी प्रिती असो वा गुडन्यूजमधील बबली मोनिका तिच्या अभिनयाचे अनेक चाहते आहेत. कियारा जेव्हा एखाद्या कार्यक्रमासाठी घराबाहेर पडते तेव्हा तिचा फॅशनेल अवतार पाहणं नेहमीच उत्सुकता वाढवणारं असतं. वेस्टर्न असो वा एथनिक कोणताही लुक कियारा खूप छान पद्धतीने कॅरी करते. त्यामुळे तिच्या ग्लॅमरस लुकने ती अनेकांना भुरळ घालत असते. अनेक तरूणी लग्नसोहळ्यात कियाराप्रमाणे लेंगा, साडी, शराराची  फॅशन कॅरी करतात. नुकताच कियाराच्या आगामी चित्रपट शेरशाहचा ट्रेलर लॉंच करण्यात आला. या कार्यक्रमातही चित्रपटापेक्षा जास्त चर्चा  कियाराच्या महागड्या  साडीची होती.

कियाराच्या या साडीची किती आहे किंमत 

शेरशाहच्या ट्रेलर लॉंचसाठी चित्रपटाची टीम कारगिलमध्ये गेली होती. या खास प्रसंगी कियाराने शुद्ध देसी लुक ट्राय केला होता. यावेळी कियारासोबत चित्रपटाचा हिरो आणि तिचा बॉयफ्रेंड सिद्धार्थ मल्होत्राही होता.  आयव्हरी रंगाच्या सुंदर साडीत कियाराचे सौंदर्य अधिकच खुलून आले होते. कियाराची  ही सुंदर साडी जॉर्जेट मटेरिअलची असून ती डिझाइनर मनिषीच्या प्रेमया ब्रॅंडची आहे. विशेष म्हणजे ही साडी हाताने विणलेली आहे. तिच्यावर हॅंडवर्कने सुंदर फुलांचे डिझाइन विणण्यात आलेले आहे. कियाराने या साडीवर स्पॅगेटी स्ट्रिप्सचा ब्लाऊज कॅरी केला होता. नॅचरल लुकच्या सिंपल मेकअपमुळे तिच्या साडीचे सौंदर्य अधिक खुलून आले होते.  या साडीसोबत कियाराने फक्त कुंदनचे मोठे कानातले घातले होते. एवढंच नाही तर कियाराने  नेसलेल्या या सुंदर साडीची किंमत साठ ते सत्तर हजारांच्या घरात असल्याची चर्चा सध्या सुरू आहे. कियारा जिथे जाते  तिथे तिच्या स्टाईलने चाहत्यांना घायाळ करते. तिच्या सौंदर्यामुळे अगदी साधा लुकही खास वाटू लागतो. शिवाय तिच्या वेस्टर्न आणि एथनिक दोन्ही लुक्सचे चाहते दिवाने होतात. कियारा कपडे, मेकअप, ज्वैलरीमध्ये इतकी परफेक्ट असते की तिच्याकडे फक्त पाहत राहावं असं चाहत्यांना वाटू लागतं. त्यामुळे कियाराने कारगिलमध्येही या सिंपल लुकनेही चाहत्यांना अक्षरशः घायाळ केलं होतं. कपिलच्या शो मध्ये पुन्हा दिसणार प्रेक्षक, दिला संकेत

कियारा अडवानीचा आगामी चित्रपट ‘शेरशाह’

शेरशाह चित्रपट कारगिल युद्धात शहीद झालेल्या कॅप्टन विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन विष्णू वरदान करत आहे. चित्रपटाचा निर्माता करण जौहर असेल. शेरशाहमध्ये कियारा आणि सिद्धार्थ मुख्य भूमिकेतून झळकणार आहे. 12 ऑगस्टला हा चित्रपट अमेझॉन प्राईमवर प्रदर्शित केला जाणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सिद्धार्थ आणि कियारामध्ये सूत जुळल्याची चर्चा आहे. सध्या ते दोघं एकमेकांना डेट करत आहेत. न्यु इअरला ते  दोघं मालदिव्जमध्येही एकत्र गेले होते. त्यामुळे हा चित्रपट दोघांसाठीही खूप महत्त्वाचा आहे. चित्रपटात नाही मिळाले यश म्हणून पुन्हा मालिकांकडे वळले हे स्टार्स

Read More From मनोरंजन