Diet

दुधात भिजवून खा खजूर… कमी होईल सर्दी, खोकला, बद्धकोष्ठतेचा त्रास

Trupti Paradkar  |  Sep 15, 2021
know the benefits of eating dates soaked in milk

खजूर अथवा खारीक बऱ्याचदा उपवासाला खाल्ले जातात. साखरेला पर्याय म्हणूनही खजूरचा चांगला उपयोग होतो. मात्र एवढंच नाही खजूर नियमित खाण्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती वाढते. जर तुम्ही यासाठी नियमित खजूर अथवा खारीक खात असाल. तर आता ते नियमित दुधात भिजवून खा. कारण दुधात भिजवल्यामुळे खजूर जास्त चविष्ट लागतातच शिवाय ते आरोग्यासाठी अधिक लाभदायक ठरतात. अशा पद्धतीने खजूर खाण्यामुळे तुमची सर्दी, खोकला, अशक्तपणा, बद्धकोष्ठता, अॅसिडिटी कमी होऊ शकते.

खजूर खाण्याचे फायदे आहेत अनेक (Dates Benefits In Marathi)

दुधात भिजवलेले खजूर, खारीक का खावे 

खजूर दुधात भिजवून खाण्यामुळे अनेक आरोग्य समस्या कमी होतात. यासाठी सकाळी कोमट दुधात एक ते दोन खजूर अथवा खारीक भिजवा आणि मग ते दुध सेवन करा.

सर्दी – खोकला होत नाही

सर्दी झाल्यावर आपण किती उपाय करतो. अनेक प्रकारची औषधं, काढे, वाफ घेणे असे उपाय करतो. वातावरणातील बदल, अॅलर्जी, इनफेक्शन, गारवा अशा अनेक कारणांमुळे सर्दी, खोकला होऊ शकतो. मात्र तुम्हाला जर सर्दी होऊ नये असं वाटत असेल तर नियमित दुधात भिजवून खजूर खा. ज्यामुळे तुमची रोगप्रतिकार शक्ती मजबूत होईल आणि सर्दी, खोकल्यापासून सुटका मिळेल. 

अशक्तपणा कमी होतो

खजूरामध्ये अनेक पोषक घटक असतात. ज्यामुळे तुमच्या शरीरातील रक्तामध्ये वाढ होते. रक्त शुद्ध होण्यासाठी, अशक्तपणा कमी होण्यासाठी रूग्णाला खजूर अथवा खारीक खाण्याचा सल्ला दिला जातो. जर तुम्ही दुधात एक ते दोन खजूर, खारीक, केसर आणि आलं टाकून ते उकळलं आणि असं दूध नियमित घेतलं तर तुमचा अशक्तपणा नक्कीच दूर होईल.

जाणून घ्या खारीक खाण्याचे फायदे (Kharik Benefits In Marathi)

बद्धकोष्ठतेतून सुटका

आजकाल चुकीची जीवनशैली, अयोग्य आहार आणि जेवणाची आणि झोपण्याची वेळ बदलण्यामुळे अनेकांना बद्धकोष्ठतेचा त्रास जाणवतो. बद्धकोष्ठता झाल्यास दिवसभर शरीर जड वाटतं आणि पोटात दुखणे, पोट स्वच्छ न होणे, छातीत जळजळ होणे हे त्रासही जाणवतात. मात्र जर तुम्ही सकाळी उठल्यावर नियमित दुधात भिजवलेले खजूर घेतले तर तुमचं पोट स्वच्छ होईल आणि बद्धकोष्ठता कमी होईल. 

ह्रदयाचे आरोग्य जपता येते

कमी वयात ह्रदयाचे आरोग्य बिघडल्याची उदाहरणे आपण आजकाल नेहमीच पाहतो. याला कारण आहाराबाबत असलेल्या चुकीच्या सवयी असू शकतात. सतत जंकफूड, तळलेले, मसालेदार पदार्थ खाण्यामुळे तुमचे आरोग्य बिघडते. मात्र जर तुम्ही नियमित दुधात भिजवलेले खजूर खाल्ले तर तुमच्या ह्रदयाचे आरोग्य नक्कीच सुधारू शकते. 

अंजीर खाण्याचे फायदे तुम्हाला करतील आश्चर्यचकित (Anjeer Benefits In Marathi)

शांत झोप लागते

वेळेचा अभाव आणि अनिद्रा यामुळे झोप पूर्ण न झाल्याचा त्रास तुम्हाला जाणवत असेल तर तुम्हाला यावर वेळीच उपाय करायला हवा. कारण निरोगी राहण्यासाठी प्रत्येकाने कमीत कमी सात ते आठ तास शांत झोपायला हवं. जर तुम्हाला रात्री चांगली झोप नसेल तर दररोज दुधात भिजवलेले खजूर खा. ज्यामुळे तुमच्या झोपेची समस्या कमी होईल आणि तुम्हाला शांत झोप लागेल. 

Read More From Diet