आरोग्य

किडनी स्टोन असल्यास असा करा पानफुटीच्या पानांचा वापर, होईल आश्चर्यकारक फायदा

Trupti Paradkar  |  Jul 14, 2022
किडनी स्टोन असल्यास असा करा पानफुटीच्या पानांचा वापर, होईल आश्चर्यकारक फायदा

भारताला आयुर्वेद शास्त्राचा समृद्ध वारसा लाभलेला आहे, त्यामुळे भारतात अशा अनेक वनस्पती आढतात. ज्यांचा उपयोग अनेक आरोग्य समस्यांवर केला जातो. या वनस्पती शोधण्यासाठी तुम्हाला जंगलात जाण्याची गरज नाही. अगदी घराशेजारी अथवा बागेतील कुंडीतही तुम्ही या वनस्पती वाढवू शकता. अशीॉच एक जादुई वनस्पती म्हणजे पानफुटी… ही वनस्पती एखाद्या तज्ञ्ज वैद्याप्रमाणे तुमच्यावर घरच्या घरी उपचार करू शकते. जर तुम्हाला औषधोपचारांवर जास्त पैसे खर्च करायचे नसतील तर प्रत्येकाने घरात पानफुटीचे झाड लावायला हवे. आजकाल अनेकांना किडनी स्टोनचा त्रास जाणवत असतो. सर्वात महत्त्वाचे म्हणजे या वनस्पतीच्या पानांमुळे किडनी स्टोनही पडू शकतो. जाणून घ्या किडनी स्टोनवर कसा करावा पानफुटीच्या पानांचा वापर…यासाठी जाणून घ्या पानफुटी वनस्पतीचे फायदे आणि उपयोग (Panfuti Plant Uses In Marathi), मुतखडा पडण्यासाठी घरगुती उपाय (Home Remedies For Kidney Stone In Marathi) आणि आरोग्यदायी टिप्स मराठी | Health Tips In Marathi

पानफुटी म्हणजेच पत्थरचट्टा

पानफुटीच्या पानांनाच हिंदीत पत्थरचट्टा असं म्हणतात. कारम भष्मपथरी, पाषाणभेद अशी नावं असलेल्या या पानांमुळे तुमचा किडनी स्टोन विरघडून लघवी वाटे पडू शकतो असं सांगण्यात येतं. वास्तविक पानफुटीमध्ये आणखी अनेक औषधी गुणधर्म आहेत त्यामुळे इंग्रजीत या वनस्पतीला मॅजिक लीफ असंही म्हणतात. जमिनीत नुसतं पान लावलं तरी त्याला मुळं फुटून या वनस्पतीची वाढ होते. चवीला तुरट आणि आंबट असलेली ही पानं अनेक आरोग्यसमस्यांवर उपयोगी ठरतात. कारण यामध्ये अॅंटि बॅक्टेरिअल, अॅंटि इफ्लेैमटरी आणि अॅंटि व्हायरल गुणधर्म असतात.

कसा कसावा किडनी स्टोनवर उपाय

जर तुम्हाला किडनी स्टोनचा त्रास असेल तर त्यामुळे भयंकर वेदना तुमच्या पोटात जाणवू शकतात. सोनोग्राफी अथवा सीटीस्कॅन करून तुम्ही याचे निदान करू शकता. मात्र यावर शस्त्रक्रिया अथवा इतर औषधी उपचार करण्याआधी एकदा पानफुटीची पाने काही दिवस खाऊन पाहा. कारण पानफुटीची पाने चावून खाण्यामुळे तुमचा किडनी स्टोन पडून तर जाईलच पण पुन्हा परत होणार नाही. यासाठी तुम्हाला सकाळी उठल्यावर उपाशीपोटी पानफुटीची पाने चघळून खावी लागतील. तुम्ही पानफुटीच्या पानांचा रस मध अथवा सुंठसोबत सेवन करू शकता. यामुळे तुमची पोटदुखी थांबेल, लघवीच्या जागी जळजळ होणार नाही.

तुमच्या सौंदर्यामध्ये भर घालण्यासाठी POPxo आणि MyGlamm येत आहेत एकत्र.  आमच्या  The Great Glamm Survey मध्ये सहभागी व्हा आणि जिंका  रुपये 1,000 हजार पर्यंतचा फायदा  आणि सोबत मिळवा एक  MyGlamm कडून मोफत लिपस्टिक

Read More From आरोग्य